Jump to content

अंबागड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०११ च्या जनगणनेनुसार अंबागड गावाचा स्थान कोड किंवा गाव कोड ५३६७४४ आहे. अंबागड हे गाव महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात आहे. हे उपजिल्हा मुख्यालय तुमसर (तहसीलदार कार्यालय) पासून ११ किमी अंतरावर आणि जिल्हा मुख्यालय भंडारा पासून ४४ किमी अंतरावर आहे. या गावाचे क्षेत्रफळ सुमारे ११२२ हेक्टर आहे. अंबागडची एकूण लोकसंख्या २२४१ आहे, त्यापैकी पुरुषांची लोकसंख्या ११०४ आहे तर महिलांची लोकसंख्या ११३७ आहे. अंबागड गावाचा साक्षरता दर ७४.८३% असून त्यापैकी ७९.१७% पुरुष आणि ७०.६२% महिला साक्षर आहेत. अंबागड गावात सुमारे ४३३ घरे आहेत. आंबागड गावाचा पिन कोड ४४१९१२ हा आहे.[]

अंबागड हा महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्हयातून जाणाऱ्या सातपुडा पर्वताच्या दक्षिणेकडील टेकड्या या गायमुखच्या टेकड्या अथवा अंबागडाच्या टेकड्या म्हणून ओळखल्या जातात. या टेकड्यामध्ये बलदंड असा 'अंबागड' नावाचा वनदुर्ग आहे. अंबागड हा वनदुर्ग भंडारा जिल्ह्यामधील तुमसर तालुक्यात आहे.[]

जवळची गावे

[संपादन]
  • लांझेरा
  • लोहारा
  • गायमुख
  • सोनपुरी
  • रामपूर हमेशा
  • बपेरा
  • हरदोली
  • दावेझरी
  • पवनारा
  • कारली
  • चिचोली

इतिहास

[संपादन]

या गावात अंबागड किल्ला प्रसिद्ध आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Ambagad Village in Tumsar (Bhandara) Maharashtra | villageinfo.in". villageinfo.in. 2023-01-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Ambagad (Nagpur)". maharashtratourism.gov.in (English भाषेत). 10 November 2022. 9 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)