गोवागड
गोवागड | |
नाव | गोवागड |
उंची | |
प्रकार | स्थलदुर्ग,जलदुर्ग. |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र |
जवळचे गाव | दापोली,हर्णे |
डोंगररांग | |
सध्याची अवस्था | बरी |
स्थापना | {{{स्थापना}}} |
गोवागड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हर्णे बंदर प्राचिन काळापासून प्रसिद्ध आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड .
कसे जाल?
[संपादन]हर्णे बंदर दापोली तालुक्यामधे असून तो रत्नागिरी जिल्ह्यामधे आहे. कोकणामधील महाड, मंडणगड आणि खेड कडून गाडीमार्गाने दापोलीला पोहोचता येते. दापोलीपासून सोळा कि.मी. अंतरावर हर्णे आहे. हर्णेच्या सागरातील सुवर्णदुर्ग किल्ल्याबरोबर किनाऱ्यावरील या तिन्ही किल्ल्यांनाही भेट देता येते.
पाहण्यासारखे
[संपादन]फत्तेदुर्गापासून फर्लांगभर गाडीरस्त्याने चालत आल्यावर समोर दिसतो तो तटबंदीने युक्त असलेला गोवागड. भक्कम तटबंदी आणि भक्कम दरवाजा असलेल्या या किल्ल्याचे नाव जरी गोवागड असले तरी गोव्याशी याचा काही संबंध नाही. रस्त्याच्या कडेलाच किल्ल्याचा दरवाजा दिसतो पण याचा मुख्य दरवाजा मात्र उत्तरेकडे तोंड करून आहे. हे भव्य प्रवेशद्वार पहाण्यासाठी तटबंदीला वळून समोरून आपल्याला जावे लागते. सागराच्या बाजुला थोडेसे उतरून डावीकडे वळाल्यावर आतल्या बाजुला हे प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार दगडाने चिणून बंद करण्यात आले आहे. प्रवेशद्वाराजवळ हनुमानाची मुर्ती आहे. तसेच येथे शरभ व महाराष्ट्रामध्ये किल्यांवर अभावानेच दिसणारे गंडभेरुडाचे शिल्प आहे. हे प्रवेशद्वार पाहून पुन्हा रस्त्यावर येऊन नव्याने केलेल्या कमानीवजा दारातून गडामध्ये प्रवेश करावा लागतो. गोवागड दक्षिणकडील भाग थोडय़ा चढाचा आहे. याचाच उपयोग करून त्याला तटबंदी घालून बालेकिल्ला केलेला आहे. पश्चिमेकडील तटबंदी काहीशी ढासळलेली आहे. पश्चिमेकडील बाजुला सुवर्णदुर्गाचे दृश्य उत्तम दिसते. गडामधे पाण्याची विहीर आहे. तिचा वापर नसल्यामुळे पाणी वापरण्यायोग्य राहीले नाही. किल्ल्यात इंग्रजकालीन दोन इमारती पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत. त्यामधील एका इमारतीत पुर्वी कलेक्टर राहात असे. गडामध्ये महत्त्वाचे असे बांधकाम फारसे शिल्लक नाही.
संदर्भ
[संपादन]बाहय दुवे
[संपादन]- महान्यूज.कोम - गोवागड Archived 2010-12-19 at the Wayback Machine.(मराठी)