शिवराई
शिवराई हे शिवाजीमहाराजांनी राज्याभिषेकाच्यावेळी पाडलेले तांब्याचे नाणे आहे. सन १९२०[ संदर्भ हवा ] पर्यंत हे नाणे चलनात होते. ब्रिटिश राजवटीत नवीन नाणी आल्यानंतर ते हळूहळू बंद झाले. ब्रिटिशांनी सर्व शिवराया गोळा करायचा प्रयत्न केला, पण अजूनही काही शिवराया नदीतील वाळूत किंवा जमिनीत सापडतात.
हे तांब्याचे नाणे साधारण ११-१३ ग्रॅम वजनाचे असते. व्यास २ सें.मी. असतो. एका बाजूस श्री/राजा /शिव तर दुसऱ्या बाजूस छत्र /पती असे लिहिलेले असते. यास पूर्ण शिवराई असेही संबोधिले जाते.
इतिहास
[संपादन]महाराज शिवाजी राजे भोसले यांनी “ज्येष्ठ शुद्ध १२, शुक्रवार घटी २१, पळे ३४, विष्कंभ ३८, घटिका ४०,पळे सिं ४२ तीन घटिका रात्र उरली” असताना म्हणजेच ६ जून १६७४ रोजी स्वतःस राज्याभिषेक करून घेतला. छत्रपती अशी पदवी धारण करून स्वतंत्र आणि सार्वभौम राजाचं प्रतीक म्हणून स्वतःचे चलन सुरू केले. उपलब्ध साधने आणि पुराव्यानुसार सोने व तांबे या दोन धातूंची नाणी शिवाजी महाराजांनी पाडलेली आढळतात. जेम्स ग्रँड डफ यांनी आपल्या हिस्ट्री ऑफ द मराठाज् या पुस्तकात शिवाजीने इसवी सन १६६४ मध्ये नाणी पाडली असे नमूद केले आहे. परंतु ही नाणी राज्याभिषेकानंतर म्हणजे १६७४ला पाडली गेली असल्याचे अनेक इतिहास अभ्यासकांनी सिद्ध केलेले आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]- भारतीय सर्वेक्षण विभाग
- पुरातत्त्वीय उत्खनन
- भारतीय पुरातत्व सर्वेक्षण
- नाणेशास्त्र
- नाणेशास्त्र
- नाणे (मुद्रा)
- भारतीय नाणेशास्त्र शोधसंस्था, अंजनेरी, नाशिक
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |