चंदेरी किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चंदेरी किल्ला
नाव चंदेरी किल्ला
उंची 2300 फूट
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण ठाणे, महाराष्ट्र
जवळचे गाव चिंचोली
डोंगररांग नाखिंड, चंदेरी, म्हसमाळ नवरी बोयी
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.गडावर जाण्यासाठी चिंचोली गावातून 3 तास लागतात.आपण जर नवीन असाल तर सोबत गावातून वाटाड्या गगरून जाणे गरजेचे आहे.प्रवास पूर्ण जंगलातून असल्याने खूप मज्जा येते.वर गेल्यावर प्रथमतः गुहा लागते तिथं मंदिर आहे.तिथुन वर सुळक्यावर जाण्याचा मार्ग अवघड आहे.माहीत असेल तर जावे.वर गेल्यावर महाराजांची 3 फूटच्या आसपास पितलेची मूर्ती आहे.गडावर रात्री मुक्काम जास्त कोणी करत नाही.पूर्णपणे जंगल आहे म्हणून प्राणी वगैरे असतात.सकाळी 7च्या पुढं गडावर जाण्यासाठी सुरुवात करावी. रात्री कोणीही ट्रेक करू नये.रस्ते सापडत नाही.

नाखिंड, चंदेरी, म्हसमाळ नवरी बोयी या डोंगररांगेतील एक व पनवेलच्या प्रभागमंडळाचे मानकरी असणाऱ्या कर्नाळा, प्रबळगड, इरशाळगड, माणिकगड, पेब, माथेरान आणि अशा कितीतरी गडांपैकी एक म्हणजे चंदेरी होय. चंदेरीच्या पायथ्याशी असलेली घनदाट वृक्षराजी, गवताळ घसरडी वाट अन् मुरमाड निसरडा कातळमाथा म्हणजे सह्याद्रीतील एक बेजोड असा हा कठीण परिसर आहे. तामसाई गावाच्या हद्दीत असणारा असा हा दुर्ग प्रस्तरारोहण कलेची आवड असणाऱ्या गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहे.

तसा किल्ला छोटा आहे पण रस्ता पूर्ण जंगलातून असल्याने फारसे तिथं कोणी जात नाही.वर जायला उशीर लागला तरी आपण 1 तास मध्ये वर पूर्ण बगू शकतो .वर पहाण्यासाठी काही जास्त नाही. गडाचा टेहाळणी बुरुज किंवा तुरूंग म्हणून वापर केला जात होता.गडावर कोणत्याही प्रकारची वास्तू सध्या तरी आढळून येत नाही.

●इतिहास;-खरे तर रायगड जिल्ह्याचे दुर्गभूषण शोभणारा हा किल्ला असूनही तसे नाव घेण्याजोगे इथे काही घडले नाही. किल्ल्यावरील गुहेच्या अलिकडे एक पडक्या अवस्थेतील शेष तटबंदी दिसते. किल्लेपणाची हीच काय ती खूण. मे १६५६ मध्ये शिवरायांनी कल्याण भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलुख घेतला. तेव्हा त्यात हा गडही मराठ्यांच्या ताब्यात आला अल्प विस्तार, पाण्याची कमी साठवणूक, बांधकामाचा अभाव मर्यादित लोकांची मुक्कामाची सोय. अतिशय अवघड वाट हे सारे पाहून हा किल्ला नसून एक लष्करी चौकी असेच वाटते. काही जणांच्या मते ७ ऑक्टोबर १९५७ रोजी चंदेरी किल्ल्याच्या सुळक्यावर संघटित प्रस्तरारोहणाचा प्रारंभ झाला.

●लागणारा वेळ:-3तास

●योग्य वेळ:-जून-जुलै मध्ये आपण येऊ शकता तेव्हा

        वातावरण सुंदर असते.तसे आपण केव्हा ही जाऊ शकता. पूर्णपणे जंगल असल्याने सावली असते.

●गडावर जाण्याच्या वाटा मुंबई-कर्जत लोहमार्गवरील ‘वांगणी’ या रेल्वे स्थानकावर उतरावे. तेथून लोहमार्गाच्या कडेकडेने (बदलापूरच्या दिशेस) जाणाऱ्या वाटेने गोरेगाव गाठावे. मुख्य रस्त्यावरून डावीकडे जाणारी वाट (कच्ची सडक) चिंचोली या पयथ्याच्या गावी घेऊन जाते. बदलापूर स्थानकात उतरून चिंचोलीस साधारण पाऊण तासाची पायपीट करूनही पोहचता येते. (वांगणी स्थानकातून गोरेगाव पर्यंत जाण्यास भाड्याची वाहनेही मिळतात.) चिंचोली गावास उजवीकडे ठेवून वर जाणाऱ्या दोन वाटा आहेत. एका लहानशा टेकाडाच्या दोन बाजूंनी ह्या वाटा जातात

●मुक्कामाची सोयः-गुहेत ६ ते १० जणांची राहण्याची सोय आहे. पाण्याची सोय ऑक्टोबर शेवटपर्यंत पावसावर अवलंबून असते. तसेच टाक्यांत पाणी असते.