यशवंतगड (रेडी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यशवंतगड (रेडी)

यशवंतगड (रेडी)
नाव यशवंतगड (रेडी)
उंची
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण रेडी
जवळचे गाव वेंगुर्ला
डोंगररांग
सध्याची अवस्था फारशी चांगली नाही
स्थापना {{{स्थापना}}}


यशवंतगड (रेडी) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी गावातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान आणि किल्ल्याची माहिती[संपादन]

यशवंतगड (रेडी) किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. या गडाची जागा खाडीच्या मुखावर असलेल्या टेकडीवर आहे. गडाला मजबूत तटबंदी असून बुरुजही बांधलेले आहेत. तटदरवाज्यातून प्रवेश केल्यावर बालेकिल्याकडे जाणारी पाखाडी लागते. तेथून पुढे एक तटबंदी पार केल्यावर बालेकिल्ला लागतो. बालेकिल्ल्याला २५ फुट उंचीचा तट आहे. तटावर बाहेरून चढायला अवघड जावे यासाठी आग्नेय दिशा सोडून सर्व बाजूंनी खंदक खणलेले आहेत. किल्ल्यात पडक्या वाड्याचे अवशेष राहिले आहेत. या वाड्याला अनेक झाडांनी वेढलेले आहे. पण पाण्याचा साठा कुठेच सापडत नाही.

इतिहास[संपादन]

या किल्ल्याचा इतिहास सध्या माहित नाही.

छायाचित्रे[संपादन]

कसे जाल[संपादन]

वेन्गुर्ल्यामार्गे शिरोडा बोटीतून ओलांडून रेडीमध्ये पोहोचले की हा किल्ला आहे.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

पडके वाडे आणि भक्कम तटबंदी

गडावरील राहायची सोय[संपादन]

नाही

गडावरील खाण्याची सोय[संपादन]

नाही

गडावरील पाण्याची सोय[संपादन]

नाही

संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

भारतातील किल्ले