Jump to content

अभिनव भारत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अभिनव भारत ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे स्थापन केलेली भारतातली पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी नोव्हेंबर १८९९ मध्ये नाशिक येथे म्हसकर व पागे या दोघांना घेऊन राष्ट्रभक्त समूहाची स्थापना केली. पुढे काहीच दिवसांनी १ जानेवारी १९०० या दिवशी 'मित्रमेळा' ही त्या समूहाची प्रकट शाखा स्थापन करण्यात आली.

१९०४ मध्ये या संघटनेचे 'अभिनव भारत' असे नामकरण झाले. या संघटनेची व्याप्ती युरोपपर्यंत होती. या संघटनेत महाराष्ट्रातील शेकडो तरुण होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव तथा गणेश दामोदर सावरकर, कनिष्ठ बंधू नारायण दामोदर सावरकर, स्वातंत्र्यकवी गोविंद, अनंत कान्हेरे, मदनलाल धिंग्रा अश्याअनेक सुप्रसिद्ध व्यक्ती होत्या.

या संघटनेच्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध आणि मदनलाल धिंग्रा यांनी लंडनमध्ये कर्झन वायलीचा वध केला. अभिनव भारतने त्याकाळी हजारो तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटविली.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९५२ मध्ये पुणे येथे भव्य समारंभ करून अभिनव भारत ही संस्था विसर्जित केली.

संदर्भ

[संपादन]