धोंडोपंत बाजीराव पेशवे
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल. |
धोंडोपंत ऊर्फ नानासाहेब बाजीराव पेशवे.
धोंडोपंत बाजीराव पेशवे[संपादन]
पार्श्वभूमी :
दुसऱ्या बाजीरावांची (रावबाजींची) पुण्यातील सत्ता संपुष्टात आल्यानंतर त्यांचे राज्य इंग्रजांनी बळकावले. पेशवे मांडलिक बनले व बिठूर येथे जाऊन राज्य करू लागले. या बाजीरावांना तीन मुली झाल्या आणि नंतर मुलगा होण्याची आशा न वाटल्याने त्यांनी नानासाहेब, दादासाहेब व बाळासाहेब असे तीन मुलगे दत्तक घेतले.
रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यांत कर्जतपासून ३-४ मैलावर वेणगाव येथे माधवराव नारायण भट रहात होते; त्यांच्या पत्नीचे नांव गंगाबाई. यांचाच मुलगा धोंडोपंत उर्फ नानासाहेब. नानासाहेबांचा जन्म ८ डिसेंबर १८२४ रोजी झाला. रावबाजीबरोबर जी मडळी ब्रह्मावर्तास गेली होती, तींत माधवराव भटहि होता. तेथेच धोंडोपंतावर रावबाजींची मर्जी बसून त्यानी त्यास ७ जून १८२७ रोजी दत्तक घेतले.,
पुढे काही काळानंतर बाजीरावांनी झाशीच्या राणीच्या मदतीने बिठूर स्वंतत्र घोषित केले. मात्र अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले व त्यांचे दत्तक पुत्र धोंडोपंत बाजीराव ऊर्फ नानासाहेब बाजीराव पेशवे झाले. .
पेशवेपदासाठीचा संग्राम :
नानासाहेब दत्तक पुत्र असल्याने ईस्ट इंडिया कंपनीने त्यांचा स्वीकार केला नाही. बिठूर जरी स्वंतत्र असले तरी जो पर्यत ईस्ट इंडिया कंपनीची परवानगी मिळत नाही तोपर्यत हिंदुस्थानातल्या कुठल्याही राजाला राजा म्हणून मान्यता मिळत नसे. तोच विरोध नानासाहेबांना झाला. पेशवेपद मिळविण्यासाठी त्यांना इंग्रज सेनापती मेन्सन ह्याच्याशी युद्ध करावे लागले. ह्या युद्धात नानासाहेबांचा पराजय झाला.
बिठूरचे विलीनीकरण :
नानासाहेबांचा बिठूरचा क्रांतिदलात सक्रिय सहभाग होता. पण इंग्रजांच्या सैन्यानेही बंड मोडायचा निश्चय केला होता. त्यांनी बिठूरवर अचानक हल्ला करून नानासाहेबांना झुकायला भाग पाडले. स्वतःचा जीव वाचावा म्हणून नानासाहेबांनी बिठूर फिरंगी सत्तेत विलीन केले ते कायमचेच.
दुसऱ्या नानासाहेब पेशव्यांवरील पुस्तके[संपादन]
- ब्रह्मावर्तचा फकीर (नयनतारा देसाई)
पहा : पहिले नानासाहेब पेशवे
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |