बहादूरगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बहादुर किल्ला/ पेडगाव किल्ला
बहादूरगड / पेडगाव चा किल्ला
अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
बहादुर किल्ला/ पेडगाव किल्ला is located in Maharashtra
बहादुर किल्ला/ पेडगाव किल्ला
बहादुर किल्ला/ पेडगाव किल्ला
बहादुर किल्ला/ पेडगाव किल्ला is located in India
बहादुर किल्ला/ पेडगाव किल्ला
बहादुर किल्ला/ पेडगाव किल्ला
Coordinates 18°30′28.63″N 74°42′14.88″E / 18.5079528°N 74.7041333°E / 18.5079528; 74.7041333
प्रकार भुईकोट किल्ला
उंची ५०३ मीटर (१,६५० फूट)
जागेची माहिती
मालक भारत सरकार
द्वारे नियंत्रित
  • Flag of the Maratha Empire.svg मराठा (१६३७ पर्यंत)
  • मुघल (१६३८ - १७५८)
  • Flag of the Maratha Empire.svg मराठा (१७५९ - १८१८)
  • Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
    • ईस्ट इंडिया कंपनी (१८१८ - १८५७)
    • जुलमी ब्रिटीश राज (१८५७ - १९४७)
  • भारत ध्वज भारत (१९४७ पासून)
सर्वसामान्यांसाठी खुले होय
परिस्थिती अवशेष
Site history
साहित्य दगड

बहादूरगड तथा पेडगावचा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यात दौंड जवळ आहे.

स्थान[संपादन]

बहादूरगड पुण्यापासून सुमारे १०० किलोमीटर (६२ मैल) अंतरावर आहे. जवळचे शहर दौंड आहे. हा किल्ला भीमा नदी च्या उत्तरेकडील दौंड शहराच्या पूर्वेस सुमारे १५ किलोमीटर (९.३ मैल) अंतरावर पेडगाव या गावात आहे.

वर्णन[संपादन]

हा किल्ला आयताकृती आकाराचा आहे. या किल्ल्याला दोन प्रवेशद्वारे आहेत. गावाकडे जाण्याचा दरवाजा चांगल्या अवस्थेत आहे तर नदीच्या दिशेला असलेला दरवाजा मोडकळीस आलेला आहे. किल्ल्याच्या आत ५ फूट (१.५ मी) उंचीचा हनुमानाचा पुतळा आहे. या किल्ल्यामध्ये यादव काळात निर्माण झालेल्या ५ मंदिरांचा गट आहे. हेमाडपंती मंदिरे बालेश्वर, लक्ष्मी-नारायण, मल्लिकार्जुन, रामेश्वर आणि भैरवनाथ यांची आहेत. भैरवनाथ मंदिरासमोर अनेक वीर दगड, सतीगल, तोफांचे गोळे, दीपमाळ आणि शिव मूर्ती आहेत. [१]

इतिहास[संपादन]

या किल्ल्याचा फार कमी इतिहास माहिती आहे. मुघल साम्राज्याच्या काळात पेडगाव हे मुघल सैन्याचे मुख्य ठिकाण होते. १६७२ मध्ये दख्खनेतील मुघल सेनापती खान जहान याने येथे तळ ठोकला आणि शिवाजी महाराजांच्या मराठा सैन्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. भीमा नदीतून पाणी आणण्यासाठी खान जहान याने जलवाहिनी बांधली. यावरील मोट आणि पर्शियन चाक आजही शाबूत आहेत. खान जहान याने या किल्ल्याचे नाव बहादूरगड असे ठेवले. हा किल्ला शिवाजी महाराजांनी मोगल सरदारांना मूर्ख बनवून ताब्यात घेतला होता. गडाच्या आत औरंगजेबाचा दुमजली महाल आहे. या राजवाड्यात संभाजी महाराज औरंगजेबाला भेटले असे समजले जाते. १७५९ मध्ये पेडगाव हे सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी ताब्यात घेतले आणि ते १८१८ पर्यंत मराठ्यांकडे राहिले. [२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Bahadurgad, Western Ghats, Sahyadri, Adventure, Trekking". trekshitiz.com.
  2. ^ "Gazetteers Of The Bombay Presidency - Ahmadnagar". Gazetteers.maharashtra.gov.in. 2019-10-19 रोजी पाहिले.

बाहय दुवे[संपादन]