भोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भोर हे पुणे जिल्ह्यातील एक भोर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

भौगोलिक माहिती[संपादन]

इतिहास[संपादन]

भोर हे डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या अधिपत्याखालील एक संस्थान होते.भोर हे एक राजाची सत्ता असलेले एक जुन्या काळचे संस्थान ्होते. आजही आपणास राजवाडा तसेच संस्थानाच्य्हा अस्तित्वाच्या खाणाखुणा पाहावयास मिळतात. भोर तालुक्यात एकूण 196 गावे असून, सर्व गावाना चहूबाजूंच्या डोंगरांमुळे निसर्गसौन्दर्य लाभले आहे. भोरमध्ये काही चांगल्या शिक्षणसंस्था आहेत.

भोर तालुकयात धुमाळ-देशमुख हे घराणे इतिहासापासून प्रसिद्ध आहे, शिवकाळात धुमाळांचे पुर्वज श्रि.बाबासाहेब डोहर यांना भोरच्या उत्तरेकडे आणि पुर्वेकडे वतन मिळाले होते. पुढे डोहर-देशमुख नावाचे धुमाळ देशमुख रुढ झाले तसेच कान्होजी जेधे ,बांदल, गोळे, शिळीमकर, गायकवाड (थोपटे) शिवकालीन घराणी प्रसिद्ध आहेत

पर्यावरण[संपादन]

वेळवंडी नदीवरील भाटघर धरण येथून जवळ आहे.

सामाजिक माहिती[संपादन]

हवामान[संपादन]

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा,जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी.पर्यंत असते.