Jump to content

कमळगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कमळगड

कमळगडावरील गेरूची भिंत व जिना
नाव कमळगड
उंची ४२०० फूट
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण सातारा, महाराष्ट्र
जवळचे गाव नांदगणे,वाई,महाबळेश्वर
डोंगररांग महाबळेश्वर
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


कमळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. याचे नाव काहीजण कमालगड असे उच्चारतात आणि तसेच लिहितात.

महाबळेश्वरच्या डोंगररांगांनी अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केले आहेत. वाई परगण्यातील एक उत्तुंग गिरिदुर्ग आहे, जावळी मोहिमेच्या आधी हा गड छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात घेतला, नंतरच्या काळात सतत हा गड पायदळ सेनानी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची नोंद सापडते

छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात सुद्धा हा गड स्वराज्यात होता अन् किल्लेदार हे पिलाजी गोळे असल्याचे पुरावे सापडतात

स्थान[संपादन]

धोम धरणाच्या जलाशयात मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली दिसते. दोन्ही अंगानी पाण्याचा वेढा असलेल्या या पर्वतराजीत हे एक अनोखे पाषाणपुष्प वर आले आहे. दक्षिणेकडे कृष्णा नदीचे खोरे आणि उत्तरेकडे वाळकी नदीचे खोरे यांच्या मधोमध हा दिमाखदार किल्ला उभा आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे[संपादन]

पंधरा वीस मिनिटांच्या भ्रमंतीनंतर गडाच्या निकट पोहचता येते. वर जाताच गडमाथ्याच्या सपाटीवर प्रवेश होतो आणि आजुबाजूचा डोंगरदऱ्यांचा सुंदर मुलूख दृष्टिपथात येतो. अन्य किल्ल्यावर आढळणारे किल्ल्यांवरील प्रवेशद्वार, बुरूज असे काहीच येथे आढळत नाहीत.

गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. तिला नवरानवरीचे डोंगर म्हणतात. पुढे जमीन खोल चिरत गेलेले ४०-५० फूट लांबीचे एक रुंद भुयार दिसते. त्याला आत उतरायला मजबूत पायऱ्याही आहेत. हिला गेरूची किंवा कावेची विहीर म्हणतात. या ५० - ५५ खोलखोल पायऱ्या उतरत जाताना आपण डोंगराच्या पोटात जात असल्यासारखे भासते. हवेतील थंडावाही वाढत जातो. तळाशी पोहचल्यावर चहुबाजूला खोल कपारी असून सर्वत्र गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती दिसते.

गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झाली आहे. तिच्यावर बुरुजाचे थोडेफार बांधकाम झाले आहे. गडावर कोठेही पाण्याचे टाके नाही. दक्षिणेकडेच गवतात लपलेले चौथऱ्यांचे अवशेष दिसतात. नैर्ऋत्येला केंजळगड, त्याच्या मागे रायरेश्वराचे पठार, कोळेश्वर पठार व पश्चिमेकडे पाचगणी, पूर्वेला धोम धरण अशी रम्य सोबत कमळगडाला मिळाली आहे. धोमचे हेमाडपंती शिवमंदिर प्रेक्षणीय आहे. हे मंदिर धोम ऋषींच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध झाले.

जवळच मराठी कवी वामन पंडित यांची भोमगावाला समाधी आहे.

कमळगडावरील कोरीव शिड्यांचे बांधकाम

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

कमळगडावर जाण्याचे अनेक मार्ग आहेत. ते सर्वच ट्रेकिंगचा मनमुराद आनंद देणारे आहेत.

  • १) महाबळेश्वरहून :-
    महाबळेश्वरच्या केट्स पॉईंटवरून खाली येणाऱ्या सोंडेवरून कृष्णा नदीच्या खोऱ्यात उतरले की सुमारे दोन तासांत समोरच्या डोंगर उतारावरील नांदगणे गावी पोहचता येते. वस्तीच्या पाठीवरील पहाडावरून तसेच वर गेले की दोन अडीच तासांत आपण कमळगडावर पोहचतो.
  • २) वाईहून :-
    वाईहून नांदगणे गावी येण्यास सकाळी ९.३० वाजता एस.टी. बस आहे.
  • ३) इतर गावांतूनः-
    उत्तरेकडून वाळकी नदीच्या खोऱ्यातील असरे, रानोला वासोळे गावी वाईहून एस.टी. बसने येता येते.

वासोळ्याहून येताना धोम गावापासून सुरू झालेला धोम धरणाचा जलाशय थेट गावापर्यंत साथ देतो. वासोळे गावातून पाणवठ्याच्‍या दिशेने चढण्यास सुरुवात केली असता साधारण एक ते दीड तासातच गडाच्या माचीजवळ येता येते.

वासोळे गाव हे डोंगराच्या कुशीत वसलेले व निसर्गसौंदर्याने नटलेले असे सुंदर खेडे आहे. वस्तीच्या पाठीवर उत्तुंग कडा व डोंगरमाथा आहे, दुसऱ्या अंगाला खोल दरी आहे. पुढे गेल्यावर यू टर्न घेतला आणि तसेच चालत राहिले की पाऊण तासानंतर किल्ल्याचा मुख्य पहाड लागतो. डोंगरमाथ्यावरील घनदाट वृक्षांच्या छायेत गोरखनाथ मंदिर दिसते. येथून थोडे पुढे ५ - १० मिनिटे चालत गेल्यावर रस्त्याच्या डाव्याबाजूला एक पाण्याचे टाके लागते. पाऊलवाटेने तसेच वर गेले की १५ - २० मिनिटांचा घनदाट जंगलाचा छोटा टप्पा लागतो. नंतर मात्र एक मोकळे मैदान लागते. येथे धनगरांची वस्ती आहे. याच पठारावरून कमळगड पूर्णपणे दृष्टिपथात येतो. वस्तीपासून उजवीकडे गडावर जाण्याची वाट आहे.

राहण्याची सोय[संपादन]

गडावर रहाण्याची सोय नाही. माचीवरील गोरखनाथ मंदिरात पाच - सहा जण राहू शकतात.

जेवणाची सोय[संपादन]

पाण्याची सोय : गडावर नाही, गोरखनाथ मंदिराच्या थोडे पुढे छोटे टाके आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन]

नांदगणे मार्गे अडीच तास. Vasole तुपेवाडी मार्गे दीड तास लागतो

संदर्भ[संपादन]