हिंदुपदपादशाही
Jump to navigation
Jump to search
हिंदुपदपादशाही हा भारतीय क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्लिश भाषेत लिहिलेला एक ऐतिहासिक ग्रंथ आहे.
ब्रिटिश व त्यांचे अनुयायी असलेले इतर भारतीय इतिहासकार करीत असलेल्या मराठी इतिहासाचे विकृतीकरण थांबवून, शिवाजी महाराज व त्यांचे वंशज यांनी स्थापन करून वाढवलेल्या व उत्कर्षाप्रत नेलेल्या हिंदुपदपादशाहीचा खरा इतिहास व मराठ्यांच्या ऐतिहासिक कामगिरीची माहिती भारतातीलच नव्हे, तर जगभरातील सर्व लोकांना व्हावी यासाठी त्यांनी तो प्रथम इंग्रजी भाषेत लिहिला.
मराठे लुटारू नव्हते, तर ते इस्लामी आक्रमणापासून हिंदूंना मुक्त करण्यासाठी लढले, असे यात प्रतिपादले आहे[ संदर्भ हवा ].
बाह्य दुवे[संपादन]
- "हिंदूपदपादशाही खंड १" (मराठी मजकूर). १४ नोव्हेंबर २०११ रोजी पाहिले.
- "हिंदूपदपादशाही खंड २" (मराठी मजकूर). १४ नोव्हेंबर २०११ रोजी पाहिले.
- "हिंदूपदपादशाही" (इंग्लिश मजकूर). १४ नोव्हेंबर २०११ रोजी पाहिले.