माहिम किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(माहीम किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.
माहीमचा किल्ला

माहीमचा किल्ला हा माहीम, मुंबई, येथे माहीमच्या खाडीजवळ आहे. ह्या किल्ल्याच्या दक्षिणेला वरळी असून उत्तरेला वांद्रे आहे. हा किल्ला सध्या सभोवतालच्या झोपडपट्यांमुळे व सततच्या अतिक्रमणामु़ळे सुस्थितीत नाही, दुर्लक्षिल्यामुळेही वास्तूची स्थिती दयनीय झाली आहे.

इतिहास[संपादन]

महिकावतीच्या बखरीत माहिमचा उल्लेख आला आहे, जेंव्हा केळवे माहिम ह्या राजधानीच्या गावातील बिंब राजाची सत्ता शिलाहारांनी नष्ट केली तेंव्हा बिंब राजाने मुंबईतल्या माहिममध्ये दुसरी राजधानी वसवली .


इ.स. १५१६ मध्ये पोर्तुगीज अधिकारी दॉम होआव दे मोनो याने माहीमच्या खाडीत प्रवेश केला आणि माहीमचा किल्ला जिंकून घेतला. या किल्ल्याच्या ताब्यासाठी गुजरातच्या अली शाह आणि पोर्तुगीजांमध्ये खूप चकमकी झाल्या. शेवटी पोर्तुगीजांनी हा किल्ला इ.स. १५३४ मध्ये जिंकून घेतला. हाच किल्ला पुढे इ.स. १६६१ मध्ये पोर्तुगीजानी राजकन्येच्या लग्नात हुंडा म्हणून इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सला दिला.[ संदर्भ हवा ] हा किल्ला ताब्यात असणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते, कारण हाच किल्ला त्यांना पोर्तुगीजांच्या आणि नंतर मराठ्यांच्या आक्रमणापासून संरक्षण देऊ शकत होता.

छायाचित्रे[संपादन]

संदर्भ[संपादन]