हातगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हातगड
Hatgad.gif
हातगड
नाव हातगड
उंची
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण नाशिक, महाराष्ट्र
जवळचे गाव नाशिक,बोरगाव,हातगडवाडी
डोंगररांग सातमाळ
सध्याची अवस्था चांगली
स्थापना {{{स्थापना}}}


हातगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

सुरगणा नाशिक मधील एक तालुका.सह्याद्रीच्या पूर्व भागातीलएका रांगेची सुरवात याच तालुक्यापासून होते.यालाच सातमाळ रांग असे म्हणतात.याच रांगेच्या उपशाखेवर हातगड किल्ला आहे

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे[संपादन]

गडावर प्रवेश करण्यापूर्वी चार दरवाजे लागतात.पहिल्या दरवाज्याच्या अगोदरच उजवीकडे कातळात वरच्या भागात कोरलेले पाण्याचे टाके लागते.येथेच कातळात कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे.गडाच्या पहिल्या दरवाज्याचे फक्त खांब शिल्लक आहेत.या दरवाज्याजवळच दोन शिलालेख कोरलेले आहेत.या दरवाज्यातून थोडे वर चढल्यावर आपण दुसऱ्या संपूर्ण कातळातून खोदलेल्या बोगा सारख्या दरवाज्यातून आत जाता येते. दरवाज्याच्या बाजूला एक गुहासुद्धा कोरलेली आहे यात पाण्याची तीन टाकी आहेत.या दरवाज्यातून थोडे वर गेल्यावर गडाचा तिसरा आणि चौथा दरवाजा लागतो.गडमाथा खूप विस्तीर्ण आहे.दरवाज्यातून वर आल्यावर पायर्यांची एक वाट डावीकडे खाली उतरते.येथे मोठा प्रमाणावर तटबंदी आहे.समोरच एक पीर आहे.उजव्याबाजूच्या तटात एक कमान कोरलेली आहे ,पाण्याचे एक टाके आहे. दरावाज्याच्या उजवीकडची वाट धरावी.येथून थोडे वर गेल्यावर पाण्याचे टाके लागते थोडे अजून वर गेल्यावर पडक्या इमारतींचे अवशेष लागतात.येथे एक बुरुज वजा इमारतही आहे. थोडे खाली उरल्यावर पाण्याचा एक तलाव आहे.यामधील पाणी पिण्यास अयोग्य आहे.तलावाच्या समोरच किल्ल्याचे मोठे पठार देखील आहे.किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे.तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे.ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुसऱ्या टोकाला जाते.वाटेत पाण्याची अनेक टाकी लागात. गडाच्या दुसऱ्या टोकाला एक बुरुज आहे.असा हा हातगड नाशिक पासून १०० कि.मी वर आहे .किल्ल्याचे मोठे पठार देखील आहे.किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे.तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे.ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुसऱ्या टोकाला जाते.वाटेत पाण्याची अनेक टाकी लागात. गडाच्या दुसऱ्या टोकाला एक बुरुज आहे.

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

१.हातगडवाडी मार्गे हातगडाला जाण्यासाठी नाशिक गाठावे.नाशिक सापुतारा मार्गावर बोरगाव नावाचा फाटा आहे.येथून एक रस्ता सुरगण्याला जातो तर दुसरा सापुतार्याला जातो.सापुतार्याला जाणाऱ्या रस्त्यावर बोरगावपासून ४ कि.मी अंतरावर हातगडवाडी नावाचे गाव आहे हेच गडाच्या पायथ्याचे गाव आहे.गावातन एक डांबरी रस्ता कळवणला जातो या रस्त्यावरून पुढे जायचे ,हातगडवाडी डाव्या हाताला ठेवायची.पुढे डावीकडे एक बुजलेली विहीर लागते.या विहीरी नंतर ५ मिनिटांनी डांबरी रस्ता सोडून आणि डावीकडची डोंगरधारेवर चढत जाणारी वाट धरावी. या वाटेन १५ मिनिटात आपण एका आंब्याच्या छाडाखाली पोहचतो.पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास साधारणतः पाऊण तास लागतो.

पाण्याची सोय[संपादन]

किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]