"विनायक दामोदर सावरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १६८: ओळ १६८:
स्फुट काव्य
स्फुट काव्य
* [[सावरकरांच्या कविता]]
* [[सावरकरांच्या कविता]]

==स्वातंत्रवीर सावरकरांवर लिहिलेली पुस्तके आणि त्याचे प्रकाशक==
;चरित्रग्रंथ:
* अत्रे, प्रभाकर १९८५. वसा वादळाचा स्नेहल प्रकाशन, पुणे
* अधिकारी, गोपाळ गोविंद १९३७. बॅ. सावरकर यांचे चरित्र. महाराष्ट्र प्रकाशन संस्था, मुंबई
* आचार्य अत्रे, मालशे, स.गं.(संपादक) १९८३. क्रांतिकारकांचे कुलपुरूष सावरकर, परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
* आठवले, रा.म. १९३८. बॅ. विनायक दामोदर सावरकर
* आफळे, गोविंदस्वामी (लेखक व प्रकाशक) १९६७. सावरकर गाथा
* उपाध्ये, संजय २००२. विनायक विजय . चंद्रकला प्रकाशन, पुणे
* अंदूरकर, व्यं.गो. १९७०. शत्रूच्या गोटात सावरकर । सुरस ग्रंथमाला, सोलापूर
* करंदीकर, शि.ल. १९६६. असे होते वीर सावरकर । सीताबाई करंदीकर, पुणे
* करंदीकर, सीताबाई १९४३. सावरकर-चरित्र (कथन), सीताबाई करंदीकर, पुणे
--?--१९४७. सावरकरांचे सहकारी, गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
* कऱ्हाडे, शंकर १९८३. गोष्टीरूप सावरकर , विजय प्रकाशन, नागपूर
* किर्लोस्कर, मुकुंदराव (संपादक) १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी जीवनावरील अलौकिक विशेषांक , सावरकर दर्शन प्रतिष्ठान, पुणे
* कीर, धनंजय १९५०. सावरकर ॲन्ड हिज टाइम्स
* खांबेटे, द.पां.(अनुवाद), १९७२. स्वातंत्र्यवीर सावरकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
* कुळकर्णी, श्यामकांत २०००. गाथा थोर क्रांतीभास्कराची, विजय प्रकाशन, नागपूर
* केळकर, भा.कृ. १९५२. सावरकर-दर्शन व्यक्ति नि विचार, गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
* खाडिलकर, नीळकंठ १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि प्रॅक्टिकल सोशॅलिझम, दैनिक नवाकाळ प्रकाशन, मुंबई
* गद्रे, अनुराधा अ. २००५. स्वातंत्र्यवीर सावरकर, मनोरमा प्रकाशन, मुंबई
* गोखले, द.न. १९८९. स्वातंत्र्यवीर सावरकर: एक रहस्य, मौज प्रकाशन गृह, मुंबई
* गोखले, मो.शी. १९४०. वीर सावरकर
* गोखले, विद्याधर २००५. झंझावात , मनोरमा प्रकाशन, मुंबई
गोखले, श्री.पु. १९६९. अशी गर्जली वीरवाणी , लोकमान्य प्रकाशन, पुणे
--?--१९८३. सावरकरांशी सुखसंवाद , मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
* गोडसे, गोपाळ १९६९. जय मृत्युंजय (स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील कविता), केसरी प्रकाशन, पुणे
* गोडबोले, अ.मा. १९९७. क्रांतदर्शी सावरकर , साहित्यसेवा प्रकाशन, औरंगाबाद
* गोविंदमित्र १९५७. स्वातंत्र्यवीर श्री. विनायक दामोदर सावरकर यांचे काव्यमय चरित्र, गं.वि.परचुरे, कल्याण
* घाणेकर, ऋचा २००३. स्वातंत्र्यवीर सावरकर, महाजन ब्रदर्स, पुणे
* जोगळेकर, ज.द. १९८३. स्वातंत्र्यवीर सावरकर वादळी जीवन , उत्कर्ष प्रकाशन, पुणे
* जोगळेकर, ज.द. १९८३. पुनरुत्थान, पंडित बखले, मुंबई
* जोशी, विष्णू श्रीधर १९८५. क्रांतीकल्लोळ, मनोरमा प्रकाशन, मुंबई
* --?--१९९२. अखेर उजाडलं, पण देश रक्तबंबाळ । मनोरमा प्रकाशन, मुंबई
* --?--१९९२, झुंजः सावरकरांची । मनोरमा प्रकाशन, मुंबई
* ताटके, अरविंद १९७३. युगप्रवर्तक सावरकर । स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
* दुगल, न.दि. १९८३. देशप्रेमा... तुझे नाव सावरकर । अजब पुस्तकालय, कोल्हापूर
* देशपांडे, बालशंकर १९५८. क्रांतिकारकांचे मुकुटमणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
* देशपांडे, भास्कर गंगाधर १९७४. क्रांतिसूर्य सावरकर, अजय प्रकाशन, औरंगाबाद
* देसाई, हरिश्चंद्र त्र्यंबक १९८३. शतपैलू सावरकर । प्रबोधन, मुंबई
* नातू, र.वि. १९९७. समग्र सावरकर खंड १० , पृष्ठे ६००० ची संदर्भसूची, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
* पेठे, मंगला कृ. १९८४. सावरकर गौरव गान
* फडके, य.दि. १९८४. शोध सावरकरांचा , श्रीविद्या प्रकाशन, पुणे
* बखले पंडित (संपादक) १९६०. मृत्युंजय सावरकर
* बर्वे, शंकर नारायण १९४७. स्वातंत्र्यवीर (बॅ.सावरकर यांच्या चरित्रातील काही पद्यमय प्रसंग), विष्णू सि. चितळे, पुणे
* बोडस, आनंद ज. २००७. सावरकरांची तिसरी जन्मठेप , मनोरमा प्रकाशन, मुंबई
* भट, रा.स. १९७२. सावरकरांचे जीवनदर्शन , वोरा अँड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि., मुंबई
* भागवत, अ.गो. (अनुवाद) १९४७. बॅरिस्टर सावरकर चरित्र अ.गो. भागवत, बडोदा
* भालेराव, सुधाकर सोवनी १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंथन , प्रमोद प्रकाशन, नागपूर
* भावे, पु.भा. १९८२. सावरकर नावाची ज्योत , सन पब्लिकेशन्स, पुणे
* भिडे, ग.र. १९४२. सावरकरांची सूत्रे , कोल्हापूर
* भिडे, गोविंद १९७३. सागरा प्राण तळमळलाः स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्दरूप
जीवनदर्शन , जोशी ब्रदर्स बुकसेलर्स अँड पब्लिशर्स, पुणे
भोपे, रघुनाथ गणेश १९३८. स्वातंत्र्यवीर बॅ.विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनचरित्र , भोपे, र.ग., अहमदनगर
मेहरूणकर, प्रभाकर १९९३. तेजोनिधी सावरकर , मोरया प्रकाशन, डोंबिवली
रायकर, गजानन १९६६. महापुरूष स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र
रानडे, सदाशिव राजाराम १९२४. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर ह्यांचे संक्षिप्त चरित्र , लोकमान्य छापखाना, मुंबई
वर्तक, श्रीधर रघुनाथ १९७०. क्रांतदर्शी सावरकर , संग्राहक काळ, प्रकाशन, पुणे
व-हाडपांडे, व.कृ. (संपादक), १९८३. गरूडझेप (सावरकर गौरवग्रंथ) , विजय प्रकाशन, नागपूर
वाळिंबे, वि.स. १९६७. स्वातंत्र्यवीर सावरकर , केसरी प्रकाशन, पुणे
-------- १९८३. सावरकर , मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
शिदोरे, प्रभाकर गोविंद १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर , न.पा. साने, मुंबई
शिंदे, वि.म. १९९९. आठवणींची बकुळ फुले , नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
साटम, दौलत मुरारी १९७०. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर , साटम प्रकाशन, मुंबई
सावरकर, बाळाराव (संकलक) १९६९. वीर सावरकर आणि गांधीजी , वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७२. हिंदुसमाज संरक्षक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (रत्नागिरी पर्व), वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७५. स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु महासभापर्व भाग-१ (जून १९३७ ते डिसेंबर १९४०),
वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७६. स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड हिंदुस्थान लढा पर्व
१९९७. योगी योद्धा विदासा , वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
(जानेवारी १९४१ ते १५ ऑगस्ट १९४७) वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
सावरकर, विश्वास विनायक १९८६. आठवणी अंगाराच्या (स्वा. सावरकरांच्या आठवणी), स्नेहल प्रकाशन, पुणे
सावरकर, शां.शि. १९९२. अथांग (श्री. वि.दा. सावरकर आत्मचरित्र प्रारंभ), मुंबई
सोनपाटकी, मुकुंद १९८०. दर्यापार , पुरंदरे प्रकाशन, पुणे
सोवनी, म.वि. १९६७. मृत्युंजय सावरकरः चित्रमय चरित्र , चित्रसाधन प्रकाशन, पुणे
हर्षे, द.स. १९६६. सावरकर - दर्शन , द.स. हर्षे, सातारा
क्षीरसागर, प्रकाश १९८९. तेजोमय दाहक ते । स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर,
श्रीवास्तव, हरीन्द्र, खोत, अनुराधा (अनुवाद) १९९६. एक झंझावात - शत्रूच्या शिबिरात , सावरकर स्मृती केंद्र, बडोदे
१९५७, आत्मवृत्त , व्हिनस प्रकाशन, पुणे
१९५८, सावरकर विविध दर्शन , व्हिनस प्रकाशन, पुणे
१९६२, सावरकर यांच्या आठवणी , अधिकारी प्रकाशन, पुणे
१९६९, महायोगी वीर सावरकर , वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७३, सावरकर आत्मचरित्र । पूर्वपीठिका ।, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
१९७२, सावरकर आत्मचरित्र । भगूर, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
१९७८, स्वातंत्र्यवीर सावरकर विषयक वक्ते नि लेखक यांची सूची , स्वातंत्र्यवीर सावरकर
साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
वीर सावरकर जयंती निबंध स्पर्धेतील चार यशस्वी निबंध, अखंड हिंदुस्थान प्रकाशन, मुंबई

मुलांसाठी

आफळे, गोविंदस्वामी १९४४. वीर सावरकर , अनाथ विद्यार्थी गृह प्रकाशन, पुणे
कल्लोळ, अनंत, तेलंग वामन (अनुवाद), देशपांडे सुरेश दत्तात्रय (संपादन आणि राठी संस्करण) १९९३. स्वातंत्र्यवीर सावरकर , भारत-भारती बाल-पुस्तकमाला प्रकाशन, नागपूर
क-हाडे, शंकर २००५. गोष्टीरूप सावरकर
कानिटकर, माधव १९६५. महाराष्ट्राचे महापुरूष स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर , कॉन्टिनेन्टल बुक सर्व्हिस, पुणे
गोडबोले, अनिल १९९१. क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर , उन्मेष प्रकाशन, पुणे
गोडबोले, डॉ. अरविंद २००५. असे आहेत सावरकर , भारतीय विचार साधना प्रकाशन, पुणे
घोरपडे, रा.शं., गोंधळेकर, वि.न. १९५२. स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनप्रसंग , नेर्लेकर प्रकाशन, पुणे
ताटके, अरविंद १९९०. स्वातंत्र्यवीर सावरकर , मीनल प्रकाशन, कोल्हापूर
दिघे, प्रभाकर १९९३. स्वदेश क्रांतीचे प्रणेते स्वातंत्र्यवीर सावरकर , आरती प्रकाशन, डोंबिवली
परचुरे, ग.पां. १९४१. मुलांचे तात्याराव सावरकर , रामकृष्ण प्रकाशन मंडळ, मुंबई
भिवगडे, ज्ञानेश्वर १९९९. स्वातंत्र्यवीर सावरकर , लाखे प्रकाशन, नागपूर
महाजन, भास्कर १९९६. स्वातंत्र्यवीर सावरकर , नुतन साहित्य, नागपूर
मुधोळकर, रमेश १९८७. स्वातंत्र्यवीर सावरकर , रविराज प्रकाशन, पुणे
शिखरे, दा.न. १९५८. स्वातंत्र्यवीर सावरकर , श्री. बा. ढवळे, मुंबई
सहस्त्रबुद्धे, प्र.ग. १९८७. स्वातंत्र्यवीर सावरकर , ज्योत्स्ना प्रकाशन, मुंबई

स्मरणिका । गौरविका

आठवले, उदय, देशमुख, अनंत (संपादक) १९९२. स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन
प्रतिष्ठान, स्मरणिका, स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठान, ठाणे
खोले, विलास (संपादक), १९८४. सूर्यबिंबाचा शोध (स्वातंत्र्यवीर सावरकर गौरविका)

साहित्य समीक्षा

कुलकर्णी, व.दि. २००४. स्वातंत्र्यवीर सावरकरः एक चिंतन , पद्मगंधा प्रकाशन, पुणे
गावडे, प्रभाकर लक्ष्मण १९७०. विनायक दामोदर सावरकर एक चिकित्सक अभ्यास , स्वाध्याय महाविद्यालय, पुणे
-------- (संपादक) १९८४. सावरकरांचे साहित्य चिंतन , संजय प्रकाशन, पुणे
काव्यमीमांसा
अधिकारी, गोपाळ गोविंद १९६३. सावरकर (महाकाव्य) भाग पहिला , अधिकारी प्रकाशन, पुणे
पोहरकर, संजय १९९९. स्वातंत्र्यवीर सावरकर काव्यमीमांसा , अक्षय प्रकाशन, पुणे
बढे, राजा (रूपांतर) १९८०. योजनगन्धा , परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
मायदेव, वासुदेव गोविंद (संपादक) १९४३. सावरकर काव्य समालोचन , केशव भिकाजी ढवळे, मुंबई
रानडे, भालचंद्र लक्ष्मण (अनुवाद) १९८१. सप्तर्षी , भा.ल. रानडे
सावरकर, बाळाराव (संपादक) १९७१. गोमांतक , वीर सावरकर प्रकाशन, मुंबई

नाट्यसमीक्षा

परचुरे श्री. दि. १९८३. नाटककार सावरकर , वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
वैचारिक साहित्य समीक्षा
केळकर, भा.कृ. १९८३. समाजसुधारक सावरकर , अस्मिता प्रकाशन
केळकर, गणेश ल.(संपादक) १९९३. महामेरू, वसंत बुक स्टॉल, मुंबई
गोडबोले, अरविंद सदाशिव १९८३. सावरकर विचारदर्शन , पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
२००८, भारतीय विचार साधना प्रकाशन , पुणे
जोगळेकर, ज.द. २००२. ज्ञानयुक्त क्रांतीयोद्धा , मनोरमा प्रकाशन, मुंबई
देशपांडे, सुधाकर १९८८. सावरकरांचे आठवावे विचार (अर्थात) सावरकरवाद , श्रीअष्टविनायक जोशी, नांदेड
फडके, य.दि. (संपादक) १९८६. तत्त्वज्ञ सावरकर निवडक विचार , कॉन्टिनेन्टल
प्रकाशन, मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ, पुणे.
मोरे, शेषराव १९९२. सावरकरांचे समाजकारणः सत्य आणि विपर्यास , राजहंस प्रकाशन, पुणे
२००३. सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद , राजहंस प्रकाशन, पुणे
२००३. सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग , राजहंस प्रकाशन, पुणे
हर्षे, द.स. १९९५. सावरकरांच्यावरील काही आक्षेप आणि त्या आक्षेपांची चिकित्सा , सुधा. द. हर्षे, क-हाड
२००६, सावरकर एक अभिनव दर्शन , अभिनव निर्माण प्रतिष्ठान, पुणे
१९७३, सावरकरांचे सामाजिक विचार (प्रस्तावना - विद्याधर पुंडलीक), मॅजेस्टीक प्रकाशन, मुंबई

राजकारण

देशपांडे, स.ह. १९९२. सावरकर ते भा.ज.प.हिंदुत्व विचाराचा चिकित्सक आलेख , राजहंस प्रकाशन, पुणे
शमसुल, इस्लाम २००५. सावरकरः भ्रम आणि वास्तव , सुगावा प्रकाशन, पुणे
चरित्रात्मक कादंबरी
खेर, भा.द.,राजे, शैलजा १९६८. यज्ञ . जयराज प्रकाशन, पुणे
भट, रवीन्द्र १९७३. सागरा प्राण तळमळला , संजय प्रकाशन, पुणे






१८:३९, १५ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

विनायक दामोदर सावरकर
चित्र:Vinayak damodar savarkar.jpg
जन्म: मे २८, इ.स. १८८३
भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: फेब्रुवारी २६, इ.स. १९६६
भारत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अभिनव भारत
अखिल भारतीय हिंदू महासभा
धर्म: हिंदू
वडील: दामोदर सावरकर
आई: राधा सावरकर
पत्नी: यमुनाबाई विनायक सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (२८ मे, इ.स. १८८३:भगूर - २६ फेब्रुवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटकहिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धीलिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.

त्यांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, शिक्षक, चित्रपट दिग्दर्शक/निर्माते प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली.

चरित्र


सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील इ.स. १८९९च्या प्लेगला बळी पडले.

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.

मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.

राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरानी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५ साली विदेशी कापडाची होळी केली . श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.

इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले.

राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली(इ.स. १९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११).मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.

अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली.

अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.

सावरकरांचे जात्युच्छेदन


अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६[१]) . हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्‍नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य (१९३०नोव्हें )[२] जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली.आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. [३]स्वकीयातील जातीयतेवरपण निर्भीड टिका केली.

त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले. [४]

जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले. [५][६]

एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन

सावरकरांनी चालवलेल्या जात्युच्छेदन चलवळीने अस्वस्थ झालेल्या ब्राह्मणांनी लोणी येथे झालेल्या सनातनी परिषदेत सावरकरांना 'धर्मद्रोही' ठरवून 'त्यांना पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले गेले असते' असा ठराव मांडला.[७] [८] त्यावर ३००० ब्राह्मणांनी सह्या केल्या.[९] [१०]सावरकरांनी त्यावर 'शिवशाहीत अथवा, पहिल्या बाजीरावाच्या पेशवाईत आमच्यासारख्या हिंदू संघटकांना हत्तीच्या पाठीवरील अंबारीत मिरवले जाण्याचाच संभव अधिक होता' असे सडेतोड उत्तर दिले.मायबोली २००८च्या हितगुज दिवाळी अंकात डॉ. चिन्मय यांच्या मांडणीप्रमाणे, 'भटशाही' संपवण्यासाठी पूजा, पाठ, गौरी, गणपती, सोयरसुतक, संक्रांत, दिवाळी, दसरा, द्वादशी या धार्मिक कार्यक्रमांना भटांना बोलावणे बंद करून 'भटशाही' संपवावी असे मत मांडले. "त्यासोबतच काशीतील ब्राह्मण महासंमेलनाची तुलना त्यांनी माकडांशी केली. त्यात 'काशीत दोन महासंमेलने भरली - एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन. माकडे परिवर्तनीय तरी आहेत. पण सनातनी तर काळ, वेळ, परिस्थिती या गोष्टीच बघत नाहीत. अशा वागण्यामुळे निदान काशीच्या भाकड महासंमेलनातील पंडित हे तरी माकडांची विकसित श्रेणी नसून तेथील माकडेच त्या पंडितांची विकसित श्रेणी आहे हे म्हणणे क्रमप्राप्त आहे' असे लिहित त्यांची वीकेट घेतली. [११]

सात बेड्या

सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जातिव्यवस्थेवर हल्ला केला. अनुवंशात जातीचे मूळ आहे. त्या मुळावरच सावरकरांनी हल्ला चढवत अनुवंश हा आचरटपणा आहे, जर ब्राह्मणाच्या घरी 'ढ'जन्मला तर त्याला 'ढ'च म्हटले पाहिजे आणि जर शुद्रात 'ज्ञ' निघाला तर त्याला 'ज्ञ'च म्हटले पाहिजे, मग त्याचा बाप, आजा अथवा पणजा 'ढ' असो की 'ज्ञ' असो. सावरकरांनी हल्ला करताना 'आपले हिंदुत्वाचे समर्थक दुखावतील' वगैरे फाजील भीती न बाळगता त्यांचे प्रबोधन केले. सावरकर म्हणतात की 'आज आमच्या हिंदू समाजात पोथीत तसे लिहिले आहे ह्या सोडून इतर कोणत्याही लक्षणाने सहज विभिन्नत्व विविध जातींमध्ये दिसून येत नाही. जात मानणे ही मूळ चूक! त्यात महादेवाच्या जटेपासून ही जात निघाली आणि ब्रह्मदेवाच्या बेंबीपासून अमुक जात निघाली इत्यादी उपरत्या अक्षरशः खऱ्या मानून त्या त्या जातींच्या अंगी ते ते गुण उपजतच आहेत हे मानणे ही घोडचूक!! अन् तो गुण त्या जातीच्या संतानात प्रकट झाला नसला तरी तो आहेच समजून तशी उच्च-नीचता त्या संतानास भोगावयास लावणे ही पहाड चूक. [१२]

जातिव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातीभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे १)वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुध्दा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.-सावरकर}२) व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४) सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी ७) बेटीबंदी. आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे.सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.[१३][१४]

वाद आणि टिका

कासाबाई

यमुना बाईंच्या आधी त्यांची पत्नी होती “कासाबाई”. (सावरकरांच्या मनाविरुद्ध त्यांच्या आत्याने हे लग्न लावून दिले होते. इकडे कासाबाई अक्षरशः लंकेच्या पार्वती झाल्या होत्या. सावरकरांचा मित्र शंकरलाल कनोजिया (याचा मुंबई मध्ये कपड्याचा छोटेखानी व्यवसाय होता.)तर शंकरलाल सुद्धा सावरकरांच्या घराचा भार आपल्या परीने सांभाळत असत.

ज्युडी केटची ही बातमी जेव्हा कासाबाई यांना कळली तेव्हा त्यांना अतिशय दुःख झाले. त्यांनी सावरकरांना सोडण्याचा निर्णय घेतला व त्यांनी तसं शंकरलाल कनोजिया यांना ही सांगितले. आणि अखेर सावरकर लंडनच्या जेल मध्ये असतांना जे नको व्हावयास हवे तेच झाले. कासाबाई व शंकरलाल यांचे मैत्रीचे संबंध प्रेमात रुपांतरीत झाले. सावरकरांनी त्यांना पत्नी समान वागणूक कधी दिलीच नसावी बहुतेक. मानसिक सुखाच्या शोधत असणाऱ्या कासाबाईंना शंकरलालने सावरले व तिला मुंबई इथल्या आपल्या घरी घेऊन आले. (कैरेल स्तोडोला यांच्या पुस्तकानुसार तिथल्या ब्राम्हण समाजाने त्यांना लाथाडल्यानंतर १ वर्षांनी ते सुरतला निघून गेले).

ही गोष्ट जेव्हा सावरकरांना समजली तेव्हा त्यांना अतिशय दुःख झाले, आपली पत्नी परपुरुषा सोबत पळून गेली ही गोष्ट लोकांपर्यंत पोचू देऊ नये अशी विनंती त्यांनी आपल्या नातेवाईकांना केली. त्यांचे भारतातले सहकारी मित्र माधव गोडबोले व त्यांच्या पत्नी कस्तुरीबाई यांचे पत्र आजही लंडन येथील संग्रहालयात आहे.(१९९३ साली भारतात सावरकरांच्या पात्रांचे एक पुस्तक इंग्रजी भाषेत प्रसिद्ध होणार होते मात्र ते प्रसिद्ध होण्या पूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडले. आणि जे प्रसिद्ध झाले ते 'त्या' सर्व पात्रांच्या व्यतिरिक्त होते.)

लंडनहून परतल्यावर त्यांनी दुसरा विवाह केला तो यमुना बाई अर्थात माई यांच्याशी. आपल्या मृत्यू पश्चात त्यांनी एकाही मुलाला आपल्या संपत्तीतला एक पैही दिला नाही (सावरकरांनी आपली संपत्ती गोर-गरिबांना वाटली असा प्रचार (अप-प्रचार) केला गेला.)सावरकर आणि त्यांच्या पत्नी यमुनाबाई यांच्या बद्दल तर आपण सर्वांनाच माहित असेल.. सावरकरांनी यमुनाबाई अर्थात माई यांच्याशी विवाह केला तो केवळ पैशा खातर. आणि ही बाब स्वतः यमुना बाईंनाही माहित होती. कारण यमुना बाईंचे वडील भाऊराव चिपळूणकर हे त्यांच्या मानाने श्रीमंत होते, आणि भाऊराव हे सावरकरांच्या घरचा सर्व भार उचलत असत.

मात्र यमुनाबाई सावरकरांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. पहिल्या लग्नाची ही गोष्ट इतिहासाच्या अंधारात मुद्दामून झाकून ठेवण्यात आली.. [१५]

हिंदू महासभेचे कार्य

रत्‍नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. इ.स. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.

एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन कॉंग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.

सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला.१ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न ,पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.

सावरकर साहित्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबऱ्यांचा लेखक,ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत.

सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका. सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळकोठडीत आणि रत्‍नागिरीत रचल्या. कोठडीच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी. शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. सुस्पष्ट विचार, तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधांची बलस्थाने आहेत.

सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला. सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, कीलक राष्ट, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्तीवेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत.

वि.दा. सावरकर हे मुंबई येथे १९३८ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

पुरस्कार

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात. उदा०

  • ’निनाद’तर्फे दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर ध्येयवादी पुरस्कार
  • दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे *स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार, विज्ञान पुरस्कार, समाजसेवा पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार
  • वीर सावरकर फाउंडेशनचा वीर सावरकर पुरस्कार
  • टिळकनगर (डोंबिवली) शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावरकर अभ्यास मंडळाचे वीर सावरकर सेवा पुरस्कार

ग्रंथ आणि पुस्तके

वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्याच कमला या काव्यसंग्रहातील खालील ओळी त्यांचा कडवा राष्ट्रवाद दर्शवितात -

अनेक फुले फुलती फुलोनिया सुकून जाती
त्याची महती गणती कोणी ठेवली असेल का?
परी गजेंद्र शुंडे उपटीले, श्रीहरिसाठी नेले,
फूल ते अमर ठेले मोक्षदाते पावन.
अमर ती वंशवेला निर्वंश जिचा देशाकरिता,
दिगंती पसरेल सुगंधिता, लोकहीत परिमलाची.

इतिहास

कथा

कादंबरी

आत्मचरित्रपर

हिंदुत्ववाद

लेखसंग्रह

नाटके

कविता

महाकाव्ये

स्फुट काव्य

स्वातंत्रवीर सावरकरांवर लिहिलेली पुस्तके आणि त्याचे प्रकाशक

चरित्रग्रंथ
  • अत्रे, प्रभाकर १९८५. वसा वादळाचा स्नेहल प्रकाशन, पुणे
  • अधिकारी, गोपाळ गोविंद १९३७. बॅ. सावरकर यांचे चरित्र. महाराष्ट्र प्रकाशन संस्था, मुंबई
  • आचार्य अत्रे, मालशे, स.गं.(संपादक) १९८३. क्रांतिकारकांचे कुलपुरूष सावरकर, परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
  • आठवले, रा.म. १९३८. बॅ. विनायक दामोदर सावरकर
  • आफळे, गोविंदस्वामी (लेखक व प्रकाशक) १९६७. सावरकर गाथा
  • उपाध्ये, संजय २००२. विनायक विजय . चंद्रकला प्रकाशन, पुणे
  • अंदूरकर, व्यं.गो. १९७०. शत्रूच्या गोटात सावरकर । सुरस ग्रंथमाला, सोलापूर
  • करंदीकर, शि.ल. १९६६. असे होते वीर सावरकर । सीताबाई करंदीकर, पुणे
  • करंदीकर, सीताबाई १९४३. सावरकर-चरित्र (कथन), सीताबाई करंदीकर, पुणे

--?--१९४७. सावरकरांचे सहकारी, गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई

  • कऱ्हाडे, शंकर १९८३. गोष्टीरूप सावरकर , विजय प्रकाशन, नागपूर
  • किर्लोस्कर, मुकुंदराव (संपादक) १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी जीवनावरील अलौकिक विशेषांक , सावरकर दर्शन प्रतिष्ठान, पुणे
  • कीर, धनंजय १९५०. सावरकर ॲन्ड हिज टाइम्स
  • खांबेटे, द.पां.(अनुवाद), १९७२. स्वातंत्र्यवीर सावरकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
  • कुळकर्णी, श्यामकांत २०००. गाथा थोर क्रांतीभास्कराची, विजय प्रकाशन, नागपूर
  • केळकर, भा.कृ. १९५२. सावरकर-दर्शन व्यक्ति नि विचार, गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
  • खाडिलकर, नीळकंठ १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि प्रॅक्टिकल सोशॅलिझम, दैनिक नवाकाळ प्रकाशन, मुंबई
  • गद्रे, अनुराधा अ. २००५. स्वातंत्र्यवीर सावरकर, मनोरमा प्रकाशन, मुंबई
  • गोखले, द.न. १९८९. स्वातंत्र्यवीर सावरकर: एक रहस्य, मौज प्रकाशन गृह, मुंबई
  • गोखले, मो.शी. १९४०. वीर सावरकर
  • गोखले, विद्याधर २००५. झंझावात , मनोरमा प्रकाशन, मुंबई

गोखले, श्री.पु. १९६९. अशी गर्जली वीरवाणी , लोकमान्य प्रकाशन, पुणे --?--१९८३. सावरकरांशी सुखसंवाद , मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई

  • गोडसे, गोपाळ १९६९. जय मृत्युंजय (स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील कविता), केसरी प्रकाशन, पुणे
  • गोडबोले, अ.मा. १९९७. क्रांतदर्शी सावरकर , साहित्यसेवा प्रकाशन, औरंगाबाद
  • गोविंदमित्र १९५७. स्वातंत्र्यवीर श्री. विनायक दामोदर सावरकर यांचे काव्यमय चरित्र, गं.वि.परचुरे, कल्याण
  • घाणेकर, ऋचा २००३. स्वातंत्र्यवीर सावरकर, महाजन ब्रदर्स, पुणे
  • जोगळेकर, ज.द. १९८३. स्वातंत्र्यवीर सावरकर वादळी जीवन , उत्कर्ष प्रकाशन, पुणे
  • जोगळेकर, ज.द. १९८३. पुनरुत्थान, पंडित बखले, मुंबई
  • जोशी, विष्णू श्रीधर १९८५. क्रांतीकल्लोळ, मनोरमा प्रकाशन, मुंबई
  • --?--१९९२. अखेर उजाडलं, पण देश रक्तबंबाळ । मनोरमा प्रकाशन, मुंबई
  • --?--१९९२, झुंजः सावरकरांची । मनोरमा प्रकाशन, मुंबई
  • ताटके, अरविंद १९७३. युगप्रवर्तक सावरकर । स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
  • दुगल, न.दि. १९८३. देशप्रेमा... तुझे नाव सावरकर । अजब पुस्तकालय, कोल्हापूर
  • देशपांडे, बालशंकर १९५८. क्रांतिकारकांचे मुकुटमणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
  • देशपांडे, भास्कर गंगाधर १९७४. क्रांतिसूर्य सावरकर, अजय प्रकाशन, औरंगाबाद
  • देसाई, हरिश्चंद्र त्र्यंबक १९८३. शतपैलू सावरकर । प्रबोधन, मुंबई
  • नातू, र.वि. १९९७. समग्र सावरकर खंड १० , पृष्ठे ६००० ची संदर्भसूची, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
  • पेठे, मंगला कृ. १९८४. सावरकर गौरव गान
  • फडके, य.दि. १९८४. शोध सावरकरांचा , श्रीविद्या प्रकाशन, पुणे
  • बखले पंडित (संपादक) १९६०. मृत्युंजय सावरकर
  • बर्वे, शंकर नारायण १९४७. स्वातंत्र्यवीर (बॅ.सावरकर यांच्या चरित्रातील काही पद्यमय प्रसंग), विष्णू सि. चितळे, पुणे
  • बोडस, आनंद ज. २००७. सावरकरांची तिसरी जन्मठेप , मनोरमा प्रकाशन, मुंबई
  • भट, रा.स. १९७२. सावरकरांचे जीवनदर्शन , वोरा अँड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि., मुंबई
  • भागवत, अ.गो. (अनुवाद) १९४७. बॅरिस्टर सावरकर चरित्र अ.गो. भागवत, बडोदा
  • भालेराव, सुधाकर सोवनी १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंथन , प्रमोद प्रकाशन, नागपूर
  • भावे, पु.भा. १९८२. सावरकर नावाची ज्योत , सन पब्लिकेशन्स, पुणे
  • भिडे, ग.र. १९४२. सावरकरांची सूत्रे , कोल्हापूर
  • भिडे, गोविंद १९७३. सागरा प्राण तळमळलाः स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्दरूप

जीवनदर्शन , जोशी ब्रदर्स बुकसेलर्स अँड पब्लिशर्स, पुणे भोपे, रघुनाथ गणेश १९३८. स्वातंत्र्यवीर बॅ.विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनचरित्र , भोपे, र.ग., अहमदनगर मेहरूणकर, प्रभाकर १९९३. तेजोनिधी सावरकर , मोरया प्रकाशन, डोंबिवली रायकर, गजानन १९६६. महापुरूष स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र रानडे, सदाशिव राजाराम १९२४. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर ह्यांचे संक्षिप्त चरित्र , लोकमान्य छापखाना, मुंबई वर्तक, श्रीधर रघुनाथ १९७०. क्रांतदर्शी सावरकर , संग्राहक काळ, प्रकाशन, पुणे व-हाडपांडे, व.कृ. (संपादक), १९८३. गरूडझेप (सावरकर गौरवग्रंथ) , विजय प्रकाशन, नागपूर वाळिंबे, वि.स. १९६७. स्वातंत्र्यवीर सावरकर , केसरी प्रकाशन, पुणे


१९८३. सावरकर , मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई

शिदोरे, प्रभाकर गोविंद १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर , न.पा. साने, मुंबई शिंदे, वि.म. १९९९. आठवणींची बकुळ फुले , नवचैतन्य प्रकाशन, मुंबई साटम, दौलत मुरारी १९७०. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर , साटम प्रकाशन, मुंबई सावरकर, बाळाराव (संकलक) १९६९. वीर सावरकर आणि गांधीजी , वीर सावरकर प्रकाशन, मुंबई १९७२. हिंदुसमाज संरक्षक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (रत्नागिरी पर्व), वीर सावरकर प्रकाशन, मुंबई १९७५. स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु महासभापर्व भाग-१ (जून १९३७ ते डिसेंबर १९४०), वीर सावरकर प्रकाशन, मुंबई १९७६. स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड हिंदुस्थान लढा पर्व १९९७. योगी योद्धा विदासा , वीर सावरकर प्रकाशन, मुंबई (जानेवारी १९४१ ते १५ ऑगस्ट १९४७) वीर सावरकर प्रकाशन, मुंबई सावरकर, विश्वास विनायक १९८६. आठवणी अंगाराच्या (स्वा. सावरकरांच्या आठवणी), स्नेहल प्रकाशन, पुणे सावरकर, शां.शि. १९९२. अथांग (श्री. वि.दा. सावरकर आत्मचरित्र प्रारंभ), मुंबई सोनपाटकी, मुकुंद १९८०. दर्यापार , पुरंदरे प्रकाशन, पुणे सोवनी, म.वि. १९६७. मृत्युंजय सावरकरः चित्रमय चरित्र , चित्रसाधन प्रकाशन, पुणे हर्षे, द.स. १९६६. सावरकर - दर्शन , द.स. हर्षे, सातारा क्षीरसागर, प्रकाश १९८९. तेजोमय दाहक ते । स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर, श्रीवास्तव, हरीन्द्र, खोत, अनुराधा (अनुवाद) १९९६. एक झंझावात - शत्रूच्या शिबिरात , सावरकर स्मृती केंद्र, बडोदे १९५७, आत्मवृत्त , व्हिनस प्रकाशन, पुणे १९५८, सावरकर विविध दर्शन , व्हिनस प्रकाशन, पुणे १९६२, सावरकर यांच्या आठवणी , अधिकारी प्रकाशन, पुणे १९६९, महायोगी वीर सावरकर , वीर सावरकर प्रकाशन, मुंबई १९७३, सावरकर आत्मचरित्र । पूर्वपीठिका ।, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई १९७२, सावरकर आत्मचरित्र । भगूर, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई १९७८, स्वातंत्र्यवीर सावरकर विषयक वक्ते नि लेखक यांची सूची , स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई वीर सावरकर जयंती निबंध स्पर्धेतील चार यशस्वी निबंध, अखंड हिंदुस्थान प्रकाशन, मुंबई

मुलांसाठी

आफळे, गोविंदस्वामी १९४४. वीर सावरकर , अनाथ विद्यार्थी गृह प्रकाशन, पुणे कल्लोळ, अनंत, तेलंग वामन (अनुवाद), देशपांडे सुरेश दत्तात्रय (संपादन आणि राठी संस्करण) १९९३. स्वातंत्र्यवीर सावरकर , भारत-भारती बाल-पुस्तकमाला प्रकाशन, नागपूर क-हाडे, शंकर २००५. गोष्टीरूप सावरकर कानिटकर, माधव १९६५. महाराष्ट्राचे महापुरूष स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर , कॉन्टिनेन्टल बुक सर्व्हिस, पुणे गोडबोले, अनिल १९९१. क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर , उन्मेष प्रकाशन, पुणे गोडबोले, डॉ. अरविंद २००५. असे आहेत सावरकर , भारतीय विचार साधना प्रकाशन, पुणे घोरपडे, रा.शं., गोंधळेकर, वि.न. १९५२. स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनप्रसंग , नेर्लेकर प्रकाशन, पुणे ताटके, अरविंद १९९०. स्वातंत्र्यवीर सावरकर , मीनल प्रकाशन, कोल्हापूर दिघे, प्रभाकर १९९३. स्वदेश क्रांतीचे प्रणेते स्वातंत्र्यवीर सावरकर , आरती प्रकाशन, डोंबिवली परचुरे, ग.पां. १९४१. मुलांचे तात्याराव सावरकर , रामकृष्ण प्रकाशन मंडळ, मुंबई भिवगडे, ज्ञानेश्वर १९९९. स्वातंत्र्यवीर सावरकर , लाखे प्रकाशन, नागपूर महाजन, भास्कर १९९६. स्वातंत्र्यवीर सावरकर , नुतन साहित्य, नागपूर मुधोळकर, रमेश १९८७. स्वातंत्र्यवीर सावरकर , रविराज प्रकाशन, पुणे शिखरे, दा.न. १९५८. स्वातंत्र्यवीर सावरकर , श्री. बा. ढवळे, मुंबई सहस्त्रबुद्धे, प्र.ग. १९८७. स्वातंत्र्यवीर सावरकर , ज्योत्स्ना प्रकाशन, मुंबई

स्मरणिका । गौरविका

आठवले, उदय, देशमुख, अनंत (संपादक) १९९२. स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठान, स्मरणिका, स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठान, ठाणे खोले, विलास (संपादक), १९८४. सूर्यबिंबाचा शोध (स्वातंत्र्यवीर सावरकर गौरविका)

साहित्य समीक्षा

कुलकर्णी, व.दि. २००४. स्वातंत्र्यवीर सावरकरः एक चिंतन , पद्मगंधा प्रकाशन, पुणे गावडे, प्रभाकर लक्ष्मण १९७०. विनायक दामोदर सावरकर एक चिकित्सक अभ्यास , स्वाध्याय महाविद्यालय, पुणे


(संपादक) १९८४. सावरकरांचे साहित्य चिंतन , संजय प्रकाशन, पुणे

काव्यमीमांसा अधिकारी, गोपाळ गोविंद १९६३. सावरकर (महाकाव्य) भाग पहिला , अधिकारी प्रकाशन, पुणे पोहरकर, संजय १९९९. स्वातंत्र्यवीर सावरकर काव्यमीमांसा , अक्षय प्रकाशन, पुणे बढे, राजा (रूपांतर) १९८०. योजनगन्धा , परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई मायदेव, वासुदेव गोविंद (संपादक) १९४३. सावरकर काव्य समालोचन , केशव भिकाजी ढवळे, मुंबई रानडे, भालचंद्र लक्ष्मण (अनुवाद) १९८१. सप्तर्षी , भा.ल. रानडे सावरकर, बाळाराव (संपादक) १९७१. गोमांतक , वीर सावरकर प्रकाशन, मुंबई

नाट्यसमीक्षा

परचुरे श्री. दि. १९८३. नाटककार सावरकर , वीर सावरकर प्रकाशन, मुंबई वैचारिक साहित्य समीक्षा केळकर, भा.कृ. १९८३. समाजसुधारक सावरकर , अस्मिता प्रकाशन केळकर, गणेश ल.(संपादक) १९९३. महामेरू, वसंत बुक स्टॉल, मुंबई गोडबोले, अरविंद सदाशिव १९८३. सावरकर विचारदर्शन , पॉप्युलर प्रकाशन, मुंबई २००८, भारतीय विचार साधना प्रकाशन , पुणे जोगळेकर, ज.द. २००२. ज्ञानयुक्त क्रांतीयोद्धा , मनोरमा प्रकाशन, मुंबई देशपांडे, सुधाकर १९८८. सावरकरांचे आठवावे विचार (अर्थात) सावरकरवाद , श्रीअष्टविनायक जोशी, नांदेड फडके, य.दि. (संपादक) १९८६. तत्त्वज्ञ सावरकर निवडक विचार , कॉन्टिनेन्टल प्रकाशन, मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ, पुणे. मोरे, शेषराव १९९२. सावरकरांचे समाजकारणः सत्य आणि विपर्यास , राजहंस प्रकाशन, पुणे २००३. सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद , राजहंस प्रकाशन, पुणे २००३. सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग , राजहंस प्रकाशन, पुणे हर्षे, द.स. १९९५. सावरकरांच्यावरील काही आक्षेप आणि त्या आक्षेपांची चिकित्सा , सुधा. द. हर्षे, क-हाड २००६, सावरकर एक अभिनव दर्शन , अभिनव निर्माण प्रतिष्ठान, पुणे १९७३, सावरकरांचे सामाजिक विचार (प्रस्तावना - विद्याधर पुंडलीक), मॅजेस्टीक प्रकाशन, मुंबई

राजकारण

देशपांडे, स.ह. १९९२. सावरकर ते भा.ज.प.हिंदुत्व विचाराचा चिकित्सक आलेख , राजहंस प्रकाशन, पुणे शमसुल, इस्लाम २००५. सावरकरः भ्रम आणि वास्तव , सुगावा प्रकाशन, पुणे चरित्रात्मक कादंबरी खेर, भा.द.,राजे, शैलजा १९६८. यज्ञ . जयराज प्रकाशन, पुणे भट, रवीन्द्र १९७३. सागरा प्राण तळमळला , संजय प्रकाशन, पुणे


चित्र:Savarkar.jpg
वीर सावरकर

अधिक वाचन

हेही पहा

संदर्भ

  1. ^ http://www.savarkarsmarak.com/chronology_m.php
  2. ^ http://www.savarkar.org/mr/समाजसुधारणा/जात्युच्छेदक-निबंध + http://www.savarkarsmarak.com/chronology_m.php
  3. ^ http://www.savarkar.org/mr/समाजसुधारणा/जात्युच्छेदक-निबंध वेबसाईट दिनांक २६ जुलै २०१२ १४-३५ वाजता पाहिले
  4. ^ http://vishesh.maayboli.com/node/55 मायबोली हित्गुज दिवाळी अंक २००८ जात्युच्छेदन आणि हिंदुत्व: सावरकर, संघ आणि शिवसेना. -लेखक chinya1985( डॉ.चिन्मय कुलकर्णी) हे वेबसाईट २६ जुलै २०१२ रोजी जसे पाहिले
  5. ^ http://vishesh.maayboli.com/node/55 मायबोली हित्गुज दिवाळी अंक २००८ जात्युच्छेदन आणि हिंदुत्व: सावरकर, संघ आणि शिवसेना. -लेखक chinya1985( डॉ.चिन्मय कुलकर्णी) हे वेबसाईट २६ जुलै २०१२ रोजी जसे पाहिले
  6. ^ http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-freedam-fighter-sawarkar-social-change-program-3330764.html
  7. ^ महाराष्ट्रीय मानसिकता आणि सुवर्णमहोत्सव-दत्तप्रसाद दाभोलकर ,शुक्रवार, २१ मे २०१० दैनिक लोकसत्तातील लेख दिनांक २८/७/२०१२ रोजी जसा पाहिला
  8. ^ http://vishesh.maayboli.com/node/55 मायबोली हितगुज दिवाळी अंक २००८ जात्युच्छेदन आणि हिंदुत्व: सावरकर, संघ आणि शिवसेना. -लेखक chinya1985 ( डॉ.चिन्मय कुलकर्णी) हे वेबसाईट २६ जुलै २०१२ रोजी जसे पाहिले
  9. ^ http://vishesh.maayboli.com/node/55 मायबोली हितगुज दिवाळी अंक २००८ जात्युच्छेदन आणि हिंदुत्व: सावरकर, संघ आणि शिवसेना. -लेखक chinya1985 ( डॉ.चिन्मय कुलकर्णी) हे वेबसाईट २६ जुलै २०१२ रोजी जसे पाहिले
  10. ^ http://raigad.wordpress.com/स्वातंत्र्यवीर-सावरकर-का/जर-आज-पेशवाई-असती-तर/ “सावरकर एक अभिनव दर्शन” या पुस्तकातील लेखावरून घेतल्याचा उल्लेख वेबसाईट २९/७/२०१२ला जसे पाहिले
  11. ^ http://vishesh.maayboli.com/node/55 मायबोली हितगुज दिवाळी अंक २००८ जात्युच्छेदन आणि हिंदुत्व: सावरकर, संघ आणि शिवसेना. -लेखक chinya1985 ( डॉ.चिन्मय कुलकर्णी) हे वेबसाईट २६ जुलै २०१२ रोजी जसे पाहिले
  12. ^ http://vishesh.maayboli.com/node/55 मायबोली हितगुज दिवाळी अंक २००८ जात्युच्छेदन आणि हिंदुत्व: सावरकर, संघ आणि शिवसेना. -लेखक chinya1985 हे वेबसाईट २६ जुलै २०१२ रोजी जसे पाहिले
  13. ^ http://vishesh.maayboli.com/node/55 मायबोली हितगुज दिवाळी अंक २००८ जात्युच्छेदन आणि हिंदुत्व: सावरकर, संघ आणि शिवसेना. -लेखक chinya1985 हे वेबसाईट २६ जुलै २०१२ रोजी जसे पाहिले
  14. ^ [http://www.savarkarsmarak.com/activityimages/Jatyucchedak%20Nibandha%20-II.pdf जात्युच्छेदक निबंध भाग दोन सावरकरस्मारक डॉट कॉम वेबसाईट स२९/०७/२०१२ रात्री दहा वाजता पाहिल्या प्रमाणे
  15. ^ माधव गोडबोले व त्यांच्या पत्नी कस्तुरीबाई यांचे लंडन येथील संग्रहालयातील पत्र

बाह्य दुवे