कल्याण काळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.


कल्याण काळे
Kalyan Kale.jpg
जन्म नाव कल्याण वासुदेव काळे
जन्म १६ डिसेंबर १९३७

कल्याण वासुदेव काळे (१६ डिसेंबर , १९३७ - )[१] हे एक मराठी लेखक आहेत. हे मुख्यत्वे भाषेविषयी लिहितात.

काळे हे एम.ए. (संस्कृत), एम.ए. (मराठी) असून त्यांनी, 'पराड्याचे हंसराज स्वामी : चरित्र, वाङ्मय आणि तत्त्वज्ञान' या विषयावर प्रबंध लिहून पीएच.डी. (मराठी) मिळवली आहे.[२] त्यांच्या या प्रबंधाला पुणे विद्यापीठाची डॉ. य.वि. परांजपे आणि कै. न.चिं. केळकर ही दोन पारितोषिके मिळाली आहेत.

काळे हे पुणे विद्यापीठातल्या मराठी विभागात अधिव्याख्याता होते. त्यांना महाविद्यालयीन व विद्यापीठीय अध्यापनाचा ३१ वर्षांचा अनुभव आहे. १९६६ पासून य्यांनी नंदुरबार महाविद्यालय, पश्चिम विभागीय भाषा केंद्र (डेक्कन कॉलेज), पुणे विद्यापीठ या संस्थांत, मराठी साहित्य, संस्कृत, मराठी भाषा आणि भाषाविज्ञान या विषयांचे अध्यापन केले आहे. पीएच.डीचे ते संशोधक मार्गदर्शक होते. त्यांनी अनेक ग्रंथांत व विविध वाङ्मयीन नियतकालिकांत लेखन केले आहे.

पुस्तके[संपादन]

  • पराड्याचे हंसराज स्वामी : चरित्र, वाङ्मय आणि तत्त्वज्ञान
  • भाषांतरमीमांसा (सहलेखिका - डाॅ. अंजली सोमण)
  • भाषाविज्ञान : स्वरूप आणि पद्धती
  • मराठी अक्षरलेखन
  • लर्निग मराठी
  • Learning Marathi Through English (सहलेखिका - डाॅ. अंजली सोमण)
  • व्यावहारिक मराठी
  • निवडक भाषा आणि जीवन

संदर्भ[संपादन]


संदर्भसूची[संपादन]

  • काळे, कल्याण आणि सोमण, अंजली (संपा.). वर्णनात्मक भाषाविज्ञान : स्वरूप आणि पद्धती.