गुणवंतगड
Appearance
गुणवंतगड | |
मोरगिरी गावातून दिसणारा गुणवंतगड | |
नाव | गुणवंतगड |
उंची | १००० फूट |
प्रकार | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | सातारा, महाराष्ट्र |
जवळचे गाव | पाटण,मोरगिरी गाव |
डोंगररांग | बामणोली |
सध्याची अवस्था | नष्ट होण्याच्या मार्गावर |
स्थापना | {{{स्थापना}}} |
महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये पाटण जवळील हा गड मोरगिरीचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो.
स्थान
[संपादन]महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या पाटण गावाच्या पश्चिम-नैऋत्य(WSW) दिशेला दहा किलोमीटरवर हा गड आहे. पश्चिम-वायव्येला दातगड आहे आणि दोन्ही गडांमधून कोयना नदी आणि हेळवाक-पाटण रस्ता जातो.
इतिहास
[संपादन]१८ व्या शतकात पेशव्यांच्या राजवटीत या गडाचा उपयोग सैन्यतळ म्हणून केला गेला होता. त्याआधी टेहळणीसाठी या गडाचा उपयोग केला जात असावा. इ.स. १८१८ च्या मराठा युद्धात हा किल्ला ब्रिटिशांकडे सोपवण्यात आला.
गडावरील प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]सध्या गडावर इतिहासाच्या कोणत्याही खाणाखुणा नाहीत. फक्त एक विहीर आहे.
संदर्भ
[संपादन]- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर