Jump to content

वर्धनगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वर्धनगड
नाववर्धनगड
उंची१५०० फूट
प्रकारगिरीदुर्ग
चढाईची श्रेणीसोपी
ठिकाणसातारा, महाराष्ट्र
जवळचे गाववर्धनगड गाव,पुसेगाव
डोंगररांगसातारा फलटण
सध्याची अवस्थाव्यवस्थित
स्थापना{{{स्थापना}}}

वर्धनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीची एक रांग माणदेशातून फिरली आहे. तिचे नाव महादेव डोंगर रांग. त्या रांगेवर भांडलीकुंडल नावाचा जो फाटा आहे त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्‍याच्या सीमेवर, कोरगावपासून ७ मैलांवर व साताऱ्याच्या ईशान्येस १७ मैलांवर हा किल्ला बांधलेला आहे. किल्ल्याला लागूनच असलेल्या लालगून व रामेश्वर ह्या दोन डोंगरांवरून किल्ल्यावर तोफांचा चांगला मारा करता येत असे. २०११ च्या जनगणनेनुसार []या गावाचा सेन्सस कोड ५६३४८२ असून या लेखातील माहिती या जनगणनेवर आधारित आहे. या गावाचे क्षेत्र ७९९.०१ हेक्टर असून येथील लोकसंख्या १९५२ आहे. गावात ४५० कुटुंबे राहतात.

इतिहास

[संपादन]

५ मे १७०१ या दिवशी मोगलांनी पन्हाळा जिंकला. त्यानंतर औरंगजेबाने आपले लक्ष्य साताऱ्यातील किल्ल्यांकडे वळवले. मोगल सरदार फतेउल्लाखान याने सल्ला दिला की "बादशहांनी खटावला छावणी करावी म्हणजे पावसाळ्यात चंदन-वंदन व नांदगिरी हे किल्ले जिंकून घेता येतील. औंरगजेबाने मंजूरी दिली . दिनांक ८ जूनला फतेउल्लाखान आपल्याबरोबर काही सैन्य घेऊन खटावच्या बंदोबस्तासाठी गेला. त्याने खटावचे ठाणे जिंकले. मराठ्यांचा पराभाव झाला. यानंतर मोगलांची फौज खटावच्या ठाण्यात जमा होऊ लागली होती. आज न उद्या हे सैन्य वर्धनगडाला वेढा घालणार हे निश्‍चित होते, म्हणून वर्धनगडातील मराठ्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यांमधील लोकांना आक्रमणाची अगाऊ कल्पना दिली होती. ज्या लोकांना शक्‍य होते त्यांनी आपल्या बायकांमुलांना किल्ल्यात नेले. नंतर वर्धनगडाच्या किल्लेदाराने आपला एक वकील फतेउल्लाखानाकडे पाठवला. त्याने सांगितले की""किल्लेदाराला प्राणाचे अभय मिळत असेल तर तो मोगलांना किल्ला दण्यास तयार आहे. फतेउल्लाखानाने विनंती ताबडतोब मान्य केले. फतेउल्लाखानाकडे वकील पाठवून किल्ला ताब्यात देण्याची बोलणी करणे हा वेळकाढूपणा होता. मोगलांचा किल्ल्यावर होणारा हल्ला पुढे ढकलणे हा त्यामागचा हेतू होता. किल्लेदाराने किल्ल्याच्या संरक्षणासाठी सैन्याची जमवाजमव करणे हा त्यामागील हेतू होता. फतेउल्लाखान किल्लेदार आज येईल उद्या येईल म्हणून वाट पहात राहिला, पण एकही मराठा सैनिक त्याच्याकडे फिरकलासुद्धा नाही. फतेउल्लाखानाला मराठ्यांचा खेळ लक्षात आला आणि त्याने १३ जून रोजी किल्ल्यावर हल्ला चढवला. त्याला मराठ्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. पण यात अनेक मराठे मारले गेले; अनेकजण जखमी झाले. मोगलानी मराठ्यांच्या चाळीस लोंकाना कैद केले. मग मोगलानी किल्ल्याच्या पायथ्याच्या अनेक वाड्या जाळून टाकल्या. या लढाईत मोगलांचे पण अनेक सैनिक प्राणास मुकले. दि. १९जूनला रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला. दि. २२ जून रोजी "मीर ए सामान ' या खात्याचा व्यवस्थापक अली रजा हा वर्धनगडातील मालमत्ता जप्त करण्यासाठी गेला. त्याने किल्ल्यातून सहाशे पंचाहत्तर मण धान्य, चाळीस मण सोरा व बंदुकीची दारू, सहा मोठ्या तोफा व जंबुरक असा माल जप्त केला. त्याच दिवशी औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून "सादिकगड' असे ठेवले. औरंगजेबाची पाठ फिरताच हा किल्ला मराठ्यांनी परत जिंकला आणि त्याचे सादिकगड हे नाव बदलून वर्धनगड केले.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

[संपादन]

वर्धनगड गावातूनच किल्ल्याची भक्‍क्‍कम तटबंदी दिसते. आजही किल्ल्याची तटबंदी चांगल्या स्थितीत शाबूत आहे. पायथ्याच्या वर्धनगड गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एक प्रशस्त वाट आहे. ही वाट थेट गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहचवते. या वाटेने गडाचा दरवाजा गाठण्यास अर्धा तास लागतो. वर्धनगड गावात शिरतांना दोन तोफा आपले स्वागत करण्यासाठी मोठ्या डौलाने उभ्या आहेत. गडाचे प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख असून गोमुखी बांधणीचे आहे. आजही ते सुस्थितीत उभे आहे. राजा शिवछत्रपती परिवार, महाराष्ट्र राज्य या संस्थेने तिथे सागवानी नवीन दरवाजा बसवून प्रवेशद्वाराची व किल्ल्याची शोभा अजून वाढवली आहे. दरवाज्यापासूनच किल्ल्याची तटबंदी चालू होते तर ती संपूर्ण गडाला वळसा घालून पुन्हा दरवाजाच्या दुसऱ्या टोकाशी येऊन पोहचते. ही तटबंदी आजही चांगली शाबूत आहे.

दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडेच एक ध्वजस्तंभ आहे. या ध्वजस्तंभाच्या थोडे पुढे गेल्यावर तटातून बाहेर पडण्यासाठी चोरवाट तयार केलेली आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच एक माठे टेकाड दिसते. यावर चढून जाण्यासाठी दगडाच्या बांधलेल्या पायऱ्या आहेत. या टेकाडावर चढून जातांना वाटेतच हनुमानाची भग्न दगडी मूर्ती आहे. पुढे शंकराचे छोटेसे देऊळ लागते. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. प्रवेशद्वारापासून टेकाडावर असणाऱ्या मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी १५ मिनिटे पुरतात. टेकाडावर असणारे मंदिर हे गडाची अधिष्ठात्री वर्धनीमातेचे आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. त्यामुळे रंगरंगोटी केलेले मंदिर आकर्षक दिसते. मंदिरासमोर फरसबंदी चौथरा बांधलेला आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. वर्धनीमाता नवसाला पावत असल्यामुळे कौल लावण्यासाठी भाविकांची गर्दी चालूच असते. मंदिराच्या गाभाऱ्यात कासवाची सुंदर मूर्ती कोरलेली आहे. मंदिराच्या मागच्या बाजूने टेकाडावरून एक वाट खाली उतरते. या वाटेने खाली उतरतांना उजवीकडे पाण्याची टाकी आढळतात.

  ?वर्धनगड

महाराष्ट्र  भारत
  गाव  
Map

१७° ४०′ ५५.०१″ N, ७४° ११′ ००.२१″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ९.१२ चौ. किमी
जिल्हा सातारा
तालुका/के खटाव
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
१,९५२ (२०११)
• २१४.००/किमी
१,०६३ /
भाषा मराठी

लोकसंख्या

[संपादन]
  • एकूण लोकसंख्या:१९५२; पुरुष: ९४६; स्त्रिया: १००६
  • अनुसूचित जाती लोकसंख्या: ९४; पुरुष: ४८; स्त्रिया: ४६
  • अनुसूचित जमाती लोकसंख्या:५; पुरुष: १; स्त्रिया: ४

शैक्षणिक सुविधा

[संपादन]

गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-३. प्राथमिक शाळा-२. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. माध्यमिक शाळा-१.

स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -

५ किमी पेक्षा कमी अंतरावर : काही नाही

५ ते १० किमी अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा पुसेगाव येथे आहे. पदवी महाविद्यालय पुसेगाव येथे आहे.

१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अभियांत्रिकी महाविद्यालय सातारा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय कराड येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा औंध येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र सातारा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा सातारा येथे आहे.

वैद्यकीय सुविधा

[संपादन]

सरकारी

[संपादन]

असलेल्या सुविधा-

प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र -१,

नसलेल्या सुविधा -

कम्युनिटी हेल्थ सेंटर,  प्राथमिक आरोग्य केन्द्र  प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र  क्षयरोग रुग्णालय  अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय  अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय  दवाखाने  गुरांचे दवाखाने  फिरते दवाखाने  कुटुंब कल्याण केन्द्र 

बिगर-सरकारी

[संपादन]

असलेल्या सुविधा-

बाह्य रोगी विभाग -१, इतर पदवीधर डॉक्टर -१,

नसलेल्या सुविधा -

बाह्य व भरती असलेले रोगी विभाग  धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय  एमबीबीएस पदवीधर डॉक्टर  पदवी नसलेले डॉक्टर  पारंपरिक वैद्य व वैदू  औषधाची दुकाने  इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा 

पिण्याचे पाणी

[संपादन]

असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा,

नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा,

स्वच्छता

[संपादन]

असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्त्रोतात सोडले जाते.उघडी गटारे,

नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघराशिवाय सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था,

संचार

[संपादन]

गावात असणाऱ्या सुविधा - उपपोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते,

स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर.

तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग,

बाजार व पतव्यवस्था

[संपादन]

गावात असणाऱ्या सुविधा - शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान,

स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - ए टी एम, - ५ ते १० किमी अंतरावर. व्यापारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर.

आरोग्य, आहार व करमणूक सुविधा

[संपादन]

गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, वृत्तपत्र पुरवठा, विधानसभा मतदान केन्द्र, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र,

स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणीसह अथवा विरहित), - ५ ते १० किमी अंतरावर. क्रीडांगण, - ५ ते १० किमी अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - ५ ते १० किमी अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - ५ ते १० किमी अंतरावर.

वीज पुरवठा

[संपादन]

घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे.

शेतीसाठी वीजपुरवठा - आहे.

व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे.

सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे.

जमिनीचा वापर (हेक्टर)

[संपादन]
  • जंगल क्षेत्र : २०९.४७
  • बिगरशेतकी वापरातली जमीन: २.०
  • ओसाड व शेतीला अयोग्य जमीन: ६७.३८
  • कुरणे व इतर चराऊ जमीन: १५.४८
  • फुटकळ झाडीखालची जमीन: ०.०
  • शेतीयोग्य पडीक जमीन: १२.४
  • कायमस्वरूपी पडीक जमीन: ०.०
  • ह्या वर्षीची पडीक जमीन: ३१.५८
  • पिकांखालची जमीन: ५७३.८२
  • एकूण कोरडवाहू शेतजमीन: २५८.०
  • एकूण बागायती जमीन: ३१५.८२

सिंचन सुविधा (क्षेत्रफळ हेक्टर मध्ये)

[संपादन]
  • कालवे : ०
  • विहिरी / कूप नलिका: २५८
  • तलाव / तळी: ०
  • ओढे: ०
  • इतर : ०

संदर्भ

[संपादन]
  1. https: // censusindia.gov. in / census.website / data / census - tables #

बाहय दुवे

[संपादन]