कुलंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुलंग गड

कुलंग गड
नाव कुलंग गड
उंची १४७० मीटर
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी अवघड
ठिकाण नाशिक, महाराष्ट्र
जवळचे गाव इगतपुरी, कुरंगवाडी, आंबेवाडी
डोंगररांग कळसूबाईची रांग
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना


भौगोलिक स्थान[संपादन]

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग कसारा घाटातून जातो. या महामार्गावर इगतपुरी गाव आहे. इगतपुरी हे तालुक्याचे गाव असून ते मुंबई-नाशिक या रेल्वे मार्गावर आहे. इगतपुरीच्या दक्षिणेला सह्याद्रीची एक कळसूबाईची रांग ही बेलाग डोंगररांग आहे. या पूर्व-पश्चिम रांगेवर कळसूबाईचे शिखर आहे. कळसूबाई हे सह्याद्रीमधील सर्वोच्च शिखर आहे..या कळसूबाई शिखराच्या पश्चिमेला कुलंग किल्ला आहे. या रांगेची सुरुवात कुलंगगडापासून होते.

कसे जाल ?[संपादन]

कुलंगगडाच्या उत्तर पायथ्याला कुरंगवाडी नावाचे गाव आहे. इगतपुरीहून पिंपरी सद्रुधिन मार्गे येथे पोहोचता येते. किंवा, कळसूबाईच्या पायथ्याच्या वारी घाटातून खाली उतरल्यावर इंदोरे मार्गे आंबेवाडीला पोहोचता येते. आंबेवाडीकडूनही कुलंगगडाचा पायथा गाठता येतो.

छायाचित्रे[संपादन]

अलंग ,मदन,कुलंग

माहिती[संपादन]

कळसूबाईची रांग इतर रांगांपेक्षा तुलनेत उंच असून ती कातळकड्यांनी घेरलेली आहे. त्यामुळे या रांगेतील किल्ले दुर्गम असून यांची चढाई चढणाऱ्याचा कस काढणारी आहे. समुद्रसपाटीपासून १४७० मीटर उंचीच्या कुलंगगडावर पोहोचण्यासाठी प्रथम खालच्या पदरात पोहोचावे लागते. पदरात पोहोचण्यासाठी कुरंगवाडीतून दोन तासांची वाटचाल करावी लागते. पदरात आल्यावर मदनगड व त्या शेजारील सुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवतो.

समोर कुलंगचा कातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. तेव्हा कुलंगच्या उजव्याबाजूने उतरणारा डोंगरदांड आपल्याला दिसतो. या डोंगरदांडावरूनच कुलंगची चढाई आहे. या दमछाक करणाऱ्या वाटेने चढाई केल्यावर माणूस कुलंगच्या कड्याला भिडतो. कड्याला कातळकोरीव पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून दारातून गडप्रवेश होतो. गडाचा माथा अतिशय विस्तीर्ण आहे.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

गडावर जाण्यासाठी दगडातून कोरलेल्या जिने आहेत. काही सुस्थितीत तर काही तुटलेले आहेत. या जिन्यांवरून वर गेल्यावर एक दगडी कमान लागते. या ठिकाणी दगडातून कोरलेल्या गुहा आहेत. त्या सैनिकांच्या देवड्या असाव्यात. या कमानीतून वर गेल्यावर एक गोमुखी दरवाजा लागतो हा गडाचा मुख्य दरवाजा आहे.

येथून गडावर पोहोचल्यावर पूर्वेकडे खाली गेल्यावर अनेक पाण्याची टाकी लागतात. यातील काही टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य आहे. येथून पुढे गेल्यावर एक मोठी टेकडी आहे. हा गडाचा सर्वोच्च भाग आहे. त्याच्या बाजूने एक धबधबा आहे त्यावर खाली गेल्यावर एक दगडी बांध घातला असून त्याच्या शेजारी दोन पाण्याची टाकी कोरलेली असून हा भाग पाहण्यासाठी खूप छान आहे. येथे असलेल्या दगडी बांधावर एक खिडकी काढलेली असून त्याच्या बाहेरच्या बाजूला एक भग्न अवस्थेतले एक शिल्प आहे. कदाचित ते एक गोमुख असावे हा भाग म्हणजे गडावरील जलव्यवस्थापनाचे एक उत्तम उदाहरण आहे.

मुख्य दरवाजातून पश्चिमेला गेल्यावर एक मोठी गुहा आहे. त्याच्या बाजूने दगडात कोरलेल्या पायऱ्या असून त्यांच्यावरून वर गेल्यावर अनेक वास्तूंचे अवशेष दिसतात. हा गडाचा बालेकिल्ला असावा. याठिकाणी एक मोठी वास्तू आढळते हा गडावरील मुख्य वाडा असावा. या वाड्याचे प्रवेशद्वार उत्तरेला असून मध्ये एक ओसरी आहे. या ओसरीमुळे वाड्याचे दोन भाग पडतात.

येथून पुढे गेल्यावर एक खालच्या बाजूला एक माची आहे. ही माची लोहगडाच्या विंचू माची सारखी दिसते. या गडावर इतिहासातील भरपूर खुणा आजही सुस्थितीत आहेत.

इतिहास[संपादन]

छत्रपती शिवाजी महाराजांचा पेशवा मोरोपंत ह्याने हा किल्ला सन १६७२ साली जिंकून घेतला. मुघलांसाठी हा मोठा धक्का होता. सन १८१८ च्या शेवटच्या इंग्रज मराठा युद्धानंतर ह्या किल्ल्यावर चार मोठ्या तोफा असल्याचे काही उल्लेख सापडतात. फत्तेलश्कर, रामप्रसाद, शिवप्रसाद व मार्कंडेय अशी त्यांची नावे होती. त्यातील शेवटची तोफ इंग्रजांनी वितळवल्याचे कळते, पण इतर तीन तोफांचे काय झाले ते माहीत नाही.

शेवटच्या युद्धानंतर महाराष्ट्रातील इतर बऱ्याच किल्ल्यांप्रमाणे हा किल्लाही बेवारस अवस्थेतच आहे. त्याच्या शेजारचे दोन किल्ले मोरा व हरगडही त्याच स्थितीत आहेत. वर जायच्या वाटा बंद झाल्यामुळे हरगडावर जाणेही अवघड झाले आहे.

गडावरील खाण्याची सोय[संपादन]

गडावरील पाण्याची सोय[संपादन]

कुलंगगडावर पाण्याची ओळीने असलेली टाकी मुबलक असून त्यातले पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य आहे. कुलंगच्या पूर्व कड्यावरून-पाताळवेरी कड्यावरून कळसूबाई रांगेचे अप्रतिम दृश्य दिसते.

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

मार्ग[संपादन]

जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन]

चार तास

संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]