रसाळगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रसाळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.


रसाळगड
नाव रसाळगड
उंची
प्रकार स्थलदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण रत्नागिरी जिल्हा,महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव रसाळवाडी
डोंगररांग सह्याद्री
सध्याची अवस्था उत्तम
स्थापना {{{स्थापना}}}


माहिती[संपादन]

सह्याद्रीची रांग उत्तरदक्षिण पसरलेली आहे. मुख्य रांगेपासून सुटावलेल्या अनेक रांगा पाच पंचवीस मैल लांबवर पसरलेल्या आहेत. पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे तीन दुर्ग लक्ष वेधून घेतात. हे सर्व किल्ले जावळीच्या खोऱ्यातच येतात. प्रतापगड, मधुमकरंदगड, रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड हा ट्रेकही खूप प्रसिद्ध आहे. २०२०ला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत मधूमकरंद गड ते रसाळगड ही मोहीम झाली सादारं न १ लाख मावळे सहभागी झाले होते

इतिहास[संपादन]

सन १६६० च्या मोहिमेत शिवाजीराजांनी रसाळगड जिंकला आणि  पुढे सन १७५५ मध्ये तुळाजी आंग्रे यांनी पुन्हा रसाळगड घेतला. नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्रेकडून सर्व किल्ले घेतले रसाळगड तेवढा राहिला. पुढे तुळाजी आंग्रे शरण आल्यावर रसाळगड त्यांच्या ताब्यात आला असावा.

गडावरील ठिकाणे[संपादन]

रसाळवाडीतून किल्ल्यावर शिरतानाच वाटेत दोन दरवाजे लागतात. पहिले प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच तटातील मारुतीचे दर्शन होते. वळसा मारून आपण किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजात पोहचतो. या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटावर एक भली मोठी तोफ दिसते. तोफा हे या किल्ल्यांचे मोठे वैशिष्टच आहे. किल्ल्यावर लहानमोठ्या मिळून सुमारे १६ तोफा आहेत.संपूर्ण किल्ल्याचा माथा म्हणजे एक पठारच होय. समोरच झोलाई देवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. कोनाड्यात अनेक सापडलेल्या मूर्त्या ठेवल्या आहेत. मंदिराच्या समोर दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे. समोरच एक तोफ सुद्धा ठेवलेली आहे. मंदिराच्या बाजूला पाण्याचा मोठा तलाव आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला शिवाचे छोटेसे मंदिर आहे. पाण्याच्या टाक्याच्या वरच्या भागाला थोडासा उंचवटा आहे , यालाच बालेकिल्ला म्हणतात. यात वाड्यांचे मोठा प्रमाणावर अवशेष आहेत. बुरूजावर तोफा आढळतात. येथून समोरच एक दगडी बांधकाम असलेली खोली आढळते. हे धान्य कोठार असावे असे वाटते. बालेकिल्ल्याच्या जवळच आणखी एक पाण्याचा तलाव आहे. या दोन्ही तलावात बारामाही पाणी असते. किल्ल्याच्या नैऋत्य भागात एक नंदी आहे. मात्र येथे शिवाची पिंड आढळत नाही. किल्ल्यावर पाण्याची टाकी मोठा प्रमाणावर आहेत.

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

  • १.खेड वरून वडगाव बिरमणी कडे जाणारी बस पकडायची आणि वाटेत असणाऱ्या हुंबरी फाट्यावर उतरुन. हुंबरी फाटापासून थेट बीड गावात जाणारी वाट पकडायची. साधारणतः बीड गावात पोहचण्यास एक तास लागतो. वाडीबीड गावातून गडावर जाण्यास मळलेली वाट आहे. या मार्गाने किल्ल्यावर पोहचण्यास दीड तास लागतो.
  • २.खेड वरून निमनी गावात जाण्यासाठी बसेस सुटतात. निमनी गावात उतरून एका तासात रसाळवाडी मार्गेकिल्ला गाठता येतो.
  • ३.खेड वरून मौजे जैतापूर गावात जाणारी एस. टी. पकडुन. मौजे जैतापूरहून - रसाळवाडी मार्गेदोन तासात रसाळगड गाठु शकतो.

बाह्य दुवे[संपादन]