इर्शाळगड
इर्शाळगड | |
इर्शाळगडाचे शिखर | |
गुणक | 18°56′01″N 73°13′55″E / 18.9336°N 73.2320°E |
नाव | इर्शाळगड |
उंची | ३७०० फूट |
प्रकार | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी | अत्यंत कठीण |
ठिकाण | रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | कर्जत |
डोंगररांग | माथेरान |
सध्याची अवस्था | |
स्थापना | {{{स्थापना}}} |
इर्शाळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
इर्शाळगड हा कर्जत विभागात येतो. कर्जत, मलंगगड, प्रबळगड हे सर्व कोकणात येणारे किल्ले आहेत. कल्याण - पुणे लोहमार्गावरून जाताना मलंगगड, देवणीचा सुळका, माथेरान, पेब, म्हसमाळ, प्रबळगड, इरशाळगड हा परिसर सर्वांचे लक्ष वेधून घेतो. सर्वसामान्य जनजीवन असणाऱ्या या भागात मुबलक पावसामुळे भाताची शेती फार मोठ्या प्रमाणावर होते. महामार्गापासून गड जवळच असल्याने पायथ्याच्या गावापर्यंत वाहनाची सोय होते.
इतिहास
[संपादन]इर्शाळगडाचा तसा इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. मे १६६६ मध्ये शिवरायांनी कल्याण-भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलुख घेतला तेव्हा त्यामध्ये हा गड देखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे निकटवर्तीय नेताजी पालकर यांचा जन्म इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक या गावी झाला.[१]
गडावरील ठिकाणे
[संपादन]तसे गडावर पाहण्यासारखे काही नाही. मात्र प्रस्तरारोहणाचा आनंद मात्र अवर्णनीय आहे. गडावरती एक मोठी गुहा आहे पण त्या गुहेमध्ये जाण्याचा मार्ग खूप जीवघेणे आहे.पाणी साठा कुंड आहेत.
गडमाथ्यावरून प्रबळगड, माथेरान, चंदेरी मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो.
इतर
[संपादन]जेवणाची सोयः इरशाळवाडीत ५-६ लोकांची सोय होऊ शकते.
पाण्याची सोयः मार्च पर्यंत गडावरील टाक्यात पाणी असते.
पोहोचण्यासाठी लागणारा वेळः इरशाळवाडीतून १ तास.
सूचना: अतिकठीण चढण असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. शिवाय, १०० फुटी दोरी व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असणे आवश्यक आहे.