पांडवगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.
पांडवगड
नाव पांडवगड
उंची ४१८५ फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण सातारा, महाराष्ट्र
जवळचे गाव मेणवली, गुंडेवाडी
डोंगररांग महाबळेश्वर
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


पांडवगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

सातारा जिल्ह्यातील वाई तालुका हा कृष्णा नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे. कृष्णा नदीच्या उत्तरबाजूस रायरेश्वरापासून निघणारी महादेव रांग आहे. सह्याद्रीच्या या उपरांगेतील एका शृंगावर पांडवगड नावाचा किल्ला बांधलेला आहे. शिलाहार राजा भोज याने सातारा जिल्ह्यात जे काही दुर्ग बांधले त्यांतला पांडवगड हा एक आहे.

समुद्रसपाटीपासून १२७३ मीटरची उंची (४१७०फूट) असलेल्या पांडवगडाला जाण्यासाठी वाईमध्ये दाखल व्हावे लागते. वाई हे पुणे-बंगलोर या महामार्गाच्या पश्चिमेला आहे.

चढाई मार्ग[संपादन]

पांडवगडाला जाण्यासाठी दोन मार्ग सध्या प्रचलित आहेत. दक्षिणेकडील म्हणजे मेणवली मार्गे असलेला मार्ग खड्या चढाईचा असून दमछाक करणारा आहे. तर उत्तरेकडील धावडी गावाच्या हद्दीतून जाणारा मार्ग तुलनेने सोपा आहे. वाई मांढरदेव मार्गावर धावडी हे गाव आहे. वाईहून ७ किलोमीटरवर.

गड[संपादन]

पांडवगडाच्या उत्तर अंगाला असलेल्या भग्न दरवाजाने गडामध्ये प्रवेश होतो. वाटेमध्ये पाण्याची दोन टाकी आहेत. गडामध्ये हनुमंताचे मंदिर आहे. मंदिर बांधलेले नसल्यामुळे मूर्ती उघड्यावर आहे. गडावर गडाची देवी पांडवजाईचे मंदिर आहे. गडाच्या चारही बाजूंना नैसर्गिक कातळकडे असल्यामुळे गडावर फारशी तटबंदी बांधलेली नाही. गडाचे गडपण दाखविणारी घरांची जोती तसेच कोरडी पडलेली पाण्याची टाकी आढळतात.

पावसाळा संपला की गडावर बेसुमार पुरुषभर उंचीचे गवत माजते. पायवाटही झाकून जाते. वाट शोधून तीवरून चालताना साऱ्या अंगाला कुसळी काटे टोचू लागतात. पायांत चांगले बूट असल्याखेरीज गडावर येणे धोक्याचे आहे. गडावर असलेले पांडजाईचे मूळ मंदिर पडून गेले आहे, नवीन पडायला आले आहे. मूर्तीची सुद्धा झीज झाली आहे. मंदिरात जागोजाग मोठाल्या पाली नजरेस पडतात. त्यांचे रानटी रूप पाहून अंगावर काटा येतो.

गडावरून धोम धरणाचा जलाशय सुरेख दिसतो. जलाशयामागे कमलगडाचा उंचावलेला माथा दिसतो. त्यामागे महाबळेश्वराचे तसेच पाचगणीचे पठार ओळखू येते. पांडवगडाच्या माथ्यावरून खाली वाई तसेच कृष्णा नदीही दिसते. केंजळगड, मांढरदेव, चंदन वंदन किल्ले तसेच वैराटगड सुद्धा पहाता येतात.

इतिहास[संपादन]

साधारणपणे इसवी सन ११७८ ते ११९३ या काळात राजा भोजाने हा किल्ला बांधला असावा. पुढे तो आदिल्शाहीत गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये स्वराज्यात आणला, आणि १७०१ मध्ये तो मोगलांकडे गेला. अखेर मेजर थॅचरने १८१८मध्ये तो कंपनी सरकारच्या ताब्यात आणला.