कर्नाळा अभयारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Wikitext.svg
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.


पनवेल शहराजवळील कर्नाळा किल्याआसपासचा परिसर पक्ष्यांच्या वैविध्यतेसाठी प्रसिद्ध आहे व या परिसराची कर्नाळा अभयारण्य म्हणून सरंक्षित आहे.

कर्नाळयाला एका वर्षात सुमारे १२५-१५० जातीचे पक्षी आढळतात. सुमारे ४ चौरस कि. मी. च्या परिसरात पक्षी अभयारण्य उभारले आहे. मुंबईपासून ६२ कि. मी. अंतरावर पाताळगंगेच्या खोऱ्यात आपटे-कल्हाया, रानसई -चिंचवण गावाच्या पंचक्रोशीत अभयारण्य वसलेले आहे. या ठिकाणी आपण केव्हाही गेलात तरी पाचपन्नास निरनिराळे पक्षी आढळतात. मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फलाय कॅचर,भोरडया, तांबट, कोतवाल,पाढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ शाहीनससाणा, टिटवी, बगळे असे अनेक पक्षी आढळतात. अभयारण्यात तीन थरांचे जंगल आढळते. तळातील भागात दिंडा, वावडिंग, कारवी अशी झुडपे आहेत. मध्य भागात पांगारा, बहावा, तामण, यांचे प्रमाण जास्त आहे तर उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा, आईन हे वृक्ष आढळतात. पक्ष्यांव्यतिरिक्त भोकरे, रानमांजर, माकडे,ससे इत्यादी प्राणीही आढळतात.

हे अभयारण्य रायगड जिल्हयात पनवेल तालुक्यात असून ते मुंबईपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे.[ संदर्भ हवा ] कर्नाळा येथे निरनिराळया प्रकारचे वृक्ष असून येथे १५० जातींचे पक्षी आढळतात. यात मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज इत्यादी जातींचे पक्षी आढळतात. येथील कर्नाळा किल्ला प्रसिद्ध आहे. मुंबईठाणे येथील पर्यटक येथे नेहमी येतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.