Jump to content

अहमदनगर किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अहमदनगर

भुईकोट किल्ला, अहमदनगर Chronological
नाव अहमदनगर
उंची ६५७मी.
प्रकार भुईकोट
चढाईची श्रेणी सोपा
ठिकाण अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव अहमदनगर
डोंगररांग भुईकोट किल्ला
सध्याची अवस्था चांगली
स्थापना इ.स. १४९०


अहमदनगरचा भुईकोट किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर ऊर्फ नगर शहराजवळील किल्ला आहे.

कसे जाल

[संपादन]

मनमाड-दौंड रेल्वेमार्गावर अहमदनगर येथे मध्य रेल्वेचे स्टेशन आहे. स्टेशनाजवळच अहमदनगर आहे. शहराच्या पूर्व दिशेला प्रस्तुत भुईकोट किल्ला आहे. अहमद नगर भिंगारला जाणाऱ्या अहमद नगर महानगरपालिका परिवहनच्या बसेस]] किंवा शेअर ऑटोने किल्ल्याकडे जाता येते. या किल्ल्याला अहमदनगर किल्ला असेही नाव आहे. शहरात कोट बाग ए निजाम किल्ल्याखेरीज,

चांदबीबी महाल , बहिस्तबाग, फराहबकश महल, बारा इमाम कोटला, हत्ती बावडी, बाग ए -रौझा अशी काही ऐतिहासिक स्थळे आहेत. तसेच मिरावली बाबा पहाड( दरगाह) आहे

इतिहास

[संपादन]

१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी सल्तनत चे पाच तुकडे झाले. त्यामधून वेगळे निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी यांनी निजामशहाने २८ मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. यांच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमद निजामशाह, बुरहान निजामशाह, हुसैन निजामशाह , सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली. मुघल बादशहा शाहजहान यांनी इ.स. १६३६ मध्ये अहमदनगर काबीज केले. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगर वर ताबा मिळवला, तर इ.स. १८०३ साली ब्रिटिशांनी अहमदनगर वर विजय मिळवला.

अहमदनगर चा कोट बाग ए निजाम हा भुईकोट किल्ला हा हुसेन निझामशाह यांनी इ.स. १५५३ साली बांधण्यास सुरुवात केली. चांदबिबी यांनी जुलै इ.स. १६०० मध्ये युद्धात किल्ला लढवला. परंतु मुघलांनी तो जिंकला. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी मुघलांकडून विकत घेतला. इ.स. १७९७ पेशव्यांनी शिंदे घराण्याच्या ताब्यात दिला. १२ ऑगस्ट इ.स. १८०३ ला तो इंग्रजी सत्तेसाठी जनरल वेलस्लीने जिंकला.

इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. प्रफुल्लचंद्र घोष यांनी ’हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन’ हा ग्रंथ शब्दबद्ध केला. अहमदनगर शहरात राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान; वमौलाना आझाद यांनी गुबार - ए - खातिर हे ग्रंथ लिहिले.[ संदर्भ हवा ]

इ.स. १९४७ ला किल्ला भारत सरकारच्या सैन्यदलाच्या ताब्यात देण्यात आला.

इ.स.१४९४ साली अहमदशहाने अहमदनगर शहराची स्थापना करून तेथे आपली राजधानी वसवली.[]

अहमदनगरजवळचा हा भुईकोट किल्ला हा हुसेन निझामशाह यांनी इ.स. १५५३ साली बांधण्यास सुरुवात केली. चांदबिबीने जुलै इ.स. १६०० मध्ये युद्धात किल्ला लढवला. परंतु मुघलांनी तो जिंकला. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी मुघलांकडून विकत घेतला. इ.स. १७९७ पेशव्यांनी शिंदे घराण्याच्या ताब्यात दिला. १२ ऑगस्ट इ.स. १८०३ ला तो इंग्रजी सत्तेसाठी जनरल वेलस्लीने जिंकला.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

[संपादन]

गड सैन्यदलाच्या ताब्यात आहे.

गडावरील राहायची सोय

[संपादन]

किल्ला सैन्य दलाच्या ताब्यात असल्याने, किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही. राहन्यासाठी अहमदनगर शहरात सोय होऊ शकते.

गडावरील खाण्याची सोय

[संपादन]

किल्ला सैन्य दलाच्या ताब्यात असल्याने, किल्ल्यावर खाण्याची सोय नाही. खाण्याची सोय अहमदनगर]] शहरात सोय होऊ शकते.

गडावरील पाण्याची सोय

[संपादन]

किल्ला सैन्य दलाच्या ताब्यात असल्याने, किल्ल्यावर पाण्याची सोय नाही. पाण्याची सोय अहमदनगर शहरात मतदारसंघ सोय होऊ शकते.

गडावर जाण्याच्या वाटा

[संपादन]

मार्ग

[संपादन]

जाण्यासाठी लागणारा वेळ

[संपादन]

अहमदनगर शहराच्या आसपासचे किल्ले आणि संबंधित मराठ्यांची घराणी

[संपादन]

मराठ्यांच्या प्रमुख घराण्यांपैकी विठोजी भोसले, मालोजी राजे भोसले, लखुजी जाधवराव, निंबाळकर, थोरात, पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचे चौथे सुलतान मुर्तजा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर ह्यांच्या पदरी सेवेत होते. साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्ल्यांवर फंदफितुरी करून मिळवून दिल्याबद्दल साक्री आणि रुई ही गावे देवळाली प्रवरा येथील सरदार बाजी कदमराव ह्यांना इ.स. १५८० साली इनाम मिळाली होती. पुढे व बिजापूरकरांशी लढताना बाजी कदमांचा बंकापूर (कर्नाटक) येथे मृत्यू झाला. आजही त्याचे वंशज हे देवळाली प्रवरा येथे आहेत.

पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत हे घराणे आले. खंडेराव कदम आणि बाजी (तिसरे) हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. त्यांच्याकडे किल्ले राजगडची तट-सरनौबती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत तामिळनाडू येथील वली गंडापुराम जिंकल्यावर तेथील भुईकोट किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी स्वराज्यासाठी योगदान दिले. पानिपतच्या लढाईत ह्या घरातील सात पुरुषांनी आपला देह ठेवला. आजही कदमांनी पारंपरिक आणि दुर्मीळ अशी जुनी शस्त्रे जपून ठेवली आहेत. ह्यात धोप तलवारी, गूर्ज, कट्यारी, ढाली, बिचवा, हस्तिदंती गुप्‍त्या, भाले, शिवाजीकालीन नाणी (शिवराया) आणि इतर ऐतिहासिक साधने आहेत. निंबाळकर घराणे , पवार घराणे हे निजामशाही काळात व पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्य सेवेत रुजू होते, अहमदनगर मधील पारनेर भागात राजे साबुसिंग पवार यांच्या सुपे गावी त्यांचे पुत्र सरदार कृष्णाजी पवार यांनी गढी वाडा बांधला व स्वराज्य सेवेसाठी उपयोगी आणला त्यांचेच नातू मानाजीराजे पवार यांनी हंगा नदीतीरी पिंपळगाव पिसे गावी तटबंधी व वाडा बांधून स्वराज सेवेशी रुजू राहिले,येथील पवार घराण्याला मोठा इतिहास आहे शिवपूर्व काळात परिसरातील 25 गावांची जहागिरी वतन होते शिवकाळात सरपाटीलकी होती, पुढे शाहूकाळात जहागिरी त्रिंबकजी भोसले यांच्याकडे होती, पवारांशी वाकडे लागल्याने पेशव्यांनी ह्या भागातील वतन जप्त करून ताब्यात घेतले व पुढे तहात ब्रिटिशांना दिले,या पिंपळगाव विसापूर परिसरातील ठिकाणी ब्रिटिशांनी ब्रिटिश सैन्य दल उभारले व विसापूर तलाव विसापूर खुले कारागृह निर्मिती केली याठिकाणी पंडित नेहरू ही काही दिवस होते, ब्रिटिश कालीन दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील विसापूर रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे होते रेल्वे मध्ये येथून वॉटर सप्लाय द्वारे पाणी भरले जात होते,स्वातंत्र्य नंतर येथे स्थानिकांनी आपली जमीन पुन्हा मिळवण्यासाठी पंतप्रधान नेहरूंकडे मागणी केली होती,परंतु येथे पाकिस्तान मधून हिंदू निर्वासित लोकांना काही वर्षे येथील (ब्रिटिश)मिल्ट्री छावणी मध्ये ठेवण्यात आले,आजही येथील ब्रिटिश आर्मी कॅम्प चा उपयोग भिक्षेकरी गृहासाठी वापरत आहे,जप्त केलेली काही जमीन भारतीय सैन्य दलाच्या व काही जमीन समाज कल्याण व इरिकेशन डिपार्टमेंट च्या ताब्यात आहे,येथील पवार घराण्यातील वंशज वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाले व काही वंशज सुपे व पिंपळगाव येथे आपल्या पूर्वजांच्या शेतजमिनी सांभाळून राहत आहेत,वाडे काही अवशेष दिसतात काही पडलेले आहेत,रेणुकामाता मंदिर व पिंपळेश्वर मंदिर आहे,सुपे येथील पवार घराण्यातील वंशज श्रीमंत हेमेन्द्रसिंह राव पवार धार कर्णसिंह पवार व विक्रमसिंह पवार अनुक्रमे आजही आपल्या स्वतंत्र संस्थान असलेल्या धार व देवास मध्यप्रदेश येथे व काही महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी संस्थानिक म्हणून राहत आहेत आपल्या पूर्वजांच्या वास्तू व वस्तूंची देखभाल करत आहेत,निंबाळकर घराणे कर्जत भाग,दत्ताजी , महादजी शिंदे सरकार,जिवाजीराजे शिंदे यांचे जमीन वाडे श्रीगोंदा व जामगाव येथे आहेत ते त्यांनी रयत शिक्षण संस्थेला दान दिले आहेत,ऐतिहासिक घराणे :-भोसले घराणे राशीन ,देशमुख मांडवगण( कादराबाद) कात्राबाद ,सरदार दहातोंडे चांदा नेवासा,धार पवार नेवासे,गोमाजी नाईक पानसबळ-सडे राहुरी,हांडे देशमुख पळवे पारनेर, गाढवे देशमुख व शिंदे पाटील रांजणगाव,सरदार कदम बांडे आळकुटी, सोमवंशी जहागीरदार व शितोळे देशमुख जवळा पारनेर,सरदार लगड व सुभेदार नलगे कोळगाव,वाबळे इनामदार श्रीगोंदा,राजे निंबाळकर खर्डा जामखेड येथे खर्ड्याची प्रसिद्ध लढाई झाली येथे किल्ला व गढि आहे,अहिल्याबाई होळकर यांचे माहेर शिंदे चौंडी,

छायाचित्रे

[संपादन]
अहमदनगर भुईकोटाचे शाईत चितारलेले रेखाचित्र (इ.स. १८८५)
अहमदनगर भुईकोटाचे शाईत चितारलेले रेखाचित्र (इ.स. १८८५)

संदर्भ

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]


  1. ^ Gokhale, Kamal Shrikrishna (1971). áivaputra Sambhäji. pp. १६६०.