Jump to content

नगरधाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नगरधन या पानावरून पुनर्निर्देशित)

नगरधाण भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्यात रामटेकपासून वायव्येस सुमारे ७ कि. मी. अंतरावर असलेला हा 'भुईकोट' प्रकारातील एक किल्ला आहे. वाकाटककालीन असलेल्या या किल्ल्यास जुना इतिहास आहे. हा किल्ला आहे. इसवी सनाच्या ४ थ्या शतकात ही जागा 'नंदीवर्धन' म्हणून ओळखली जात होती. नगरधन हा त्याचा अपभ्रंश आहे. नगरधन गावाच्या पश्चिमेस या किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. नगरधनच्या भव्य दरवाजावर काही शिल्पे अंलकृत केलेली आहेत. शिरोभागी गणेशाची प्रतिमा आहे. दोन्ही बाजूंना चषक कोरलेले आहेत. दाराच्या बाजूला द्वारपाल कोरलेले असून त्यांच्या खांद्यावर कबुतर दाखवले आहे. पूर्वी निरोपानिरोपी करण्यासाठी कबुतरांचा वापर करीत असत. दाराच्या आत पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. पूर्वी आत येणाऱ्यांची चौकशी व झाडाझडती येथेच घेतली जायची. उमलती कमलपुष्पे हे यादवांचे चिन्ह प्रवेशाच्या दोन्ही बाजूंस आहे. प्रवेशदारातून आत गेल्यावर एक आयताकृती कक्ष लागतो. येथे आत हा भुईकोट आहे. तो गोंड राजाच्या वेळचा असावा. येथे एक पायऱ्याची विहीरही आहे.


नगरधाण किल्ला
नाव नगरधाण किल्ला
उंची
प्रकार
चढाईची श्रेणी
ठिकाण नागपूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव नगरधाण,रामटेक तालुका
डोंगररांग xxx
सध्याची अवस्था दुर्लक्षित व जिर्ण
स्थापना {{{स्थापना}}}


माहिती

[संपादन]

विदर्भातील रामटेक हे धार्मिक स्थळ म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील भाविकांबरोबर इतर राज्यांमधूनही अनेक भाविकांचा ओघ रामटेकला असतो.

रामटेकच्या प्रसिद्ध अशा धार्मिक व पर्यटन स्थळाच्या जवळ असूनही नगरधनचा किल्ला मात्र अनेकांना अपरिचित आहे. रामटेकच्या डोंगरावरून नगरधनचा किल्ला ओळखू येतो. नगरधाणचा किल्ला रामटेक तालुक्यात असून नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. नागपूर ते जबलपूर असा राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग क्र. ७ आहे. या महामार्गावर मनसर हे गाव आहे. या मनसर गावातून पश्चिमेकडे रामटेककडे जाण्यासाठी किंवा भंडारा जिल्ह्यातील तुमसरकडे जाण्यासाठी रस्ता फुटतो. या रस्त्याने रामटेक गाठल्यावर तेथून सहा-सात किलोमीटर दक्षिणेकडे नगरधन गाव गाहे.

नगरधाण गावाच्या बाहेर (गाव ओलांडल्यावर) नगरधनचा किल्ला आहे. नागपूरपासून वाहनाने दीड तासात नगरधनपर्यंत पोहोचता येते.

नगरधाणचा भुईकोट हा प्रथमदर्शनी आपल्याला मोहवून टाकतो. नगरधन किल्ल्याने कात टाकून नवे रूप धारण केले आहे. याची तटबंदी व आतील भाग नव्याने दुरुस्त केलेला आहे. लालसर पण काळ्यारंगाची झाक असलेल्या चिऱ्यांनी किल्ल्याची तटबंदी व दरवाजा बांधून काढल्यामुळे त्याचे सौंदर्य कैकपटींनी वाढलेले आहे.

दारातून आत शिरल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. तटबंदीवर चढल्यावर तटबंदीवरून फेरी मारता येते. या रुंद तटबंदीवर निरीक्षणासाठी मनोरे केलेले आहेत. येथून रामटेक किल्ल्याचे उत्तम दर्शन होते. किल्ल्याच्या आत वाड्याचे तसेच इतर निवासस्थानांचे अवशेष आहेत. किल्ल्यामध्ये तीन मजली खोल विहीर आहे. या मजल्यावर कमानीयुक्त खोल्या असून पायऱ्या उतरून तिथपर्यंत पोहोचता येते. किल्ल्यामध्ये मंदिर, तसेच काही ठिकाणी प्राचीन अवशेषही पहायला मिळतात.

नगरधाणचा किल्ला हा इसवी सनाच्या साधारण चवथ्या शतकातील किल्ला असावा. जुन्या आणि नव्याचा संगम असलेला नगरधनचा हा भुईकोट आहे.

इतिहास

[संपादन]

गडावरील ठिकाणे

[संपादन]

मुख्य जागा

गडावर जाण्याच्या वाटा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]