Jump to content

शिरगावचा किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिरगावचा किल्ला
[[Image:
|250px| ]]
नाव शिरगावचा किल्ला
उंची
प्रकार गिरीदुर्ग सागर किनार्यावरील किल्ले
चढाईची श्रेणी अत्यंत सोपी
ठिकाण ठाणे, महाराष्ट्र
जवळचे गाव शिरगाव
डोंगररांग कोकण
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


शिरगावचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

स्थान[संपादन]

हा किल्ला पालघर तालुक्यात माहीमच्या उत्तरेला ५ कि.मी. अंतरावर आहे. शिरगावचा किल्ल्यापाठचा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर असून किल्ला तसा दुर्लक्षित असल्याने समुद्रकिनाराही निर्मनुष्य असतो. परंतु सध्या मात्र बऱ्यापैकी डागडुजी करून किल्ला सुस्थित केला आहे.

इतिहास[संपादन]

१७३९ साली मराठांनी हा किल्ला डहाणू, केळवे, तारापूर या किल्ल्यांबरोबर जिंकून घेतला. मराठांच्या आधी या किल्ल्याचा ताबा पोर्तुगिजांकडे होता. नंतर १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच हा किल्लाही इंग्रजांच्या ताब्यात गेला.

वैशिष्ट्य[संपादन]

शिरगावचा किल्ला साधारण २०० फूट लांब व १५० फूट रुंद इतक्याच आकाराचा आहे. मात्र किल्ल्याची तटबंदी ३५ फूट उंच व १० फूट रुंद आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे[संपादन]

किल्ल्याला चार कोपऱ्यांत चार बुरूज असून प्रवेशद्वाराजवळही एक बुरूज आहे. प्रवेशद्वाराच्या वर एक अत्यंत सुबक बांधणीचा चबुतरा आहे. हा चबुतरा आपल्यला रायगडावरील महाराजांच्या समाधीची आठवण करून देतो. येथील तटबंदीवर, बुरुजांवर जाण्यासाठी किल्ल्याच्या आत असणाऱ्या तटबंदीच्या बाहेरून पायऱ्या असल्या तरी बुरुजांवर जायला तटबंदीच्या अंतर्भागातूनही पायऱ्या केलेल्या आहेत. अर्थात आतून जाणाऱ्या पायऱ्या सध्या वापरात नसल्या तरी बुरुजाला असलेल्या खिडक्यांमधून आपल्याला या पायऱ्या दिसतात. किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीत आणखी एक दरवाजा आहे. मात्र आता तो पूर्णपणे बंद केलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून पश्चिमेकडे असणाऱ्या समुद्रकिनाऱ्याचे सुंदर दृश्य दिसते.

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

१ला मार्ग[संपादन]

पश्चिम उपनगरीय रेल्वेवरील शेवटचे स्टेशन म्हणजे विरार. विरारच्या पुढे जाण्यासाठी मेल अथवा शटल पकडावी व पालघरला उतरावे.मुंबईहून यायचे असल्यास मेल गाड्या ठरावीक वेळेत मुंबई सेन्ट्रल, बांद्रे, अंधेरी, बोरीवली येथून उपलब्ध आहेत. पालघरला पोहोचल्यावर तेथून सातपाटी मार्गावर धावणाऱ्या बस अर्धा-अर्धा तासाने आहेत.या बस पकडून आपल्याला 'शिरगाव स्टॉपवर' उतरावे लागते. हे अंतर बसने १५ मिनिटाचे आहे. हा रस्ता पालघर - धनसार- शिरगाव- सातपाटी असा आहे. याच रस्त्या साठी फक्त शेअर रिक्षा ( १० आसनी) उपलब्ध आहेत. शिरगाव स्टोप ते किल्ला हे अंतर चालत ५ मिनिटाचे आहे. ( स्टोप वरून दक्षिणे कडे.)

२ रा मार्ग[संपादन]

२ रा मार्ग म्हणजे गावाच्या बाहेरून येणारा रस्ता. हा रस्ता कंपनी रस्ता म्हणून ओळखला जातो. ह्या रस्त्या वरून फक्त बसेस , त्या सुद्धा अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु दोन्ही रस्ते " शिरगाव" येथे मिळत असल्यामुळे प्रवास कुठल्याही रस्त्याने झाला तरी काहीच फरक पडत नाही. परंतु हा रस्ता किल्या समोरून जात असल्यामुळे, शिरगाव स्टोप ते किल्ला हे ५ मिनिटे चालायचे अंतर वाचते. किल्ल्याला लागूनच एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे.

राहण्याची सोय[संपादन]

संपूर्ण किल्ला अर्धा-पाऊण तासातच बघून होतो. त्यामुळे राहण्याची गरज नाही. मात्र तशी गरज भासल्यास किल्ल्याला लागूनच असलेल्या शाळेमध्ये राहण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय[संपादन]

पालघरला अनेक चांगली हॉटेल्स आहेत.

पाण्याची सोय[संपादन]

गडावर पिण्याच्या पाण्याची काहीच सोय नाही.

इतर प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

गावचे ग्रामदैवत " खामजाई- खंडोबा" मंदिर जुन्या धाटणीचे असून गर्द झाडीत, वाडी मध्ये मंदिर असल्या मूळे अतिशय शांत व प्रसन्न ठिकाण आहे. किल्या पासून चालत ५ मिनिटावर ( कंपनी रोड) मुख्य रस्त्या वर आहे.

शिरगावचे माध्यमिक हायस्कूल - सातपाटी रोड वर, किल्या पासून चालत १५ मिनिटावर आहे. समुद्र किनाऱ्या वरून सुद्धा चालत जाता येऊ शकत. हायस्कूलच्या शेजारी असलेले रेतीचे क्रीडांगण व लागून असलेला मोकळा, सरुच्या झाडांची सोबत असलेला समुद्र किनारा संध्याकाळी खूपच सुंदर वाटतो. दिवस भरात कधीही गेले तरी सागरी वाऱ्या मूळे तापमान जाणवत नाही व सरुच्या झाडांची सावलीही मिळते.

शिरगाव - सातपाटी रोड वर, किल्या पासून २ कि मी अंतरावर कमलीशाह बाबा दर्गा आहे. तसेच माळी समाज वस्तीचे राधा कृष्ण मंदिर आहे. संपूर्ण रस्ता गर्द नारळी बागांनी भरला आहे. चालत जाण्याची आवड व निसर्गाची आवड असलेल्या तरुणांनी चालत जाण्यातच मजा आहे.शिरगाव स्टोप वरून सातपाटीच्या दिशेने जाणाऱ्यां रिक्षा / बसेस पकडून कामली शाह स्टोप वर उतरून पुन्हा ५ मिनिटे पूर्वे कडे चालावे लागते.

वरील तीनही ठिकाणी कुठल्या ही प्रकारे खाण्याची किंवा राहण्याची व्यवस्था नाही. मात्र बाहेरून आणलेले खाणे खाता येऊ शकते. असे करताना मात्र नैसर्गिक वातावरणात कचरा होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.