अलंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

अलंग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.


अलंग
Alang Traverse 1.jpg
नाव अलंग
उंची ४५०० फुट
प्रकार
चढाईची श्रेणी अत्यंत अवघड
ठिकाण अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव इगतपुरी
डोंगररांग कळसुबाई
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अत्यंत अवघड असा हा किल्ला आहे. घनदाट जंगल व विरळ वस्तीमुळे हा परिसर जरा त्रासदायक आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा, भरपूर पाऊस यामुळे हा किल्ला तसा उपेक्षितच आहे. कळसूबाईच्या रांगेत असणारे अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले लक्षवेधक आहेत.

इतिहास[संपादन]

गडावरील ठिकाणे[संपादन]

किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. पाण्याची ११ टाकी आहेत. किल्ल्यावर इमारतीचे काही अवशेष व एक छोटेसे मंदिर आहे. पूर्वेला कळसूबाई,औंढचा किल्ला, पट्टागड, बितनगड, उत्तरेला हरिहर, त्र्यंबकगड, अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबागड, खुट्टा सुळका, रतनगड, कात्राबाई चा डोंगर हा परिसर दिसतो. किल्ल्याचा माथा फिरण्यास ४ तास पुरतात.

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

  • घाटघर मार्गे: किल्ल्यावर जाण्यासाठी ही दुसरी वाट आहे. पहिली आंबेवाडी मार्गे आहे.
  • घोटी - भंडारदरा मार्गे घाटघरला जावे. तेथून अडीच तासात किल्ल्याच्या तिसर्‍या घळीत ठेवलेल्या लाकडी बेचक्यापाशी पोहचतो. या बेचक्यातून थोडे वर गेल्यावर सोपे प्रस्तरारोहण करावे लागले. पुढे थोडी सपाटी पार केल्यानंतर डावीकडे कड्यालगत जाणारी वाट पकडावी. १० - १५ मि. आपण किल्ल्यावरील गुहेत पोहचतो. खिंडीतून डावीकडील वाटेने पुढे गेल्यावर काही पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून गेल्यावर ८० - ९० फुटाचा तुटलेला एक कडा लागतो. या कड्यावर प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. मात्र, प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय या वाटेने जाण्याचे धाडस करु नये. या वाटेने किल्ला गाठण्यास ६ तास लागतात.

छायाचित्रे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]