बोरघाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोरघाटातून वाट काढणारा मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग

बोरघाट सह्याद्री पर्वतामधला एक घाटरस्ता आहे. हा रस्ता रायगड जिल्ह्यातील खोपोली गावाला व पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहराशी जोडतो. हा घाट राष्ट्रीय महामार्ग ४ वर आहे. या घाटाला सामान्यतः खंडाळ्याचा घाट असे म्हटले जाते.

पुस्तके[संपादन]

अनेक मराठी कथा-कादंबर्‍या-गाणी यांमध्ये खंडाळ्याच्या घाटाचे नाव येते. मराठी लेखिका शुभदा गोगटे यांनी ’१०,००० प्राणांच्या आहुतीमधून साकारलेल्या खंडाळ्याच्या घाटासाठी’ या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्ग बांधला गेला त्याकाळात खंडाळा घाटाच्या बांधणीचा १८५३ ते १८६५ या दहा वर्षांचा खडतर पट या पुस्तकात गोगटे यांनी मांडला आहे. एका शाळकरी मुलाला रेल्वेविषयी आकर्षण वाटत असते. घरातून परवानगी न घेता तो बांधणी सुरू असलेल्या मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरच्या खंडाळ्याला येतो; त्या रेल्वे मार्गाच्या बांधणीत काम करू लागतो. त्याला इंग्रजी येत असल्याने ब्रिटीश अधिकारी आणि कामगार यांच्यातील दुवा म्हणून जे काम करतो, त्याची हकीकत या पुस्तकात आहे.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.