ढाक बहिरी
बहिरी - गडदचा बहिरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ऐतिहासिक घडामोडीत उल्लेख नाही म्हणजेच कारकीर्द नाही असे समजणे म्हणजे त्याच्या गुढतेवर शंका घेण्यासारखे आहे. कारण हिंदवी स्वराज्याचा पाया हा गनिमी कावा आणि त्याच्या गुढ पात्रता यावर निर्धारित आहे. ढाकच्या माथ्यावर बहिरी देवीचे ठाणे तर पोटात बहिरी देवीची गुहा पहायला मिळते. आजही जागरूक समजले जाणारे हे चमत्कारिक स्थळ त्याच्या अंगावर पडणाऱ्या कठिण चढाईमुळे प्रचलित आहेत. ना कोणती दान पेटी ना कोणते धन दौलत, आहे केवळ ती भाविकांची श्रद्धा! सोबतचा चौफेर निबीड चे घनदाट अरण्य. ज्या मध्ये चकवा लागण्याची घटना बऱ्याच भटक्यांसोबत घडल्याचे ऐकायला मिळते. अशा देवस्थानांकडे लोभी मुघलांनी प्रत्येक वेळी दुर्लक्षच केले. आणि याच मूर्खतेचा फायदा छत्रपतीनी घेत अशा देवस्थानावरील राहण्याची आणि पिण्याच्या पाण्याची सोय लक्षात घेऊन त्यांचा वापर सैन्याच्या तुकड्या ठेवून टेहळणी साठी केला. साचा:पोहचण्याच्या वाटा किल्ल्यावर पोहोचण्यासाठी २ वाटा आहेत. या वाटांनी प्रथम ‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीत पोहोचावे लागते. १) वदप मार्गे :- कर्जत - वदप अंतर ७ कि.मी आहे. वदप गाव संपल्यावर एक वाट भिवगडा/भीमगडा कडे जाते. या वाटेने १० मिनीटात आपण एका खिंडीत पोहोचतो. येथून उजव्या बाजूची वाट ढाक किल्ल्याकडे तर डाव्या बाजूची वाट भिवगडा/भीमगडा कडे जाते. या वाटेने वदप गाव ते ढाक गाव हे अंतर कापण्यासाठी साधारणतः दिड ते २ तास लागतात. येथुन ‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीत पोहोचायला पाऊण तास लागतो. तर; २) जांभिवली मार्गे :- पुणे - कामशेत - जांभिवली यामार्गे जांभिवली गावात पोहोचावे. तेथुन अर्धा - पाऊण तासात कोंडेश्वर मंदिरात पोहोचावे. येथून ‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीत तासभरात पोहोचता येते. मुख्य टप्पा:– दोन्ही वाटांनी खिंडी पर्यंतचा प्रवास समजून घेता येईल पण ढाक बहिरीच्या गुहेपर्यंत जाणाऱ्या सर्व वाटा ‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीतून जातात.खिंडीतून पलिकडील बाजूस उतरल्यावर उजव्या बाजूने (दरी डावीकडे ठेवत) अवघड कातळटप्पा पार करून बहिरीच्या गुहा गाठावी. हा कातळटप्पा पार करताना दोराचा वापर करावा लागतो. ‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीत एक वाट डावीकडे जाते. या वाटेने ३० मिनीटात गड माथ्यावर पोहोचता येते.