कण्हेरगड
कण्हेरगड | |
नाव | कण्हेरगड |
उंची | |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | |
ठिकाण | नाशिक, महाराष्ट्र |
जवळचे गाव | |
डोंगररांग | सातमाळ |
सध्याची अवस्था | |
स्थापना | {{{स्थापना}}} |
कण्हेरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.[ चित्र हवे ] नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुका आहे. हा भाग पूर्वी बागलाण म्हणून ओळखला जात असे. आजही अनेकदा याचा उल्लेख बागलाण असा केला जातो.
इतिहास
[संपादन]औरंगजेबाच्या आदेशावरून दिलेरखान याने मोगल सैन्यासह या किल्ल्यावर हल्ला केला होता. त्या वेळी कण्हेरगडाचे किल्लेदार रामाजी पांगेरा हे होते. गडावर सुमारे सातशे मावळे होते. गडाला मोगल सैन्याने वेढा घातला होता. या वेढ्यावर अचानक हल्ला चढवण्याची व्यूहरचना किल्लेदार रामाजी पांगेरा यांनी आखली. मदतीची वाट पाहणे शक्य होते पण मदत वेढा भेदून आत येणे अशक्य होते. मोगल सैन्य संख्येने फार जास्त होते. या शिवाय किल्ला फार उंच नव्हता. त्यामुळे मोगल सैन्याचा वेढा पूर्ण होण्याच्या आत वेढा तोडणे आणि सैन्य उधळणे हा ही हेतू त्यात होता. तसे झाले तर पळत असलेल्या मोगल सैन्याची लांडगेतोड करता आली असती.
त्यामुळे पहाटेच्या अंधारात रामाजी पांगेरा यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी मोगलांच्या भल्यामोठ्या सैन्यावर हल्ला केला. यावेळी फक्त ७०० मावळे रामाजींसोबत होते. अचानक पडलेल्या छाप्याने मोगल सैन्य गोंधळले. सातशे मावळ्यांनी बाराशेच्यावर मोगल कापून काढले. पण तरीही संख्याबळाच्या जोरावर दिलेरखानाने पळणारे मोगल सैन्य थांबवले. मराठ्यांनी पराक्रमाची शिकस्त केली. संख्येने कमी असूनही मराठे मागे हटले नाही. सुमारे तीन तास कण्हेरगडाच्या परिसरात हे रणकंदन सुरू होते. रामाजी आणि त्याच्या मराठ्यांनी शौर्याची कमाल केली. प्रतिहल्ला झाल्यावर कोणतीही कुमक शिल्लक नसल्याने मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्राण दिले. सभासदाची बखर यात या लढाईविषयी लिहून ठेवलेले आहे, की "टिपरी जैसी सिमगीयाची दणाणते तैसे मराठे कडाडले.' सिमगीयाची म्हणजे शिमगा या सणात जशी टिपरी हलगीवर वारंवार कडाडते तसे मावळे तुटून पडले होते.