Jump to content

राजकोट किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजकोट किल्ला (मालवण) येथील स्मारक

राजकोट किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.[]

भौगोलिक स्थान

[संपादन]

महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या गावात हा किल्ला आहे.

कसे जाल ?

[संपादन]

इतिहास

[संपादन]

राजकोट किल्ल्याची उभारणी शिवाजी महाराजांनी इ.स १६६४ ते १६६७ च्या दरम्यान केली. सन १७६६ मध्ये इंग्रज व करवीरकर यांच्यात झालेल्या तहानुसार राजकोट किल्ल्यात इंग्रजांनी वखारीसाठी व मोठ्या जहाजांना उभे रहाण्यासाठी परवानगी मागितली होती. १८६२ मध्ये किल्ल्यात काही इमारतींचे अवशेष, तुटलेली तटबंदी व एक तोफ असल्याचा उल्लेख आहे.[]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]
  • शिवाजी महाराज यांचा पुतळा-भारतीय नौदलाने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हे एक आकर्षण या किल्ल्यावर पहायला मिळते. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.[]

तीन बाजूंनी पाणी(समुद्र) व एका बाजूला जमिन असलेल्या ह्या किल्ल्यावर एक बुरुज सोडल्यास कोणतेही अवशेष नाहीत. ह्या बुरुजावरून सिंधुदूर्ग किल्ला व अजुबाजुचा परिसर दिसतो.

  • शिवाजीरॉक गार्डन: राजकोटच्या आसपास असलेल्या खडकाळ भागात रॉक गार्डन बनवण्यात आले आहे.


  • शिवाजीगणेश मंदिर: राजकोटहून मालवणला जाताना वाटेत सुवर्ण(सोन्याच्या) गणेशाचे मंदिर आहे.


  • शिवाजीमौनी महाराज मंदिर: शिवाजी महाराजांनी उभारलेले जांभ्या दगडातील मौनी महाराजांचे मंदिर मेढा राजकोट या भागात आहे.

संदर्भ

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]


  1. ^ "सिंधुदुर्ग : राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी राज्‍यभरातील नागरिकांची गर्दी | पुढारी". pudhari.news. 2024-05-27 रोजी पाहिले.
  2. ^ Sajnani, Manohar (2001). Encyclopaedia of Tourism Resources in India (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 978-81-7835-018-9.
  3. ^ author/maheshvidyanandsarnaik (2023-10-27). "राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा उद्या मालवणमध्ये येणार". Lokmat. 2024-05-27 रोजी पाहिले.