इंद्राई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंद्राई हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.


इंद्राई
नाव इंद्राई
उंची ४४९० फुट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव वडबारे
डोंगररांग सातमाळ
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


नाशिक जिल्ह्यात साह्याद्रीची एक रांग सुरगण्यापाशी सुरू होते आणि चांदवडपर्यंत येऊन संपते. तीच मनमाडच्या जवळ असणाऱ्या अंकाईपर्यंत जाते. या रांगेला अजंठा-सातमाळ रांग म्हणतात. चांदवड तालुक्यात चार किल्ले आहेत, राजधेर, कोळधेर, इंद्राई आणि चांदवड.

इतिहास[संपादन]

गडावर पाहण्याची ठिकाणे[संपादन]

गडाच्या पायऱ्या चढून गेल्यावर प्रवेशद्वाराच्या अलीकडेच डाव्या बाजूला कातळावर एक फारसी शिलालेख कोरलेला आढळतो. प्रवेशद्वाराचे फक्त अवशेषच शिल्लक आहेत.

गडमाथ्यावर गेल्यावर डावीकडे वळून थोडे पुढे गेल्यावर तीन वाटा लागतात. उजवीकडील वाट पकडली तर थोडयाच अंतरावर कातळात खोदलेल्या गुहांची रांग दिसते. या सर्व गुहा पाहून व परत मागे फिरून वरती जाणारी मधली वाट पकडली तर थोडे पुढे गेल्यावर एक महादेवाचे मंदिर लागते. तेथून पुढे जाणारी वाट समोरच्या डोंगरावर घेऊन जाते. या दोन वाटांऐवजी जर डावीकडील वाटेने गेल्यास पुढे कातळात खोदलेल्या १८ ते २० गुहा लागतात. यापैकी काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत. शेवटच्या गुहेत पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. इंद्राई किल्ल्यावरुन राजधेर, कोळधेर, चांदवड, धोडप ईखारा हा परिसर दिसतो.

छायाचित्रे[संपादन]

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

चांदवडहून राजधेरवाडीकडे जाणारी बसने चांदवड पासून ६ किलो मीटर अंतरावर असणाऱ्याया वडबारे गावात उतरावे. येथून किल्ल्यावर जाणारी एक ठळक पायवाट आहे. गावातून किल्ल्यावर पोहोचण्यास ३ तास पुरतात.

सूचना[संपादन]

राहण्यासाठी गुहा आहेत. पाण्याची बारमाही सोय टाक्याच्या स्वरूपात आहे. खाण्याची सोय स्वतः करावी.

हे सुद्धा पहा[संपादन]