बहुजन विकास आघाडी
Appearance
बहुजन विकास आघाडी हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. ठाणे जिल्ह्यामधील कुणबी समाजामध्ये प्राबल्य असलेल्या बहुजन विकास आघाडीचे पक्षप्रमुख हितेंद्र ठाकूर आहेत. विरार येथे मुख्यालय असलेली बविआ प्रामुख्याने वसई-विरार-नालासोपारा ह्या भागात कार्यरत आहे.
२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांमध्ये बविआला ३ जागांवर विजय मिळाला.