श्यामजी कृष्ण वर्मा
श्यामजी कृष्ण वर्मा (जन्म : कच्छ-मांडवी, ४ ऑक्टोबर १८५७; - ३० मार्च १९३०) हे एक भारतीय क्रांतिकारक, लढाऊ देशभक्त, वकील आणि पत्रकार होते. त्यांनी इंडियन होम रूल सोसायटी, इंडिया हाऊस आणि लंडनमधील भारतीय समाजशास्त्र संस्था यांची स्थापना केली. बॉलियॉल महाविद्यालयाचे पदवीधर असलेले कृष्णा वर्मा संस्कृत आणि इतर भारतीय भाषांचे एक प्रख्यात विद्वान होते.[१]
सुरुवातीचे जीवन
[संपादन]श्यामजी कृष्ण वर्मा ४ ऑक्टोबर १८५७ रोजी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मांडवी येथे जन्मले. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णदास भानुशाली आणि आईचे गोमतीबाई. वडील एका काॅटन प्रेस कंपनीत काम करीत.[२]त्यांचे निधन झाले तेव्हा श्यामजी फक्त ११ वर्षांचे होते. त्यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला. कच्छ जिल्ह्यातील अबडासा तालुक्यात त्यांचे गाव होते. त्यांनी कामाच्या शोधात आणि पारिवारिक वादांमुळे मांडवी येथे बिऱ्हाड केले होते. भुजमधील विल्सन हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण झाल्यावर श्यामजी पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेले. मुंबईत असताना ते संस्कृत शिकले.[३]
श्यामजी कृष्ण यांनी भारतात वकिली सुरू केली आणि भारतातील अनेक संस्थानी राज्यांचे दिवाण म्हणून काम पाहिले.
तथापि त्यांचे काही संस्थानिकांशी मतभेद झाले आणि जुनागडमधील स्थानिक ब्रिटिश अधिकाऱ्याने कट करून त्यांना वगळले. त्यामुळे त्यांनी इंग्लंडला परतण्याचा निर्णय घेतला.
दयानंद सरस्वतीच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा दृष्टिकोन असूनही कृष्णा वर्मा अनेक भारतीय क्रांतिकारकांचे प्रेरणास्रोत होते.[४] ज्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात बॅरिस्टरी शिकवायला मिळाले असे ते पहिले भारतीय होते. त्यांनी पुणे येथे दिलेल्या संस्कृत भाषेचे भाषणामुळे प्रभावित होऊन संस्कृत-इंग्रजी शब्दकोश लिहिणारे मोनियर विल्यम्स यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांना संस्कृतचे साहाय्यक प्रोफेसर बनवले. काशीच्या विद्वानांनी त्यांना पंडित ही पदवी दिली. १९०५ मध्ये श्यामजींनी लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली. १९०७ मध्ये ते पॅरिस येथे स्थलांतरित झाले.[५]
१८७७ साली श्यामजीने एका श्रीमंत उद्योजकाच्या मुलीशी-आपल्या शाळेतील मित्र रामदास याच्या बहिणीशी- म्हणजेच भानुमतीशी लग्न केले.
त्यानंतर ते राष्ट्रवादी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. त्यानंतर ते त्यांचे शिष्य बनले आणि त्यांनी वैदिक तत्त्वज्ञान आणि धर्म यांवर व्याख्याने दिली.[६] [७]
नंतर १९०५ मध्ये, श्यामजी यांनी लंडनमधील होलबर्न टाऊन हॉलमध्ये झालेल्या भारत-अमेरिका डेमोक्रॅट्सच्या परिषदेत भारतीय होम रूल लीगचे प्रतिनिधी म्हणून भाग घेतला. त्यांच्यामुळे संपूर्ण परिषदेत उत्साह निर्माण झाला. परंतु, श्यामजींच्या इंग्लंडमधील कारवायांमुळे ब्रिटिश सरकारची चिंता वाढली आणि ३० मार्च १९०९ रोजी इंग्लंडमधील इंडियन सोशॅलाॅजिस्ट या नियतकालिकात ब्रिटिशांविरुद्ध लेख लिहिण्यासाठी त्यांना लंडन कोर्टाच्या इनर टेंपलपासून (आंतर्वर्तुळापासून) वंचित केले; सदस्यता यादीतून काढून टाकले. बरीच ब्रिटिश वृत्तपत्रे श्यामजीविरोधी होती. त्यामुळे श्यामजीवर प्रचंड आरोप करण्यात आले. असे असले तरी, इंग्लंडमधील काही वर्तमानपत्रांनी ब्रिटिशांच्या वर्तनावर टीका केली आणि श्यामजींना समर्थन दिले. मात्र त्यानंतर ब्रिटिश गुप्त हेर खात्याने श्यामजी कृष्ण वर्मांवर नजर ठेवायला सुरुवात केली. हे लक्षात आल्यावर श्यामजींनी त्यांच्या कार्याचे मुख्यालय पॅरिसला हलविले.पहिल्या महायुद्धकाळात श्यामजींना पॅरिसनंतर जिनिव्हात वास्तव करावे लागले.
मृत्यू आणि स्मरण
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "The Telegraph - Calcutta : Nation". www.telegraphindia.com. 2018-08-12 रोजी पाहिले.
- ^ "Press Information Bureau Hindi Releases". 2018-08-12 रोजी पाहिले.
- ^ Krant (2006). Svadhinata sangrama ke krantikari sahitya ka itihasa. Nai Dilli: Pravina Prakasana. ISBN 8177831224.
- ^ Bowcott, Owen (2015-11-11). "Indian lawyer disbarred from Inner Temple a century ago is reinstated". the Guardian (इंग्रजी भाषेत). 2018-08-12 रोजी पाहिले.
- ^ "Modi dedicates 'Kranti Teerth' memorial to Shyamji Krishna Verma - Times of India". The Times of India. 2018-08-12 रोजी पाहिले.
- ^ "Shyamji Krishna Varma Smrutikaksha | Shyamji Krishna Varma Memorial Society". www.krantiteerth.org (इंग्रजी भाषेत). 2014-02-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-08-12 रोजी पाहिले.
- ^ "Shyamji Krishna Varma". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2018-07-29.