गिरीश महाजन

From विकिपीडिया
Jump to navigation Jump to search
गिरीश महाजन

जल-संपदा मंत्री महाराष्ट्र राज्य
कार्यकाळ
३१ ऑक्टोबर २०१४ – २०१९

विधानसभा सदस्य
जामनेर विधानसभा मतदारसंघ साठी

आमदार

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
नाते *
अपत्ये *
निवास जामनेर , जी.जळगाव,महाराष्ट्र
व्यवसाय नेता,पुढारी.
धर्म गुज्जर , हिंदू.

गिरीश दत्तात्रेय महाजन हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत[१].ते महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री होते.ते जामनेर चे आमरदार आहेत. उत्तर महाराष्ट्रतील‌ राजकारणात त्यांचा प्रभााव आहे.ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र आहेत. महाजन सलग‌‌ सहा वेळा जामनेरमधून विधानसभेवर निवडून गेले.

२०१९ विधानसभा निवडणुक ही त्यांची भाजप पक्षाच्या तिकिटावर निवडून येण्याची सहावी वेळ ह़ोती.[२].

राजकीय कारकीर्द[edit]

गिरीश महाजन २०१४ मध्ये भाजप-शिवसेना सरकार मध्ये जलसंपदा खात्याचे मंत्री होते.ते पाच वेळेस जामनेरचे आमदार राहिले आहेत. उत्तर महाराष्ट्र मध्ये एकनाथ खडसे बरोबरच गिरीश महाजन असे दोन भाजप सत्ता ध्रुव आहेत.२०१६ मध्ये एकनाथ खडसे वर त्यांच्या मंत्रिपदाचा गैर वापर केल्याचे आरोप लागले, खडसे ना मंत्री पदावरून राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून गिरीश महाजन यांना उत्तर महाराष्ट्राच्या व राज्य पातळीवरील राजकारणात अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले. भाजपा तील निर्णयांमध्ये महाजनांचा प्रभाव वाढला.

विवाद[edit]

१ जानेवारी २०२० ला भाजप चे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी महसूल-मंत्री एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन वर आरोप केले की त्यांच्या मुळेच आपणास २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली. आपले राजकारण संपवण्याचा कट रचला गेला असा आरोप त्यांनी गिरीश महाजन,माजी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर केले[३]. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन ने जाणीवपूर्वक आपले तीकिट कापले असा आरोप केेेला[४][५].

बाह्य दुवे[edit]

१. गिरीश महाजन माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य.

स्रोत[edit]

  1. ^ न्यूज नेटवर्क., लोकमत (०४ जानेवारी २०२०). "माजी मंत्री गिरीश महाजन.". लोकमत पेपर. ०४ जानेवारी २०२० रोजी पाहिले. 
  2. ^ News website., Aajtak.in (३० सप्टेंबर २०१९). "गिरीश महाजन यांनी पाच वेळेस निवडून आणले आहे बीजेपी ला.". आजतक. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक |विदा संकेतस्थळ दुवा= जरुरी |विदादिनांक= (सहाय्य) रोजी मिळविली). ०४ जानेवारी २०२० रोजी पाहिले. 
  3. ^ Online., Loksatta (३ जानेवारी २०२०). "माजी मंत्री एकनाथ खडसे ने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या मुळेच तिकीट मिळाले नाही असा थेट आरोप केला.". Loksatta news paper. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक |विदा संकेतस्थळ दुवा= जरुरी |विदादिनांक= (सहाय्य) रोजी मिळविली). ०६ जानेवारी २०२० रोजी पाहिले. 
  4. ^ वेब टीम., एबीपी माझा (०३ जानेवारी २०२०). "खडसे यांनी थेट आरोप केले , देवेन्द्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी जाणीवपूर्वक आपले तिकीट कापले.". ABP माझा , न्यूज चॅनल. ०६ जानेवारी २०२० रोजी पाहिले. 
  5. ^ मराठी न्यूज चॅनल., Zee २४ तास (०३ जानेवारी २०२०.). "एकनाथ खडसे महणाले देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन माझ्या तिकीट कापण्यमागे कारणीभूत आहेत.". Zee २४ तास. ०६ जानेवारी २०२०. रोजी पाहिले.