घनगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(घनगड किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
घनगड किल्ला
Ghanagad 1.jpeg
घनगड किल्ला
घनगड किल्लाचे ठिकाण दाखविणारा नकाशा
घनगड किल्लाचे ठिकाण दाखविणारा नकाशा
घनगड किल्ला
नाव घनगड किल्ला
उंची ९६२ मीटर/३१५५ फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी अवघड
ठिकाण महाराष्ट्र
जवळचे गाव भांबर्डे
डोंगररांग घनगड रांग
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


घनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे. लोणावळा पासून भांबर्डे व त्यानंतर एकोले गाव लागतं या गावी घनगड किल्ला अगदी मध्यभागी आहे. चढायला फारसा अवघड नसणारा किल्ला मात्र देखना आहे या गडाचे प्रथम प्रवेशद्वार आजही अस्तित्व टिकून आहे वाघजाईचे मंदिर पाण्याचे टाके िऱ्याने जाणारी वाट ही या किल्ल्याची वैशिष्ट्ये आहेत सदर किल्ल्याचा मुख्य दरवाजा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे मात्र तरीही गडमाथ्यावर आजही चिलखती बुरुज काही वाड्याचे अवशेष पाच सहा पाण्याची टाकी आहेत गडावरून सुधागड अप्रतिम दिसतो तसेच दरीच्या पलीकडे तैलबैला ही सुंदर दिसतो

शिवाजी ट्रेल्‍स नावाच्या दुर्ग संवर्धन संस्थेने या गडाची डागडुजी केली आहे.(सप्टेंबर २०१३)


कुटुंबासमवेत या किल्ल्यावर एक दिवस आरामशीर घालवू शकतो

भौगोलिक स्थान[संपादन]

कसे जाल ?[संपादन]

पुण्यापासून घनगड सुमारे 108 km आहे. पुण्यातून एकोले गावात पोहचण्यासाठी आपण ताम्हिणी घाट/ मुळशी मार्गे, जीवन-तुंगी मार्गे (तुंग-तिकोना) किंवा लोणावळा मार्गे जाऊ शकतो. ताम्हिणी घाट मार्गे जातांना तुम्हाला मध्ये देवकुंड, कुंडलिका वॅली, निवे, आडगाव पाझरे, भांबर्डे, मग एकोले असा मार्ग आहे. ह्या मार्गाने जवळ जवळ १२-२० कमी अंतर कमी होते. आणि दुसरा एक मार्ग म्हणजे पौडगावा मधून एक उजव्या बाजूस वळतो. जातांना रस्त्यात तिकोना, तुंग,आणि मोरगिरी गड लागतात.जातांना अतिशय असा सुंदर दृश्य बघायला मिळते.

आणि तिसरा मार्ग म्हणजे लोणावळा वरून. इकडून अंतर जरा जास्त आहे,

इतिहास[संपादन]

छायाचित्रे[संपादन]

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

गडावरील राहायची सोय[संपादन]

गडावर राहण्यासाठीची सोय आहे.वर गेल्यावर एक गुहा आहे तिथं 7-8 जण झोपू शकतात. पाण्याचे एक टाके आहे, ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे.

गडावरील खाण्याची सोय[संपादन]

गडावर खाण्याची काहीच सोय नाही. स्वतः येतांना घेऊन यावे. किंवा वर आल्यावर आपण बनवून खाऊ शकता. किंवा गडाच्या पायथ्याशी एकोले गाव आहे. जिथे राहण्याची व खाण्याची सोय आपण गावकऱ्यांकडे करू शकतो.

गडावरील पाण्याची सोय[संपादन]

गडावर गेल्यावर शिडी वर चढुन जाताना एक छोटं पाण्याच टाक लागते ते पाणी पिण्यासाठी आहे.

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

मार्ग[संपादन]

१. ताम्हिणी घाट/ मुळशी मार्गे, २. पौड पासून उजवीकडे जीवन-तुंगी मार्गे लागतो (तुंग-तिकोना-मोरगिरी) किंवा ३. लोणावळा मार्गे जाऊ शकतो.

जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन]

गडावर जाण्यासाठी ट्रेकर असाल तर 30 मी. खूप झाले आणि नवीन असाल तर १/१:३० तास लागतो.

संदर्भ[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]