Jump to content

मदनगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मदनगड

नाव मदनगड
उंची
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी
ठिकाण नाशिक, महाराष्ट्र
जवळचे गाव
डोंगररांग
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


मदनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.[]

हा किल्ला इगतपुरीजवळ आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या डोंगररांगांमध्ये अलंग आणि कुलंग गडांच्या मधोमध मदनगड स्थित आहे.

कसे जाल ?

[संपादन]
दगडी जिने

मदनगड हा किल्ला अलंग आणि कुलंग गडांच्या मध्ये असून दोन्ही गडावरून मदनगडावर जाण्यासाठी वाट आहे. दोन्ही गडावरून मदन गडाच्या पायथ्याशी आल्यानंतर येथून पुढे जाण्यासाठी प्रस्थरारोहणाच्या सहाय्याने काही फुट वर गेल्यावर दगडी जिने लागतात. हे जिने चढून गेल्यावर आपण किल्ल्यावर पोहोचतो.

इतिहास

[संपादन]

मदन गडाचा नेमका इतिहास काय होता हे शोधण्याचा प्रयत्न अथवा काम चालू आहे... या गडाचा इतिहास हा लवकरात लवकर आपणा सर्वांपुढे आणू अशी मी आशा बाळगतो.... विशाल भवार

छायाचित्रे

[संपादन]

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

[संपादन]

मदन गडावर पोहोचल्यावर समोरच पाण्याचे टाके लागतात. हे पाणी पिण्यायोग्य आहे. येथून पुढे वर गेल्यावर दगडातून कोरलेल्या गुहा आहेत. हा भाग बालेकिल्ला असावा. ह्या गडाचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा असे या गडाच्या स्थितीवरून वाटते.

गडावरील राहायची सोय

[संपादन]

मदनगडावर राहाण्यासाठी गुहा आहेत व तेथील पिण्याच्या टाक्यांमधुन पिण्याच्या पाण्याची सोय होते व पायथ्याच्या गावांतून वाटारी (मार्गदर्शक) घेतल्यास ते आपल्यासाठी गडावर जेवणही बनवून देतात.

गडावरील खाण्याची सोय

[संपादन]

पायथ्याच्या गावांतून वाटारी (मार्गदर्शक) घेतल्यास ते आपल्यासाठी गडावर जेवणही बनवून देतात.

गडावरील पाण्याची सोय

[संपादन]

गडावर पाण्याची टाकी आहेत. हे पाणी पिण्यायोग्य असून बाराही महिने पुरेल इतके पाणी येथे आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

सांगाती सह्याद्रीचा

डोंगरयात्रा - आनंद पाळंदे

हे सुद्धा पहा

[संपादन]


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "थरारक मदनगड". Maharashtra Times. 2021-08-26 रोजी पाहिले.