सुवर्णदुर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुवर्णदुर्ग
नाव सुवर्णदुर्ग
उंची 1400
प्रकार जलदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र
जवळचे गाव दापोली, हर्णे
डोंगररांग 5000
सध्याची अवस्था चांगली
स्थापना {{{स्थापना}}}


सुवर्णदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

प्रवेशद्वार

हर्णे बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. सुवर्णदुर्ग[१] या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग[२], फत्तेदुर्ग आणि गोवागड [३].

राष्ट्रीय संरक्षित स्मारक[संपादन]

भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[४]

कसे जाल?[संपादन]

मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या खेड फाट्यावरून दापोली आणि पुढे दापोलीहून बसने हर्णेला जाण्यासाठी बससेवा आहे. हर्णे बस स्थानकावरून साधारण १०-१५ मिनिटांत पायी हर्णे बंदर गाठता येते. मुंबई एअरपोर्ट वरून 250 किलोमीटर अंतर हर्णे बंदर आहे मुंबईवरून रेल्वे येण्याची सोय आहे मुंबई ते खेड रेल्वे स्टेशन येऊन नंतर बसने दापोली नंतर दापोली मधून बसने हर्णे बंदर जाता येते.

बंदरावरून किल्ल्यात जाण्यासाठी स्थानिक मच्छीमार संघटनेने छोटे पडाव ठेवले आहेत. होडीतून सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी साधारण २० मिनिटे लागतात. ऐन सागराच्या कुशीत वसलेल्या या जलदुर्गावर आज पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने सोबत पाणी घेऊन जावे.

पाहण्यासारखे[संपादन]

दुर्गाचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून उत्तराभिमुख आहे. हे प्रशस्त प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतले आहे. महाद्वाराजवळ पोहोचताच पायरीवर कासवाची प्रतिमा कोरलेली आहे. उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. ही मूर्ती त्या मानाने अर्वाचीन असावी. प्रवेशद्वारातून आत शिरताच पहारेकऱ्यांच्या दोन देवड्या दिसतात. या देवड्यांच्या दोन्ही बाजूने तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. डाव्या हाताने पुढे गेल्यावर बांधीव विहीर आणि पुढे राजवाड्याचे दगडी चौथरे आहेत. किल्ल्यात दक्षिणेकडे भक्कम बांधणीचे एक कोठार आहे. सुवर्णदुर्गाच्या भक्कम तटबंदीवरून शेवाळ्याने हिरवे पडलेले पाणी असलेल्या विहिरी आणि पडझड झालेले वाड्याचे अवशेष दिसतात.

दुर्गाच्या पश्चिम तटाकडे एक सुरेख चोरदरवाजा आजही सुस्थितीत असलेला दिसतो. गडावर सात विहिरी आहेत, पण कुठेही मंदिर नाही. प्रसिद्ध दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांची कुलदेवता कालंबिका देवी हिचे इथले देऊळ कान्होजीने केव्हातरी सुवर्णदुर्गावरून हलवून देवीची स्थापना अलिबागच्या हिराकोटामध्ये केली होती. इ.स. १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी आणि पुनर्रचनेसाठी दहा हजार दोन रुपये खर्च केले असा ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ दापोली, तालुका. "सुवर्णदुर्ग". Taluka Dapoli (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2019-03-31. 2019-03-31 रोजी पाहिले.
  2. ^ दापोली, तालुका. "कनकदुर्ग, हर्णे". Taluka Dapoli (इंग्रजी भाषेत). 2019-03-31 रोजी पाहिले.
  3. ^ दापोली, तालुका. "गोवा किल्ला, हर्णे". Taluka Dapoli (इंग्रजी भाषेत). 2019-03-31 रोजी पाहिले.
  4. ^ "गॅझेट नोटिफिकेशन" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2016-03-07. ११ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाहय दुवे[संपादन]