रायरीचा किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रायरीचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

रायरीचा किल्ला
नाव रायरीचा किल्ला
उंची ४००० फुट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव सासवड,रायरी गाव
डोंगररांग वाई -सातारा
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


पाचगणीचे टेबललॅड सर्वांनाच महितच असते मात्र त्याच्यापेक्षाही उंच आणि लांब असे टेबललॅड म्हणजे रायरीचे पठार. भोरपासून ८ कि.मी. अंतरावर असणारे हे रायरीचे पठार पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे. दाट झाडी खोल दऱ्या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे.

इतिहास[संपादन]

शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली ती याच रायरेश्वराच्या डोंगरावर मात्र ही घटना काल्पनिक आहे की खरी याबद्दल निश्चित विधान मांडता येणार नाही.

गडावर पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

रायरेश्वरावर पाहण्यासारखे काही नाही. रायरेश्वराचे पठार हे ५ ते ६ कि.मी. पसरलेले आहे.

  • त्यामुळे या पठारावरील वर्षाऋतुत पाहण्यासारखे असते.
  • रायरेश्वरावर शंभुमहादेवा मंदिर लवकर लक्षात येत नाही. पठारावर अलिकडेच गावे वसलेली आहेत. पठारावर भात शेतीचे प्रमाण ही मोठे आहे. *पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोल्हेश्वर, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर, रुद्रमाळ, चंद्रगड, मंगळगड हा स‍र्व परिसर येथून दिसतो.

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

रायरेश्वराला जाण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणत्याही मार्गाने जायचे झाल्यास भोर गावं गाठावे.

  • टिटेधरण कोर्लेबाजूने: पुण्याहून भोरमार्गे आंबेवडे गाठवे. तेथून टिटेधरण कोर्लेबाजूने रायरेश्वरावर जाता येते. वेळे साधारण ३ तास लागतात. वाट काही ठिकाणी अवघड आहे.
    • भोर-रायरी मार्गे: भोर गावातून रायरी गावासाठी सकाळी ११.०० व सायंकाळी ६.०० वाजता (मुक्कामाची) गाडी येते. याच वाटेला सांबरदऱ्याची वाट म्हणून देखील संबोधतात. या वाटेने रायरेश्वर गाठण्यास २ तास लागतात.
      • केजंळगडावरुनः केजंळगडावरुन सूणदऱ्याने किंवा श्वाणदऱ्याने सूध्दा रायरेश्वराला जाता येत.

बाह्य दुवे[संपादन]