उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तरे कडील एक भौगोलिक भाग आहे. यात नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्याचा समावेश होतो.[१]
उत्तर महाराष्ट्र | |
|---|---|
| देश | भारत |
| राज्य | महाराष्ट्र |
| क्षेत्रफळ | |
| • एकूण | १५,५३० km२ (६,००० sq mi) |
इतिहास
[संपादन]१३ मार्च १७९५ला मराठ्यांनी अहमदनगर येथिल निझामचा पराभव केला आणि आताच्या जळगाव जिल्हातील भूभाग मराठा राज्याच्यत आला.[२] या विभागाच्या दक्षिणेकडील भागवर चालुक्य राज्यांनी राज्य केले होते.[३] पारोळा येथील १६० चौरस फूट एवढा विस्तारलेला किल्ला एकेकाळी राणी लक्ष्मीबाईच्या वडिलांच्या आधिपत्य खाली होता असे मानले जाते. १९५६ला जळगाव जिल्ह्य नवीन तायार झालेल्या बॉम्बे राज्याचा भाग बनला. १९६० नंतर महाराष्ट्रा राज्य निर्माण झाले आणि पूर्व खान्देश जिल्हा माहृष्ट्रचा भाग बनला. त्यावेळेला जळगाव जिल्ह्याच नाव हे पूर्व खान्देश जिल्हा असे होते.
भूगोल
[संपादन]उन्हाळ्यामध्ये या विभागातील जळगाव जिल्हाच तापमान ४४° से पेक्षा वर जाते.[४]
नद्या
[संपादन]या विभागातील नाशिक जिल्हात गोदावरी नदी आगे. तापी, पांझरा नद्या धुळे, नंदुरबार जिल्हात आहेत.
पर्यटन स्थळे
[संपादन]या जिल्ह्यात अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. मुक्ताईनगर तालुक्यात शिरसाळा गावातील हनुमान मंदिर खूप प्रसिद्ध मंदीर आहे, तेथे भाविक नेहमी मोठ्या संख्येने येतात, हनुमान जयंती, शनी अमावस्या, प्रतेक मंगळवार - शनिवारला जास्त गर्दी असते. मुक्ताईनगर गावातील संत मुक्ताबाई मंदीर प्रसिद्ध आहे, तेथे भाविक - पर्यटक मोठ्या संख्येने येतात. वारकरी संप्रदायातील लोक आषाढी कार्तिकीला मंदिरात जास्त येतात.
एरंडोल जवळील पद्मालय गणपती मंदीर खूप लोकप्रिय आहे, तेथे मोठ्या संख्येने भाविक येतात.
उल्लेखनीय व्यक्ती
[संपादन]• संजु राठोड (मराठी पॉप स्टार, संगीत निर्माता, गायक, गीतकार) - रा. धानवड, ता. जळगाव [५]
• भालचंद्र नेमाडे (प्रसिद्ध लेखक) - रा. सांगवी, ता. यावल
• बहिणाबाई चौधरी (कवयित्री) - रा. आसोदा भादली, ता-जी. जळगाव
• साचिन कुमावत (आहिराणी गायक, संगीतकार, निर्माते) - रा. शेंदुर्णी, ता. जामनेर
• विनायक दामोदर सावरकर ( नाशिक कटातअंदमानला शिक्षा भोगली) - रा. नाशिक
• विर बापू गायधनी - रा. नाशिक [६]
• गिरीष महाजन (माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य, जमानेर चे आमदार) - रा. जामनेर
• बालकवी ठोंबरे (कवी) - रा. धरणगाव, ता. धुळे [७]
संदर्भ
[संपादन]- ^ https://economictimes.indiatimes.com/news/economy/infrastructure/harmonized-growth-of-north-maharashtra/articleshow/4961788.cms
- ^ lib.pune.ac.in
- ^ lib.pune.ac.in
- ^ "संग्रहित प्रत". 2023-10-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-03-30 रोजी पाहिले.
- ^ https://mirchi.in/stories/music/sanju-rathod-drops-another-marathi-pop-song-sundari/152787256&ved=2ahUKEwiUurSF-aeQAxU-TGwGHVLGARoQxfQBKAB6BAgOEAE&usg=AOvVaw3VTcFaz5fkiJhEkAp8QtgP[permanent dead link]
- ^ बालभारती. पुणे: महाराष्ट्र पुस्तक संशोधन मंडळ पुणे.
- ^ बालभारती. पुणे: महाराष्ट्र राज्य पुस्तक संशोधन मंडळ पुणे.