सिद्धगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सिध्दगड या पानावरून पुनर्निर्देशित)
सिद्धगड
सिद्धगड.jpg
सिद्धगड किल्ला
नाव सिद्धगड
उंची ९८२ मीटर
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण ठाणे, महाराष्ट्र
जवळचे गाव सिद्धवाडी, म्हसा, मुरबाड
डोंगररांग दमदमाची डोंगररांग/भिमाशंकर डोंगररांग
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


हे सुद्धा पहा[संपादन]

सिद्धगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुरबाड ते म्हसा आणि येथून २१ किमी अंतरावरील सिद्धगड परिसर हा भिमाशंभर अभयारण्यात येतो. जांबुर्डे या गावापासून ६ किमी अंतरावर हे स्थळ आहे. गर्द झाडली व घनदाट अरण्यात विविध प्रकारचे वन्यजीव, पशु-पक्षी आढळतात. भिमाशंकर अभयारण्याच्या अंतर्गत हा संपूर्ण परिसर येत असल्याने येथील जंगलाचे चांगले संवर्धन झाले आहे. अनेक उपयुक्त वनौषधी येथे आढळतात. दक्षिण तटावर भैरवाचे स्थान आहे.. क्रांतीकारकांची भूमी स्वातंत्र्य लढयात ब्रिटिशांना सळो-की-पळो करून सोडणा-या आणि आपल्या प्राणांची आहुती देणा-या वीर भाई कोतवाल व हिराजी पाटील या महान क्रांतीकारकांची ही ‘बलिदानभूमी’ ही तरुणांसाठी स्फूर्तीस्थान आहे.२ जानेवारी १९४३ रोजी क्रांतिकारक हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांना सिद्धगड किल्ल्याच्या पायथ्याशी वीरमरण आले होते. तेव्हा पासून या ठिकाणाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र वरती डोंगर माथ्यावर असणारा प्राचीन किल्ला फारसा परिचित नव्हता. तसेच किल्ल्यावर जाणारी वाट पण बिकटच असल्याने ट्रेकर्स व्यतिरिक्त कुणी फारसा तिथे जाण्याचा प्रयत्न करत नव्हते. मुरबाडपासून २१ किमी अंतरावर हा किल्ला आहे. या किल्ल्याचा कालखंड निश्चित सांगता येत नसला तरी या ठिकाणी असणारी बौद्धकालीन लेणी, उद्ध्वस्त वाडयांचे अवशेष, सनिकांच्या बराकी, धान्याची कोठारे, पाण्याची टाकी यामुळे किल्ल्याचा थोडाफार इतिहास उलगडण्यास मदत होते. हा किल्ला गायधरा या महत्वाच्या घाटरस्त्याच्या लगतच असल्याने त्या काळी व्यापारी या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘भिवाचा आखाडा’ येथे विश्रांतीसाठी थांबत होते. या किल्ल्यावर आजही शेकडो वर्षापूर्वीची एक तोफ आहे. कोकण स्वारीतून (इ। स. १६५७ – ५८ ) शिवाजीराजांनी सिद्धगड काबीज केला होता. पेशवे दप्तरानुसार १७३४ मध्ये मराठयांनी वसईच्या किल्ल्यावर स्वारी केली तेव्हा सिद्धगडावर काहीकाळ सनिक ठेवल्याची नोंद आहे. १८१८ नंतर या किल्ल्यावर इंग्रजांनी तोफांचा मारा करून किल्ल्याचे अतोनात नुकसान केले. नंतरच्या काळात या किल्ल्याचा इतिहास पुसटसा होत गेला.

पायथ्याचे गाव[संपादन]

उत्तर बाजूला नारिवली तर दक्षिण बाजूला बोरवाडी. बोरवाडी आणि गडाच्या दक्षिण पायथ्याशी हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचे स्मारक आहे.

पाण्याची सोय[संपादन]

सिद्धवाडीच्या पश्चिमेला बारमाही पाण्याची विहीर आहे. तसेच गडावर पाण्याची टाके आहेत.

मुक्कामाची सोय[संपादन]

वाडीतल्या कुणाच्याही पडवीत किंवा शाळेत.


रस्ता[संपादन]

मुंबई-कल्याण-मुरबाड-म्हसा-जांभुर्डे-बोरवाडी किवा मुंबई-कल्याण-मुरबाड-म्हसा-उचले .. पुढे चढाई. एका तासात गडाच्या पोटावर मधल्या माचीवर सिद्धगडवाडी नावाचे महादेव कोळी लोकांचे गाव आहे, ते येते. पुढे एका अवघड चढणीनंतर तासाभरात गडाच्या माथ्यावर पोहिचता येते. गडावर सर्वच पडझड झाली आहे.