घनगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
घनगड किल्ला
नाव घनगड किल्ला
उंची ९६२ मीटर/३१५५ फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी अवघड
ठिकाण महाराष्ट्र
जवळचे गाव
डोंगररांग घनगड रांग
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


घनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे. इगतपुरी स्टेशनच्या उत्तरेला कावनई किल्ल्याच्या अगदी विरुद्ध दिशेला, उत्तरेला घनगड डोंगररांगेची शिखरे दिसतात. घनगड किल्ला अगदी मध्यभागी आहे. चढायला अवघड. इगतपुरीहून अगदी सकाळची नाशिकला जाणारी बस घ्यावी आणि अर्ध्या अंतरावर असलेल्या वाढिवरे फाट्याला उतरावे. दोन किलोमीटर अंतरावरील वाढिवरे गांवात जावे. तिथून पाच किलोमीटरवर असलेल्या घनगड-सांन्सी डोंगररांगेच्या पायथ्याला पोहचावे. पश्चिमेला डाव्या हाताला अघेरा आहे. तिथून घनगडच्या मध्यभागी पोचता येते. त्याहून वर जाणे, कोसळलेल्या खडकांमुळे बरेच अवघड आहे. नवशिक्यांनी योग्य मार्गदर्शनाखेरीज प्रयत्न करू नये. तिथे डोंगराखालून एक लांबलचक रहस्यमय भुयार जाते. विरुद्ध बाजूला उतरून पूर्वेला उजवीकडे डोंगरमाथ्यावरूनच आंबलीमाथ्याला जाता येते. तेथून त्र्यंबकेश्वरचा डोंगर छानपैकी दिसतो. अघेराच्या डावीकडे अंगठ्यासारखा दिसणारा डांग्या माथा आहे. डांग्याच्या पायथ्यापासून नाशिक जिल्ह्यातल्या नाण्यांच्या संग्रहासाठी प्रसिद्ध अशा अजनेरीला जाणे शक्य आहे.

शिवाजी ट्रेल्‍स नावाच्या दुर्ग संवर्धन संस्थेने या गडाची डागडुजी केली आहे.(सप्टेंबर २०१३)

भौगोलिक स्थान[संपादन]

कसे जाल ?[संपादन]

इतिहास[संपादन]

छायाचित्रे[संपादन]

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

गडावरील राहायची सोय[संपादन]

गडावरील खाण्याची सोय[संपादन]

गडावरील पाण्याची सोय[संपादन]

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

मार्ग[संपादन]

जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन]

संदर्भ[संपादन]

सांगाती सह्याद्रीचा

संदर्भ[संपादन]