Jump to content

अहिल्यानगर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अहिल्यानगर जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. शिर्डी येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यातील राहाता तालुका यात आहे.


अहिल्यानगर जिल्हा
नगर जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
अहिल्यानगर जिल्हा चे स्थान
अहिल्यानगर जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव नाशिक
मुख्यालय अहिल्यानगर
तालुके १. अकोले २. कर्जत ३. कोपरगाव ४. जामखेड ५. नगर ६. नेवासा ७. पाथर्डी ८. पारनेर ९. राहाता १०. राहुरी ११. शेवगाव १२. श्रीगोंदा १३. श्रीरामपूर १४. संगमनेर
क्षेत्रफळ
 - एकूण १७,४१३ चौरस किमी (६,७२३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ४५,४३,०८० (२०११)
-लोकसंख्या घनता २६० प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या १७.६७%
-साक्षरता दर ८०.२२%
-लिंग गुणोत्तर ९३९ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
-लोकसभा मतदारसंघ १.अहमदनगर
२.शिर्डी
-खासदार १. निलेश लंके
२. भाऊसाहेब वाकचौरे
-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ५०१.८ मिलीमीटर (१९.७६ इंच)
प्रमुख_शहरे अहिल्यानगर, श्रीरामपूर, शिर्डी, संगमनेर श्रीगोंदा
वाहन नोंदणी महा-१६, महा-१७
संकेतस्थळ


नामांतर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर


महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने १३ मार्च २०२४ रोजी १८ व्या शतकातील मराठा राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून अहमदनगर जिल्ह्याचे 'अहिल्यानगर' असे नामकरण करण्यास औपचारिक मान्यता दिली. त्यानंतर भारत सरकार ने नाव बदलण्याचे सर्व निकष पूर्ण करून दिनांंक ४ ऑक्टोबर २०२४, अन्वयेे “अहमदनगर” शहराचेे नाव बदलून ते “अहिल्यानगर” असेे केले आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार ने लगेच चार दिवसात राजपत्र काढून दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गाव यांचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले.[][]

भौगोलिक स्थान

अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागात आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ किमी असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिकछत्रपती संभाजीनगर, पूर्वेस बीड, दक्षिणेस सोलापूरधाराशिव आणि पश्चिमेस पुणेठाणे हे जिल्हे आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखले जाते.

अकोले तालुक्यातील डोंगराळ भागात भंडारदरा येथे प्रवरा नदीवर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो/आहे. मुळा नदीवर जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण राहुरी तालुक्यात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातून अहिल्यानगर शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास ज्ञानेश्वरसागर असे म्हणले जाते. अहिल्यानगर सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे. भौगोलिक दृष्ट्या या जिल्ह्याची तीन भागात विभागणी होते-

  • पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश

अकोले तालुका आणि संगमनेर तालुका यांचा यात समावेश होतो. अजोबा, बाळेश्वर आणि हरिश्चंद्रगड यांसोबत अनेक शिखरे याच भागात आहेत. कळसूबाई, जे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, १६४६ मीटर याच भागात आहे.

  • मध्य भागातील पठारी प्रदेश

पारनेर तालुका आणि नगर तालुका आणि संगमनेर तालुक्याचा, श्रीगोंदा तालुक्याचाकर्जत तालुक्याचा काही भर यात मोडतो.

  • उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश

यात कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, शेवगाव तालुक्याचा उत्तरेकडील प्रभाग येतो. या भागात गोदावरी, प्रवरा, घोड, भीमा आणि सीना नद्यांचे खोरे येते.

जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने अकोलेसंगमनेर तालुक्यांमध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरिश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगांमध्ये अकोले तालुक्यात आहे. जिल्ह्याचा मध्य भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. उत्तरेकडे गोदावरी नदीचे खोरे आहे तर दक्षिण भाग हा घोड, भीमासीना या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.

गोदावरी, भीमा, सीना, मुळाप्रवरा या अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, घोड, कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. गोदावरी या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. प्रवरागोदावरी नद्यांचा संगम नेवासे तालुक्यात प्रवरासंगम येथे होतो.

हवामान

अहिल्यानगर जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान थंड आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरित्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.

दळणवळण

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६०) हा जिल्ह्यातील संंगमनेर तालुक्यातून जातो. निर्मल - कल्याण (राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२) हा महामार्ग जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती अहिल्यानगर- पुणे या मार्गावर. अहिल्यानगर रेल्वे स्थानक हे दौंड - मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी.चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात असून अहिल्यानगर - बीड - परळी आणि पुणतांबा- शिर्डी हेे इतर रेल्वे मार्ग आहेत. संंगमनेरहून भंडारदरा धरणाकडे जाताना लागणारा विठे घाट व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट हे जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.

शिक्षण

विद्यापीठ

क्र. विद्यापीठाचे नाव गाव, तालुका संकेतस्थळ(वेबसाईट)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी https://mpkv.ac.in/
संजीवनी विद्यापीठ कोपरगाव https://www.sanjivani.edu.in/

अभियांत्रिकी महाविद्यालये

क्र. महाविद्यालयाचे नाव गाव, तालुका संकेतस्थळ(वेबसाईट)
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय अहिल्यानगर विळद घाट, अहिल्यानगर https://www.enggnagar.com
विश्वभारती अकादमीचे अभियांत्रिकी महाविद्यालय सारोळा बद्दी,अहिल्यानगर https://vacoea.com Archived 2025-03-30 at the वेबॅक मशीन.
श्री. छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय नेप्ती,अहिल्यानगर https://www.scoea.org
आडसूळ टेक्निकल कॅम्पस चास,अहिल्यानगर https://sgvssatc.com Archived 2025-06-17 at the वेबॅक मशीन.
प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी, राहता https://pravaraengg.org.in
राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय कर्जुले हर्या,पारनेर https://www.rgcoe.org
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय अमृतनगर, संगमनेर https://www.avcoe.org
विद्या निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय बोटा,संगमनेर https://www.vidyaniketanglobal.com
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय कोपरगाव https://sanjivanicoe.org.in
१० परिक्रमा अभियांत्रिकी महाविद्यालय काष्टी,श्रीगोंदा https://parikramaengineering.com
११ समाजभूषण एकनाथराव ढाकणे अभियांत्रिकी महाविद्यालय राक्षी,शेवगाव https://www.dhakanecoe.co.in

फार्मसी

क्र. महाविद्यालयाचे नाव गाव, तालुका संकेतस्थळ(वेबसाईट)
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी विळद घाट, अहिल्यानगर https://www.vikhepharmacynagar.com
आडसूळ कॉलेज ऑफ फार्मसी चास, अहिल्यानगर https://www.adsulpharmacy.com
साकेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी चास, अहिल्यानगर https://sakeshwarpharmacy.com
अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी सोनेवाडी,केडगाव, अहिल्यानगर http://arihantpharmacynagar.org
काकासाहेब मस्के कॉलेज ऑफ फार्मसी नागापूर, अहिल्यानगर https://kmcop.org.in Archived 2025-06-21 at the वेबॅक मशीन.
विश्वभारती अकॅडमी,कॉलेज ऑफ फार्मसी सारोळा बड्डी, अहिल्यानगर https://vacop.in
एन. एन. सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी आनंद धाम रोड, अहिल्यानगर https://rsmcopharmacy.com Archived 2025-06-21 at the वेबॅक मशीन.
डॉ. एन.जे. पाऊलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी वसंत टेकडी, सावेडी,अहिल्यानगर http://bpharmacy.sspmonline.org http://dpharmacy.sspmonline.org
धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठानचे फार्मसी कॉलेज वाळकी, अहिल्यानगर
१० मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी सोनई,नेवासा https://www.mespharmacy.org
११ त्रिमूर्ती ग्रामीण फार्मसी कॉलेज खडके,नेवासा https://trimurtigraminpharmacy.com
१२ पी. व्ही. बेल्हेकर कॉलेज ऑफ फार्मसी भानशिवारे,नेवासा
१३ शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी पाचेगाव, नेवासा
१४ श्री. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, कॉलेज ऑफ फार्मसी शिवाजीनगर,राहुरी फॅक्टरी,राहुरी https://www.svnhtcop.edu.in
१५ श्रीमती सरस्वती वाणी कॉलेज ऑफ फार्मसी गणेगाव,राहुरी https://prasadgramin.com/mrs-saraswati-wani-college-of-pharmacy
१६ वाणी कॉलेज ऑफ फार्मसी गणेगाव,राहुरी https://prasadgramin.com/wani-college-of-pharmacy
१७ राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी कोकमठाण,कोपरगाव https://pharmacy.rjsgi.com
१८ संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल अँड रिसर्च कोपरगाव https://sanjivanipharm.org.in Archived 2025-07-12 at the वेबॅक मशीन.
१९ डॉ. कोळपे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोळपेवाडी,कोपरगाव
२० प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी प्रवरारानगर,लोणी,राहता https://prcop.in
२१ प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीची इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लोणी खुर्द,राहता https://pravara.in/institute-of-pharmacy-loni
२२ आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ फार्मसी बोधेगाव, शेवगाव http://www.kakadebpharmacy.in
२३ श्री. लक्ष्मणराव त्र्यंबकराव नाकाडे फार्मसी कॉलेज ढोरजलगाव-पूर्व,शेवगाव
२४ मातोश्री मिराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी कर्जुले हर्या,पारनेर https://mmacop.org
२५ शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी धोत्रे बुद्रुक,पारनेर https://www.shantiniketancollegeofpharmacy.com
२६ सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील कॉलेज ऑफ फार्मसी निघोज,पारनेर https://www.shraddhaedu.com
२७ डी.के. औटी कॉलेज ऑफ फार्मसी पारनेर
२८ परिक्रमा कॉलेज ऑफ फार्मसी काष्टी, श्रीगोंदा https://parikramapharmacy.com
२९ साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी घारगाव, श्रीगोंदा http://saikrupapharmacy.com Archived 2025-07-19 at the वेबॅक मशीन.
३० रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी रत्नापूर, जामखेड https://rpcjamkhed.com
३१ कै.देवराव दिगंबर वरात कॉलेज ऑफ फार्मसी साकत, जामखेड
३२ मातोश्री राधा कॉलेज ऑफ डी.फार्मसी वीरगाव,अकोले https://www.mrcpvirgaon.education
३३ प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी वडाळा महादेव, श्रीरामपूर https://pratibhataipawarcop.com Archived 2025-06-19 at the वेबॅक मशीन.
३४ अशोक कॉलेज ऑफ फार्मसी अशोकनगर,श्रीरामपूर
३५ लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी आदिनाथनगर,पाथर्डी https://pharmacy.dprss.in
३६ अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी संगमनेर एस. के.,संगमनेर https://www.amrutdpharm.org
३७ अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी संगमनेर एस. के.,संगमनेर https://www.amrutdpharm.co.in[permanent dead link]
३८ विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर बोटा, संगमनेर https://www.vidyaniketanglobal.com/pharmacy
३९ डॉ. इथापे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी वेल्हाळे,संगमनेर https://drithapepharmacy.com
४० श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, माळवाडी,बोटा, संगमनेर
४१ अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी मांची हिल,संगमनेर
४२ शारदा कॉलेज ऑफ फार्मसी वडगाव गुप्ता, अहिल्यानगर

शेती(एग्रीकल्चर)

क्र. महाविद्यालयाचे नाव गाव, तालुका संकेतस्थळ(वेबसाईट)
कृषी महाविद्यालय विळद घाट, अहिल्यानगर https://www.vikheagrinagar.in/
कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान मदडगाव,अहिल्यानगर
कृषी महाविद्यालय मदडगाव,अहिल्यानगर
मुळा एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय सोनई,नेवासा https://coasonai.com/
कृषी महाविद्यालय भानशिवारे,नेवासा https://sbsbssagri.org/
डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ अ‍ॅग्री. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी
कॉलेज ऑफ ॲग्री. जैव-तंत्रज्ञान लोणी बुद्रुक,राहता https://pravara.in/college-of-agricultural-biotechnology-loni/
कृषी महाविद्यालय लोणी बुद्रुक,राहता https://pravara.in/college-of-agriculture-loni/
कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय लोणी बुद्रुक,राहता https://pravara.in/business-management-loni/
१० कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी खडकेवाके ,राहता
११ साईकृपा कृषी महाविद्यालय घारगाव, श्रीगोंदा http://saikrupabscagri.com/
१२ साईकृपा अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय घारगाव, श्रीगोंदा
१३ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय(Goverment ) हळगाव,जामखेड
१४ कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय मिरजगाव,कर्जत
१५ सदगुरू कृषि महाविद्यालय मिरजगाव,कर्जत
१६ श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड,संगमनेर http://sevasanskarsanstha.org.in/Shramshakti%20college%20of%20Agriculture/Home.php
१७ कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय मालदाड,संगमनेर http://sevasanskarsanstha.org.in/Sharamshakti%20Engineering%20Technology/Home.php
१८ श्रमशक्ती कॉलेज ऑफ फूड तंत्रज्ञान मालदाड,संगमनेर http://sevasanskarsanstha.org.in/Sharamshakti%20Food%20Technology/index.php
१९ सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय अमृतनगर, संगमनेर https://www.amrutagri.assvs.org/
२० वृंदावन कृषी महाविद्यालय गुंजाळवाडी,संगमनेर https://drsgiagri.org/
२१ कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय गुंजाळवाडी,संगमनेर https://drsgilmdp.org/



विशेष

मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी. ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हणले जाते, तो ग्रंथ अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहिल्यानगर महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे.

अहिल्यानगर जिल्हा सहकारी साखर कारखान्यांचा मूल स्रोत म्हणून! डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरू केली (१९२३), तसेच राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला (जून १९५०) आणि सहकार या तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. अर्थतज्ज्ञ धनंजय रामचंद्र गाडगीळ या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व सोयी सुविधांचा विकास अशी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली.

'राळेगणसिद्धी' या खेड्याने जिल्ह्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर 'हिवरे बाजार' हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले. तसेच पाथर्डी तालुक्यातील 'मढी' हे शहर 'कानिफनाथगड' म्हणून प्रसिद्ध आहे. नाथसंप्रदयाचा पाया येथेच रचलेला आढळून येतो.

अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखाने

क्र. कारखान्याचे नाव गाव, तालुका
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, प्रवरानगर, राहता
श्री गणेश सहकारी साखर कारखाना गणेशनगर, राहाता
मुळा सहकारी साखर कारखाना सोनई, नेवासा
लोकनेते मारुतीराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा, नेवासा
स्वामी समर्थ शुगर अँड अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लि. माळेवाडी, वरखेड, नेवासा
अगस्ती सहकारी साखर कारखाना लि. अगस्तीनगर, अकोले
अशोक सहकारी साखर कारखाना लि. अशोकनगर, श्रीरामपूर
डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना लि. शिवाजीनगर, राहुरी
प्रसाद शुगर अँड ऍग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड वांबोरी, राहुरी
१० सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि. अमृतनगर, संगमनेर
११ श्री गजानन महाराज शुगर लि., (जुने नाव युटेक शुगर लि.) कवठे मलकापूर, संगमनेर
१३ गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गंगामाई, हरीनगर, शेवगाव
१३ संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना सुमननगर, बोधेगाव, शेवगाव
१४ बारामती ॲग्रो (युनिट क्र. 3) जय श्रीराम शुगर अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स लि. हळगाव, जामखेड
१५ श्री अंबिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड अंबिकानगर, कर्जत
१६ कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना गौतमनगर कोळपेवाडी, कोपरगाव
१७ सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना (संजीवनी) सहजानंदनगर,शिंगणापूर कोपरगाव
१८ पियुष शुगर अँड पावर प्रायव्हेट लिमिटेड वाळकी देऊळगाव सिद्धी, अहिल्यानगर
१९ कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना पिंपळगाव पिसा, श्रीगोंदा
२० ओंकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि. (युनिट-७) देवदैठण, श्रीगोंदा
२१ गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड (युनिट क्र. ०४) हिरडगाव, श्रीगोंदा
२२ सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना लि. श्रीगोंदा फॅक्टरी, श्रीगोंदा
२३ श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आदिनाथनगर, पाथर्डी
२४ श्री क्रांती शुगर अँड पॉवर लिमिटेड देवीभोयरे,पारनेर
२५ कृषीनाथ ग्रीन एनर्जी लिमिटेड, (संचालित सोपानराव बाळकृष्ण ढसाळ अ‍ॅग्रो पॉवर लिमिटेड, ढवळपुरी, पारनेर

ऐतिहासिक महत्तव

पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाहीमोगल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात अगस्ती ऋषींनी विंध्य पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे अस्तित्त्व सिद्ध झालेले आहे.

निजामशाही

मुख्य लेख: निजामशाही

१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुऱ्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली.

निजामशाहीच्या पडत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये अहमदनगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहिल्यानगर वर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म याच नगर जिल्ह्यातील चौंडी ता.जामखेड या गावी झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे चौंडी ता.जामखेड या गावाचे पाटील होते. अहिल्यादेवींचे बालपण याच गावात गेले. त्या शिवभक्त होत्या. पुढे मराठा साम्राज्याचे इंदौर संस्थानच्या खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांच्या त्या सून होत. त्यांच्या नंतर अहिल्यादेवी ह्या मध्य भारताच्या माळवा राज्याच्या महाराणी म्हणून 28 वर्ष राज्यकारभार सांभाळला.त्यांनी भारत देशात ठिकठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, घाट, पाणपोई- विहिरी, बारवे, अन्नछत्रे उभारले.

भारत छोडो आंदोलन

इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी. घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार - ए - खातिर हे ग्रंथ याच शहरात लिहिले.

राजकीय संरचना

अहिल्यानगर जिल्ह्यात २ लोकसभा मतदारसंघ असून १२ विधानसभा मतदारसंघ आहेत.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ

हा मतदारसंघ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ, कर्जत-जामखेड, पारनेर, राहुरी, शेवगाव-पाथर्डीश्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ

हा इ.स. २००९ पासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ श्रीरामपूर, शिर्डी, अकोले, संगमनेर, कोपरगाव, नेवासा या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ

तसेच जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून, १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.

शेती

ज्वारी हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुले ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात श्रीरामपूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.

कृषी व शैक्षणिकदृष्ट्या अहिल्यानगर जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राहुरी येथे स्थापन झालेले, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणजेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ होय. या ठिकाणी कृषीविषयक विविध अभ्यासक्रम शिकवले जातात तसेच अनेक पिकांबाबत संशोधन केले जाते. या विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.

अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले भंडारदरा धरण, राहुरीजवळ बारागाव नांदूूूर येथील मुळा धरण हे जिल्ह्यातील प्रमुख सिंंचन प्रकल्प आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

धार्मिक स्थळे

  • जगदंबा देवी सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट, मोहटे ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर
  • विशाल गणपती मंदिर, माळीवाडा, अहिल्यानगर
  • स्वयंभू निद्रिस्त गणपती मंदिर, आव्हाणे बु, शेवगाव.
  • श्री हरिहरेश्वर कैलाश गमन देवस्थान, महादेव दर्रा (तोंडोळी)
  • कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान, मढी, पाथर्डी.
  • बहिरीआई व सेवालाल महाराज देवस्थान,सेवानगर तांडा, तोंडोळी (पाथर्डी)
  • श्री अनखिरी देवी मंदिर, धानोरा (फक्रबाद), जामखेड, अहिल्यानगर
  • रेणूका माता मंदिर, धामणगाव देवी
  • अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी
  • जगदंबा मंदिर / मोहटादेवी मंदिर, पाथर्डी
  • दुर्गामाता मंदिर शिराळ, पाथर्डी
  • जगदंबामाता मंदिर, टाहाकरी
  • जगदंबा देवी मंदिर, राशिन
  • श्री ढोकेश्वर मंदिर, टाकळी ढोकेश्वर
  • भगवानगड, ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर
  • रेणुकामाता मंदिर, केडगाव
  • शनी-शिंगणापूर
  • साईबाबा मंदिर, शिर्डी
  • पैस खांब मंदिर, नेवासा
  • वृद्धेश्वर शिव मंदिर, घाटशिरस
  • विठ्ठल मंदिर, पळशी (पारनेर)
  • श्री कोरठण खंंडोबा मंदिर, पिंपळगाव रोठा
  • सिद्धटेक
  • गोरक्षनाथ मंदिर, मांजरसुंबा
  • देवगड (नेवासा)
  • साईबाबा तपोभूमी मंदिर, कोपरगाव
  • शुक्राचार्य मंदिर, कोपरगाव
  • भगवती माता मंदिर, कोल्हार
  • वाकडी. श्री क्षेत्र खंंडोबा मंदिर (वाकडी खंंडोबाची)
  • कुशाबाबा देवस्थान (सातवड)
  • ढोलेश्वर देवस्थान (सातवड)

ऐतिहासिक वारसा असलेली स्थळे

  • अहिल्यानगर किल्ला
  • सलाबत खान कबर
  • चांदबिबी महाल
  • फराहबक्ष महाल, अहिल्यानगर शहर
  • धर्मवीरगड (पेडगाव किल्ला)
  • किल्ले शिवपट्टन, खर्डा निजामकालीन गढी
  • कानिफनाथ गड, मढी, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईंनी या गडाचे बांधकाम केले.

निसर्गपर्यटन स्थळे

महत्त्वाची ठिकाणे

  • कोकमठाण - विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम
  • पुणतांबा - गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन तीर्थक्षेत्र. संत चांगदेव महाराजांची समाधी.
  • मढी - श्री कानिफनाथ समाधी मंदिर
  • साकुरी - सदगुरू उपासनी महाराज आश्रम
  • राळेगण सिद्धीहिवरे बाजार - संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेली आदर्श गावे.
  • दायमाबाद- पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ
  • राशिन - श्री जगदंबा देवी मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुके

अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४ उपविभाग आणि १४ तालुके आहेत.

  1. अकोले (संगमनेर उपविभाग)
  2. कर्जत (कर्जत उपविभाग)
  3. कोपरगाव (संगमनेर उपविभाग)
  4. जामखेड (कर्जत उपविभाग)
  5. नगर (अहिल्यानगर उपविभाग)
  6. नेवासा (श्रीरामपूर उपविभाग)
  7. पाथर्डी (अहिल्यानगर उपविभाग)
  8. पारनेर (अहिल्यानगर उपविभाग)
  9. राहाता (श्रीरामपूर उपविभाग)
  10. राहुरी (श्रीरामपूर उपविभाग)
  11. शेवगाव (अहिल्यानगर उपविभाग)
  12. श्रीगोंदा (अहिल्यानगर उपविभाग) नवीन रचनेनुसार
  13. श्रीरामपूर (श्रीरामपूर उपविभाग)
  14. संगमनेर (संगमनेर उपविभाग)

नवीन रचनेनुसार श्रीगोंदा (पूर्वीचा कर्जत उपविभाग) व पारनेर यांचे एकत्रित उपविभागीय कार्यालय अहिल्यानगर येथे स्थापण्यात आले आहे.

अहिल्यानगर शहरापासून १२ किमी अंतरावर चांदबीबीचा महाल आहे ती एक ऐतिहासिक वास्तू आहे, तसेच शहराच्या पूर्वेस भातोडी या ठिकाणी तलाव आहे त्या तलावाची भिंत छत्रपती शाहू महाराज यांनी एका युद्धाच्या वेळी फोडली होती व त्या पाण्याच्या प्रवाहाने विरोधी सैन्य वाहून गेले होते असा इतिहास सांगितला जातो तसेच तिथे शहाजी राजे यांचे बंधू शरीफजी राजे यांची समाधी देखील आहे.

तसेच प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी अहिल्यानगर शहरात वास्तव्य केलेले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषिजी महाराज यांचे जन्मगाव देखील याच जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील चिचींडी या गावी झालेला आहे.

स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे पूर्वजांचे मूळ गाव पारनेर तालुक्यातील हंगा आहे अशी ही आख्यायिका आहे. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी याच जिल्ह्यातून निवडणूक लढवली होती. जायकवाडी धरण हे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील जायकवाडी या ठिकाणी आहे.

संदर्भ

  1. ^ "Ahilyanagar District website".
  2. ^ "Times of india".