एकनाथ खडसे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एकनाथ खडसे

पूर्व महसूल मंत्री, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य
कार्यकाळ
३१ ऑक्टोबर २०१४ – ३ ऑक्टोंबर २०१६

कार्यकाळ
१९८९ – २०१९

विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा
कार्यकाळ
२००९ – २०१४

पाटबंधारे मंत्री , सिंचन मंत्री महाराष्ट्र राज्य
कार्यकाळ
१९९७ – १९९९

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी मंदाताई एकनाथ खडसे
नाते * मंदाताई एकनाथ खडसे (पत्नी)
 • निखिल एकनाथ खडसे (मुलगा)
अपत्ये * रोहिणी खडसे - खेवलकर(मुलगी)
 • शारदा चौधरी. (मुलगी)
 • निखिल खडसे.
निवास १. मुक्ताई (फार्म हाऊस), मुक्ताईनगर,जी. जळगाव

२.कोथळी, मुक्ताईनगर, जी. जळगाव.

व्यवसाय नेता,पुढारी,राजनितिज्ञ.
धंदा शेती , उद्योग.
धर्म लेवा, हिंदू.
https://zeenews.india.com/marathi/news/maharashtra-assembly-elections-2014/distribution-of-minisrty-announced-in-devedra-fadnaviss

एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पुढारी आहेत[१]. ते मुक्ताईनगरचे आमदार व महाराष्ट्राचे माजी महासुल-मंत्री होते.२००९ पासून ते २०१४ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेत भारतीय जनता पार्टीतर्फे विरोधीपक्ष नेता होते. १९९७-१९९९ या काळात खडसे पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजयी झाल्यानंतर खडसे महसूल मंत्री बनले, तसेच कृषी मंत्री, अल्पसंख्याक विकास मंत्री बनलेे.

जीवनचरित्र[संपादन]

एकनाथ खडसे हे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आहे.ते भारतीय जनता पार्टी चे ज्येष्ठ नेते आहेत.ते मुक्ताईनगर चे रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव गणपत खडसे व आईचे नाव गोदावरीबाई गणपत खडसे आहे. त्यांना दोन मुली आहेत शारदा आणि रोहिणी खडसे. त्यांची सून रक्षा निखिल खडसे रावेर लोकसभा मतदार संघातून लोकसभेत खासदार आहेत. खडसेंना ज्येष्ठ व कनिष्ठ भाऊ सुध्धा आहेत. खडसे मुक्ताईनगरच्या आदीशक्ति मुक्ताई चे उपासक आहेत असे त्यांचे वक्तव्य आहे . एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिल खडसे याने १ मे २०१३ रोजी आत्महत्या केली. [२]

राजकीय कारकीर्द[संपादन]

एकनाथ खडसे यांच्या राजनैतिक जीवनाची सुरुवात कोथळी गावमध्ये सरपंच बनण्यापासून झाली. जेव्हा पहिल्यांदा ते कोथळी ग्रामपंचायतीमध्ये सभासद पदासाठी उभे राहिले तेव्हा त्यांचा पराभव झाला होता. नंतर दुसऱ्या वेळी ते निवडून आले. १९८९ मध्ये ते मुक्ताईनगर तालुक्यातून विधानसभेसाठी निवडणुकीसाठी उभे राहिले व ते निवडून आले. तेव्हापासून ते मुक्ताईनगर तालुक्यातून विधानसभेसाठी अपराजित राहिले आहेत.२००९ मध्ये एकनाथ खडसेंची महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेवर भा.ज.प. निवडून आली तेव्हा खडसे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते परंतु देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली. खडसे हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री, कृषी मंत्री, राज्य उत्पादनशुल्क मंत्री बनले २०१६ मद्धे खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. २०१९ मध्ये आमदारकीसाठी त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर हिला भाजपने तिकीट दिले. शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भजपा, रोहिणी खडसे विरुद्ध अपक्ष फॉर्म भरला. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने पाठिंबा दिला व 'चंद्रकांत पाटील' यांनी रोहिणी एकनाथ खडसे (बिजेपी) यांचा १९८९ मतांनी पराभव केला.ते प्रथम वेळेस आमदार बनून निवळून आले [३]

एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जामनेरचे आमदार व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या वर आरोप केले. गिरीश महाजन व देवेंद्र फडणवीस यांच्या मुळेच आपले तिकीट कापले गेल्याचा खळबळ जनक आरोप त्यांनी एका वृत्त-वाहिनिशी बोलतांना केला[४]. आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा कट रचला गेला असाही आरोप त्यांनी केला. जनाधार असलेल्या नेत्यांना तिकीट नाकारले व दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना तिकीट दिले गेले त्यामुळेच २०१९ विधानसभेत अपयश आले असे ते म्हणाले. खडसे यांनी आरोप केला की कोर कमिटी च्या बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना आपल्या बद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आपल्याला (खडसेंना) तिकीट दिले गेले नाही[५].

विधानसभेतील उल्लेखनीय कामगिरी[संपादन]

एकनाथ खडसेंनी महाराष्ट्रातील ज्वलंत विषय विधानसभा अधिवेशनापर्यंत पोचविले. त्यांच्या उल्लेखनीय अशा वक्तृत्वाने त्यांनी नेहमीच अधिवेशनात छाप पाडली.. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न ते सदैव करत असत.

२९ मार्च २०१७ ला अर्थसंकल्पाच्या विविध चर्चांत त्यांनी भारतीय जनता पक्षात असूनसुद्धा भा.ज.प.ला धारेवर धरले, टीकेचा भडिमार केला. औद्यागिक क्षेत्रात राज्याची पीछेहाट झाल्याची त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे सांगितले होते . यासंदर्भात प्रश्न उभे करत राज्यात आतापर्यंत किती गुंतवणूक झाली? मुंबई, पुणे, नाशिक कॉरिडॉर वगळता राज्यात उद्योगांची स्तीथी काय? उत्तर महाराट्रात एकतरी उद्योग युनिट आल का, एकतरी कारखाना उभा राहिला का, याची माहिती सरकारने द्यावी असा परखळ सवाल खडसेंनी सरकारला विचारला.

 • २९ मार्च २०१७ ला विधानसभत शेतकऱ्यांचा प्रश्न ऊर्जा मंत्र्यांसमोर व मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. सरकारला जनतेला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली-
 • राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहेे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला पाणी द्यायला वीज मिळत नाही, असे खडसेंनी सांगितले.
 • निवडणुकीत जनतेला आश्वासन दिले होते की २४ ताास वीज देेऊ, त्या आश्वासनााचेे काय झाले, असा सवाल त्यांनी खड्या आवाजात ऊर्जा मंत्री बावनकुळे यांना केला.[१]

इसवी सन २००० पूर्वीचा काळ[संपादन]

भारतीय जनता पक्ष - शिवसेना (१९९७-१९९९) सरकारमध्ये खडसे पाटबंधारे मंत्री राहिले.

एक सिंचन मंत्री म्हणून त्यांनी १९९७ ते १९९९ ह्या कालावधीमधे संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक सिंचन प्रकल्प मंजूर केले तसेच अपूर्ण प्रकल्प पूर्ण केले. कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत पाटबंधारे प्रकल्पांना गती दिली. विशेषतः " आधी पुनर्वसन, मग पाटबंधारे प्रकल्प " असा पुरोगामी निर्णय घेतला. या कालावधीमधे, त्यांनी उत्तर महाराष्ट्रासाठी तापी खोरे महामंडळाची स्थापना केली व खानदेशातील ५००० कोटी रुपयांचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण केले. त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील २५०० कोटी रुपयांच्या उपसा सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली.

राजकीय जीवनातील महत्त्वाचे टप्पे[संपादन]

 • १९८८ - कोथळी गावचे सरपंच झाले.
 • १९८९ - मुक्ताईनगर चे आमदार बनले.
 • १९९७ - भारतीय जनता पक्ष-शिवसेना सरकारमध्ये पाटबंधारे मंत्री बनले.
 • २०१० - विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.
 • २०१४ - भा.ज.प. सरकारमध्ये महासूल मंत्री, कृषी मंत्री, अल्पसंख्याक मंत्री, उत्पादन शुल्क मंत्री बनले.
 • २०१६ - महसूल मंत्रिपदावरून राजीनामा दिला.

संदर्भ[संपादन]

१. पक्षाने माझ तिकीट का कापलं? याची कारणं अजूनही शोधतोय: एकनाथ खडसे


२. झी २४ तास - (बुधवार,२९ मार्च २०१७) एकनाथ खडसे विरोधकांच्या भूमिकेत, प्रश्नांच्या सरबत्तीने सरकार घायाळ

बाह्य दुवे[संपादन]

१. https://zeenews.india.com/marathi/news/maharashtra-assembly-elections-2014/distribution-of-minisrty-announced-in-devedra-fadnaviss

 1. ^ लोकमत, ऑनलाईन (०६ नोव्हेंबर २०१९). "मला त्रास देणाऱ्यांची नाव उघड करणार : एकनाथ खडसे नी खडसावले". लोकमत. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ०६ नोव्हेंबर २०१९ रोजी मिळविली). १० नोव्हेंबर २०१९ रोजी पाहिले. 
 2. ^ http://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-leader-eknath-khadses-son-attempts-suicide-in-jalgaon-107033/
 3. ^ पेपर, लोकमत (२५ ऑ्टोबर २०१९). "पाटील जिंकले... खडसे हरल्या...". लोकमत (पेपर). pp. १३. ([www.epaperlokamat.in आधीच्या मूळ आवृत्तीत] Check |url= scheme (सहाय्य) त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक २५ ऑक्टोबर २०१९ रोजी मिळविली). २५ ऑक्टोबरबर २०१९ रोजी पाहिले. 
 4. ^ न्यूज चॅनल, Zee २४ तास (०२ जानेवारी २०२० ,१३:२७ .). "माझं तिकीट कपण्यामागे 'फडणवीस आणि महाजन' - एकनाथ खडसे.". Zee २४ तास. ०३ जानेवारी २०२०. रोजी पाहिले. 
 5. ^ Web team., ABP माझा (०३ - जानेवारी - २०२०). "देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन मुळे आपले तिकीट कापले गेले असा आरोप एकनाथ खडसे ने केला." [Eknath Khadse : Due to Fmr Chief Minister Devendra Fadnavis and Girish Mahajan I didn't got ticket for Maharashtra assembly election 2019.]. ABP माझा. ०३ - जानेवारी - २०२० रोजी पाहिले. 

२. झी २४ तास - (बुधवार २९ मार्च २०१७) एकनाथ खडसे विरोधकांच्या भूमिकेत प्रश्नांच्या सरबत्ती ने सरकार घायाळ.स्रोत[संपादन]

१. https://m.lokmat.com/ahmadnagar/i-will-reveal-names-those-who-harass-me-eknath-khadse-shirdi-sightseeing/