अहिवंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अहिवंत हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.


अहिवंत
नाव अहिवंत
उंची ४००० फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव वणी
डोंगररांग सातमाळ
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


अहिवंत किल्ला अजंठा सातमाळ विभागात येतो. त्यामुळे नाशिकमार्गे, मनमाडमार्गे, अथवा गुजरातमधील सापुतारा मार्गे या किल्ल्यावर जाता येते.

जानेवारी १६८० च्या पत्रातील मजकुरा नुसार अहिवंत किल्ला मोरोपंत यांनी घेतला. अहिवंत किल्ला म्हणजे दुसरा पन्हाळा असा उल्लेख केला जातो.

छायाचित्रे[संपादन]

गडावरील ठिकाणे[संपादन]

गडाचा माथा फार मोठा आहे. संपूर्ण माथा फिरण्यास एक आख्खा दिवस लागतो. किल्ल्याच्या सोंडा पूर्व, पश्चिम, वायव्य आणि ईशान्येकडे मोठया प्रमाणात पसरलेल्या आहेत. किल्ल्याच्या ईशान्य बाजूस एक गुहा आहे. पण ती राहण्यास योग्य नाही. दक्षिण बाजुला असणाऱ्या कड्यामधील गुहा राहण्यास योग्य आहे. या गुहेपासून १० मिनिटाच्या अंतरावर पिण्याच्या पाण्याचे एक टाके आहे. दरेगावच्या बाजूने किल्ल्यावर पोहोचल्यास दोन पडक्या दरवाज्यांचे अवशेष दिसतात. आजूबाजुला अनेक मोठ्या पडक्या वाड्यांचे अवशेष पडलेले आहेत. यावरून हा किल्ला लष्कराचे मोठे ठाणे असावे असे वाटते. अनेक ठिकाणी महादेवाच्या पिंडी पण आहेत. याबाजूच्या वाटेने किल्ल्यावर जाताना कोरलेल्या अनेक गुहा आढळतात. सध्या त्यांचा उपयोग मात्र गोठ्यासाठी होतो. गडावर फिरताना २-३ पाण्याची तळी दिसतात. एका मोठ्या तळ्यापाशी देवीची एक मोठी मूर्ती आहे. या मूर्तीचे सप्तशृंगी देवीच्या मूर्तीशी असलेले साम्य जाणवते.

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

नाशिक मार्गे : नाशिकमार्गे वणी. वणीहून नांदुरी रस्त्यावर गेल्यावर या किल्ल्याचे दर्शन होते. नांदुरी रस्त्याच्या अलीकडे १ कि.मी. अंतरावर एक ठळक वाट डावीकडे असणाऱ्या डोंगरसोंडेपर्यंत जाते. येथून वर चढून गेल्यानंतर रस्ता एका खिंडीत पोहोचतो. समोर जंगलात शिरणारी वाट थेट गडाच्या पायथ्याशी जाते. खिंडीपासून गडावर जाण्यास एक तास लागतो.

गडावरील राहायची सोय[संपादन]

गडावरील खाण्याची सोय[संपादन]

गडावरील पाण्याची सोय[संपादन]

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

मार्ग[संपादन]

जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन]

संदर्भ[संपादन]

सांगाती सह्याद्रीचा

डोंगरयात्रा - आनंद पाळंदे

गडकिल्ले महाराष्ट्राचे - प्रमोद मांडे

हे सुद्धा पहा[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]