Jump to content

दुर्गाडी किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(किल्ले दुर्गाडी या पानावरून पुनर्निर्देशित)
दुर्गाडी किल्ला
नाव दुर्गाडी किल्ला
उंची फूट
प्रकार जलदुर्ग/भूदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण ठाणे, महाराष्ट्र
जवळचे गाव कल्याण
डोंगररांग
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना हिंदू क्षत्रिय मराठा शिर्केसातवाहन राजे

दुर्गाडी किल्ला मालकीहक्क :- माळशेज नाणेघाट आणि इतर वनक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकास समिती. (सुयश शिर्केसातवाहन.)


दुर्गाडी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

दुर्गाडी किल्ला आणि कल्याण बंदराची निर्मिती हिंदू क्षत्रिय मराठा तसेच स्थानिक आगरी समाज यांच्या सहकार्याने राजांनी शेकडो वर्षांपूर्वी केलेली आहे.

कल्याण शहर उल्हास नदी, खाडी किनारी वसलेले आहे. सातवाहनांच्या राजवटीमध्ये कल्याण बंदर खूप प्रसिद्ध होते. मध्यपूर्व देशातील तसेच रोम पर्यंत चालणाऱ्या व्यापाराचे कल्याण हे केंद्र होते. कल्याण बंदरामध्ये येणारा व्यापारी माल येथून नाणेघाटमार्गे जुन्नर तसेच प्रतिष्ठाण (पैठण) या राजधानीकडे रवाना होत असे.

बोर घाटाजवळ उगम पावणारी उल्हास नदी वसईजवळ समुद्राला मिळते. उल्हास नदीला कसारा घाटाजवळ उगम पावणारी भातसाई नदी तसेच माळशेज घाटाकडून वाहत येणारी [[काळू नदी]] येऊन मिळते. त्यामुळे खाडीला पाणी भरपूर असते.

इतिहास[संपादन]

कल्याणच्या खाडीत गलबतांनिशी शिवाजीराजांनी स्वराज्याच्या आरमारास प्रारंभ केला.

दुर्गाडी किल्ला आणि कल्याण बंदराची निर्मिती हिंदू क्षत्रिय मराठा शिर्केसातवाहन राजे. राजांनी हजारो लाखो वर्षांपूर्वी केलेली आहे.

दुर्गाडी किल्ला आणि कल्याण बंदर हे हिंदू धर्माचे तीर्थक्षेत्र आणि शक्तीपीठ आहे. शिवभगवान सातवाहन साम्राज्य संरक्षित स्मारक आहे.

दुर्गाडी किल्ला आणि कल्याण बंदर परिसरामधून शिर्केसातवाहन काळापासून सातवाहन साम्राज्य महाराष्ट्राचा आणि संपूर्ण भारत (हिंदुस्थान) देशाचा व्यापार देश - विदेशामध्ये चालत होता आणि तो आजही चालत आहे.

दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गादेवीचे मंदिर हे जागृत देवतेचे मंदिर आहे. याठिकाणी शिर्केसातवाहन काळामध्ये प्रत्यक्षात दुर्गादेवी प्रकट झाली होती. तेव्हापासून याठिकाणी हे मंदिर आहे.

परदेशातून म्हणजेच दुसऱ्या राज्यातून देशातून कल्याण बंदरामध्ये येणार व्यापारी माल कल्याण बंदरामधून नाणेघाट मार्गे जुन्नर - अश्यमकनगर (अहमदनगर) मार्गे पैठण ला जात असे.

दुसरमार्ग कल्याण बंदरापासून माळशेज घाट मार्गे जुन्नर जुन्नर - अश्यमकनगर (अहमदनगर) मार्गे पैठण - बीड आणि राज्याच्या अन्य भागांमध्ये जात असे.

तिसरमार्ग कल्याण बंदरापासून माळशेज घाट मार्गे जुन्नर - नाशिक.

अशाप्रकारचे अनेक महामार्ग होते ज्या मार्गांवरून संपूर्ण राज्यामध्ये व्यापारी मला पोहचविला जात असे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा शेतमाल याच कल्याण बंदरातून देश - विदेशामध्ये निर्यात केला जात असे.

कल्याण बंदर हे जागतिक पातळीवरील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध व्यापारी बंदर आहे.

शिर्केसातवाहन राजांनी कल्याण बंदर आणि दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये मराठा सातवाहन साम्राज्याचे पहिले आरमार, नौसेना, समुद्रीसेना, बंदर स्थापन केले.

त्याचबरोबर कल्याणसारखे महत्त्वाचे बंदर परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे किल्ला दुरुस्ती करण्याचा आदेश दिला. आबाजी महादेवांना येथे किल्ला दुरुस्ती पाया खोदतांना या पायामध्ये अमाप द्रव्य सापडले. दुर्ग बांधत असतानाच द्रव्य मिळावी ही दुर्गादेवीचीच कृपादृष्टी आहे.

दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयानेच शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारण्यासाठी येथे गोदी निर्माण केली. या गोदीतून लढाऊ जहाजांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या करीता पोर्तुगीजांचे सहाय्य घेतले. निर्माण झालेल्या आरमाराने पुढे मुंबईच्या इंग्रजांना, वसईच्या पोर्तुगिजांना तसेच जंजिऱ्याच्या सिद्धीला दहशत बसविली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयाने भारतीय आरमाराचा पाया घातला.

कसे जाल ?[संपादन]

कल्याणच्या बसस्थानकापासून रिक्षाने १५ मिनिटात दुर्गाडी किल्ल्याजवळ पोहोचता येते.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

  • किल्ल्याच्या प्रवेशमार्गावर सध्या कमान उभारलेली आहे. या मार्गावर पूर्वी दरवाजा होता, याला गणेश दरवाजा म्हणून ओळखले जाता असे. येथे गणेशाची मूर्ती आहे.
  • दुर्गाडीच्या लहानशा किल्ल्यावर दुर्गामातेचे मंदिर आहे. त्यामुळे येथे भक्तांचा नेहमीच राबता असतो. मंदिरात पूर्वीचा देवीचा तांदळा असून नव्याने बसविलेली मूर्तीही आहे.
  • मंदिराजवळ गडाच्या खाडीकडील भागाकडे तटबंदी व बुरुजाचे अवशेष आहेत. गडावरील अवशेष मात्र काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत.

गडावरील पाण्याची सोय[संपादन]

जवळपासच्या हॉटेलमध्ये तुमच्या खाण्यापिण्याची सोय होऊ शकते.


संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]