Jump to content

कलाडगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कलाडगड किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)
कलाडगड
नाव कलाडगड
उंची ११०० मीटर
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण नगर, महाराष्ट्र
जवळचे गाव पाचनई,राजूर,अकोले
डोंगररांग सह्याद्री
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


कलाडगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.[ चित्र हवे ]

भौगोलिक माहिती

[संपादन]

अकोले हा तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये असलेल्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेला चिकटून असलेला अकोले तालुका, हा डोंगरदऱ्यांमुळे निसर्गसंपन्न आहे. या डोंगरदऱ्यांमधे अनेक दुर्गम असे गिरिदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत.

याच दुर्गांच्या साखळीमध्ये साधले घाटाच्या माथ्यावर कलाडगड नावाचा काहीसा दुर्लक्षित दुर्ग उभा आहे. मुळा नदीच्या खोऱ्यावर आपली करडी नजर ठेवणारा कलाडगड समुद्रसपाटीपासून ११०० मीटर उंच आहे.

गडावर जाण्याचे मार्ग

[संपादन]

कलाडगडवर पोहोचण्यासाठी दोन-तीन मार्ग आहेत.

  • कलाडगडाच्या पायथ्याला पोहोचण्यासाठी आधी पाचनई हे लहानसे गाव गाठणे सोईचे ठरते. या पाचनईस येण्यासाठी अकोले तालुक्यामधील राजूर या गावी यावे. राजूरवरून काही ठरावीक एस.टी. बसेस पाचनईपर्यंत येतात.

पाचनई येथून तास दीडतासात चालत कलाडगडाच्या पायथ्याला पोहोचता येते. गडाच्या पूर्वेकडून गडावर जाणारा मार्ग आहे. पायथ्यापासून जवळच एक लहानशी वस्ती आहे. तेथून पुढे अर्ध्या तासावर पेठेची वाडी म्हणून छोटे गाव आहे.

ठाणे जिह्ल्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या बेलपाडा हया गावातून देखील कलाड गडावर जाता येते. बेलपाडा गावातून साधले घाट चढून येण्यास ७-८ तासांच्या पायपिटीचा रस्ता आहे, काही ठिकाणी कठीण चढाईचा रस्ता आहे. बेलपाडा गावातून साधले घाट चढून वर गेल्यावर घाटमाथ्यावारच आपल्याला डाव्याबाजूस डोंगर्रांगेपासून थोडा वेगळा असलेला पूर्व पश्चिम पसरलेला छोटेखानी हा गड दिसतो. आपल्याला ह्याची पश्चिम बाजू दिसते. घाट चढून आल्यावर पायवाट आपल्याला पाचनई - पेठेचीवाडी रस्त्याला येऊन मिळते. डावीकडे १५-२0 मिनिटे चालल्यावर आपण गडाच्या पूर्व सोडेकडून जाणारा मार्ग आहे तिथे पोहचतो. रस्त्याला उजवीकडे वळून १५-२0 मिनिटे चालल्यावर आपण हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याच्या पाचनई गावात पोहचतो.

किल्ल्याबद्दल व किल्ल्यावरून पाहण्यासारखी ठिकाणे

[संपादन]

कलाडगडाचा डोंगर एकांडा डोंगर आहे. मुळा नदी आणि हरिश्चंद्रगडावरून येणाऱ्या मंगळगंगा या नद्यांच्या बेचक्यात कलाडगड उभा आहे. गडावर चढणारी पूर्व अंगाच्या वाटेशिवाय दुसरी वाट नाही. गडाच्या पायथ्याशी पाण्याचे लहानसे कुंड आहे. उन्हाळ्यामध्ये मात्र पाण्याचा तुटवडा जाणवतो. गडावर जाणारी वाट बऱ्यापैकी मळलेली आहे. गडावरच्या भैरोबाला नमन करण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांची गडावर अधूनमधून हजेरी असते. काहीशी घसाऱ्याची वाट आहे. या वाटेवर काही कातळात कोरलेल्या खोबणीही आहेत. काही पायऱ्या चढून गडामध्ये प्रवेश होतो. पायथ्यापासून साधारण ४० ते ५० मिनिटांचे अंतर आहे. गडाचा आकार लांबुळका आहे. तो पूर्व-पश्चिम असा पसरलेला आहे. पूर्वेकडील भागातील कातळात एक गुहा आहे. या गुहेमधे भैरोबा आहे. डावीकडे कडा व उजवीकडे गडमाथा ठेवून गडाच्या पश्चिम अंगाला जाता येते. डावीकडील कड्यावर एक तटबंदी आहे. वाटेत पिण्यायोग्य पाण्याची टाकी आहेत. गडाच्या पश्चिम बाजूला एक अंगठ्यासारखा सुळका आहे. गडावर गडपणाचे काही तुरळक अवशेष दिसतात. कलाडगडाच्या माथ्यावरून हरिश्चंद्रगड, माळशेज घाट, मोरोशीचा भैरवगड, नानाचा अंगठा, साधले घाटाजवळचा नकटा डोंगर, कोंबडा डोंगर, आजोबाचा भव्य डोंगर, कुमशेतची लिंगी, घनचक्करचे पठार, घनचक्कर, भैरवगड, कुंजरगड तसेच कोथळ्याचा भैरवगड असा विस्तृत प्रदेश दिसतो. कलाडगड समुद्रसपाटीपासून ११०० मी. उंच आहे.

बाह्य दुवे

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]