वाघेरा किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वाघेरा किल्ला
नाव वाघेरा किल्ला
उंची
प्रकार
चढाईची श्रेणी सोपा
ठिकाण नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव
डोंगररांग कळसुबाई
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}

वाघेरा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा पुण्याहून २९० कि.मी. पुणे - नाशिक - हरसू - थानपाडा - खैरपाली या मार्गावर आहे.

इतिहास[संपादन]

गडावरील ठिकाणे[संपादन]

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

रामसेज किल्ला पुन्हा नासिककडे येताना म्हसरूळनजीक जैन चांभारलेणी आहेत. वेळ असल्यास ती जरूर पाहून घ्यावीत. म्हसरूळकडून एक रस्ता थेट वाघेऱ्यापर्यंत जातो. वाघेरा घाटमाथ्यावरचं गाव आहे. गावाच्या समोरच एक मोठा बंधारा व जलाशय आहे. जलाशयाच्या पाठी उभा आहे उंच वाघेरा. वाघेऱ्याचे कडे थेट घाटाखाली उतरलेले आहेत. धरणाच्या पाण्यावर व सुपीक जमिनीवर शेती करणाऱ्या गावकऱ्यांना वाघेरा किल्ल्याचा रस्ता विचारायचा. वाघेरा जलाशयाचा बांध उजवीकडे जिथे वाघेऱ्याच्या सोंडेला चिकटलेला वाटतो, त्या डोंगरधारेवरून गडावर चढाई करायची. घाटाखाली उतरलेल्या गडाच्या उंचच उंच कातळभिंती उजवीकडे ठेवत गडाची माची गाठायची. पाठीवर सामान नसल्यास माची गाठायला एक तास पुरे. माचीवरून वाघेऱ्याचा उंच सुळकेवजा उंचवटा, गडमाथा दिसतो. दहा-एक मिनिटांच्या सोंडेवरील सपाट चालीनंतर गडाच्या सुळकेवजा गडमाथ्याला भिडायचं. इथे पाण्याची कोरडी टाकी आहेत. इथून गडमाथा गाठायला दोन वाटा आहेत. गडमाथा डावीकडे ठेवत वळसा घालून चढणारी निसरडी वाट अथवा सोपं १० फुटाचे प्रस्तरारोहण करून सरळ वर चढणारी कातळाची वाट. कोणत्याही वाटेने गडाचा सुळकेवजा माथा गाठावे.अंजनेरी, ब्रह्मगिरी आणि आजुबाजूच्या परिसरावर नजर फिरवायची आणि परतीला लागावे. वाघेरा गावातून गडमाथा गाठायला आणि स्थलदर्शनासाठी दोन तास पुरे. गडावर पाणी नसल्याने वा सावलीसाठी झाड नसल्याने सोबत आणलेलं पाणी प्यायचं आणि आल्या वाटेने गड उतरावा.

मुक्काम[संपादन]

एका दिवसात रामसेज किल्ला, वाघेरा किल्ला, आणि खैराई किल्ला हे तिन्ही किल्ले पाहून मुक्कामाला त्र्यंबकेश्‍वर वा अंजनेरी गाठता येते.

छायाचित्रे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]