अजित पवार
अजित अनंत पवार | |
विद्यमान | |
पदग्रहण २ जुलै २०२३ (देवेंद्र फडणवीससह वाटलले २/७/२३-४/१२/२०२४) (एकनाथ शिंदेसह वाटलेले ५/१२/२०२४-) | |
मुख्यमंत्री | एकनाथ संभाजी शिंदे (२०२३-२०२४) ॲड. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस (२०२४ पासून) |
---|---|
मागील | ॲड. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस |
अजित पवार | |
---|---|
जन्म |
अजित अनंतराव पवार २२ जुलै, १९५९ देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि.अहमदनगर |
निवासस्थान | सहयोग,बारामती,जि.पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
टोपणनावे | दादा |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | बी.कॉम्. |
पेशा | राजकारण |
कारकिर्दीचा काळ | इ.स. १९८२ पासून |
मूळ गाव | काटेवाडी ता. बारामती जि. पुणे |
पदवी हुद्दा |
उपमुख्यमंत्री ( महाराष्ट्र राज्य ) अध्यक्ष, एनसीपी |
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
धर्म | हिंदू |
अपत्ये | पार्थ पवार, जय पवार |
वडील | अनंतराव पवार |
नातेवाईक | शरद पवार (काका), सुप्रिया सुळे (चुलत बहिण) |
अजित अनंतराव पवार (२२ जुलै १९५९) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी आहेत. २ जुलै २०२३ पासून ते महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत.[१] २०२२-२३ या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून काम केले आहे. [२]
ते १९९१ पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.[३][४] राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत. ते सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून, सध्या ते पाचव्यांदा या पदावर आहेत. [५][६]
२०१९ मध्ये, त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी दावा केला की त्यांना राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे. परंतु ३ दिवसात दोघांनी राजीनामा दिला. २०२३ मध्ये त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, यामुळे राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व फूट पडली. तसेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर देखील हक्क सांगितला. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आणि विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून राष्ट्रवादी पक्ष स्वतःकडे घेण्याचे संकेत दिले. [७][८][९]
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
विशेष माहिती
[संपादन]महाराष्ट्रात याना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असलेल्या काही मोजक्याच नेत्यांपैकी एक म्हणजे अजित पवार. त्यांच्यावर प्रसिद्धी माध्यमांतून व विरोधकांकडून नेहमीच कडाडून टीका होते.अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात भरपूर विकास कामे करून शहराचा कायापालट केला आहे.[७]
बालपण व शिक्षण
[संपादन]अजित पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले, शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली.[ संदर्भ हवा ]
कारकीर्द
[संपादन]अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली.
पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली. १६ वर्ष ते त्या पदावर होते.
अन्य पदे
[संपादन]- विश्वस्त : विद्या प्रतिष्ठान, बारामती
- संचालकः छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता.इंदापूर, जिल्हा, पुणे
- संचालक : श्री.छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, जिल्हा, पुणे
- संचालक : माळेगांव सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
- संचालक : सोमेश्र्वर सहकारी साखर कारखाना, जिल्हा पुणे
- संचालक : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे
- संचालक : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे
- संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी.दूध उत्पादक संघ, पुणे
- संचालक : रयत शिक्षण संस्था, सातारा
- माजी संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई
- माजी संचालक : महानंद
- माजी संचालक : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई
- अध्यक्ष : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – मार्च इ.स. १९९१ ते ऑगस्ट इ.स. १९९१ व डिसेंबर इ.स. १९९४ ते डिसेंबर इ.स. १९९८
- अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक – डिसेंबर, इ.स. १९९८ ते ऑक्टोबर, इ.स. १९९९
- अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन – सप्टेंबर इ.स. २००५ ते मार्च २०१३
- अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन – ऑगस्ट , इ.स. २००६पासून
- अध्यक्ष : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन - मार्च २०१३ पासून
- अध्यक्ष : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ – सप्टेंबर इ.स. २००६पासून
- लोकसभा सदस्य : जून, इ.स. १९९१ ते सप्टेंबर, इ.स. १९९१.
- विधानसभा सदस्य : इ.स.१९९१
१९९५ ते इ.स. १९९९, इ.स. १९९९ ते इ.स. २००४, इ.स. २००४ ते इ.स. २००९, इ.स. २००९ ते २०१४ , इ.स २०१४.ते २०१९ , इ.स २०१९ ते २०२४ ,
- राज्यमंत्री : कृषी, फलोत्पादन आणि उर्जा - इ.स. १९९१ ते नोव्हेंबर इ.स. १९९२.
- राज्यमंत्री : जलसंधारण, ऊर्जा व नियोजन – नोव्हेंबर, इ.स. १९९२ ते फेब्रुवारी, इ.स. १९९३.
- मंत्री - पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे), फलोत्पादन – ऑक्टोबर इ.स. १९९९ ते जुलै इ.स.२००४.
- मंत्री - ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे) – इ.स. जुलै २००४ ते नोव्हेंबर २००४.
- मंत्री - जलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता – नोव्हेंबर, इ.स. २००४ ते नोव्हेंबर, इ.स. २००९.
- मंत्री - जलसंपदा (कृष्णा खोरे व कोंकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून), ऊर्जा – नोव्हेंबर, इ.स. २००९ ते नोव्हेंबर, इ.स. २०१०.
- उप मुख्यमंत्री,(वित्त व नियोजन, ऊर्जा) - नोव्हेंबर, इ.स. २०१० ते सप्टेंबर इ.स.२०१२.
- उप मुख्यमंत्री(वित्त व नियोजन, ऊर्जा) - डिसेंबर इ.स. २०१२ ते इ.स. सप्टेंबर २०१४.[ संदर्भ हवा ]
- उप मुख्यमंत्री(महाराष्ट्र राज्य) - इ.स. २०१९ ते इ.स. २०१९.(२ दिवसाचे)
- उप मुख्यमंत्री(महाराष्ट्र राज्य ) - जुलै इ.स. २०२३.
खासदारकी, आमदारकी व मंत्रिपदे
[संपादन]१९९१ साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार पी.व्ही. नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले.
अजित पवार त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९, आणि २०१४ , २०१९, असे सलग सहा वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.
१९९५ साली महाराष्ट्रात (भाजप+शिवसेना) या युतीचे सरकार आले. त्यानंतर १९९९ साली पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले.
महाराष्ट्राच्या विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ऑक्टोंबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते. डिसेंबर २००३ ते ऑक्टोंबर २००४ या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.
२००४ साली आघाडी सरकार (कॉंग्रस + राष्ट्रवादी काँग्रेस + इतर) पुन्हा सत्तेवर आले तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडेच होते. २००४ साली त्यांना पुण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले. २०१४ पर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अर्थिक घोटाळ्याला ते जबाबदार असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. सक्त वसुली संचालनालय (Enforcement Directorate) या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात करणार त्यापूर्वीच अजित पवार यांनी २७ सप्टेंबर २०१९ रोजी आमदारकीचा राजीनामा दिला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्य दुवे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "In Ajit Pawar's Shock Switch, A Sharad Pawar Question Ahead of 2024". NDTV (इंग्रजी भाषेत).
- ^ "Ajit Pawar new Opposition leader in Maharashtra assembly | India News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया.
- ^ "Baramati Election Result 2019 Live: Baramati MLA Election Result & Vote Share - Oneindia". oneindia.com (इंग्रजी भाषेत). 2021-09-18 रोजी पाहिले.
- ^ "Deputy CM for fourth time: The return of Ajit Pawar". India Today (इंग्रजी भाषेत). December 30, 2019. 2021-09-18 रोजी पाहिले.
- ^ https://www.loksatta.com/explained/ajit-pawar-revolt-in-ncp-know-deputy-chief-minister-history-and-law-related-to-dcm-prd-96-3764288/
- ^ "How Sharad Pawar outwitted his nephew Ajit". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2019-11-27. 2021-09-18 रोजी पाहिले.
- ^ a b "Ajit Pawar biography in marathi". wikipediall. 2019-03-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-03-26 रोजी पाहिले.
- ^ "Maharashtra NCP Ajit Pawar..." The Wire.
- ^ "Surprise, surprise: Devendra Fadnavis sworn in as Maharashtra CM, Ajit Pawar Dy CM". India Today (इंग्रजी भाषेत). November 23, 2019. 2022-03-06 रोजी पाहिले.
- इ.स. १९५९ मधील जन्म
- विस्तार विनंती
- महाराष्ट्रामधील राजकारणी
- महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
- मराठी व्यक्ती
- महाराष्ट्राचे विद्यमान आमदार
- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
- बारामतीचे खासदार
- महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य
- पवार परिवार
- महाराष्ट्रातील आमदार
- बारामतीचे आमदार