Jump to content

पोर्तुगीज साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोर्तुगीज साम्राज्य
Império Português
इ.स. १४१५इ.स. २००२
ध्वज चिन्ह
ब्रीदवाक्य: Vis Unita Maior Nunc et Semper
राजधानी लिस्बन
सर्वात मोठे शहर लिस्बन
शासनप्रकार राजेशाही (१४१५-१९१०)
प्रजासत्ताक (१९१०-२००२)
अधिकृत भाषा पोर्तुगीज


पोर्तुगीज साम्राज्य (पोर्तुगीज:Império Português) हे इतिहासातील पहिले जागतिक साम्राज्य होते. तसेच हे साम्राज्य सर्वाधिक काळ टिकलेले युरोपीय वसाहती साम्राज्य होते. हे साम्राज्य सहा शतके टिकले. १४१५ साली सेउता जिंकल्यानंतर या साम्राज्याचा उदय झाला. २००२ साली पूर्व तिमोरला स्वातंत्र्य दिल्यानंतर हे साम्राज्याचा अधिकृतपणे अस्त झाला. पोर्तुगीज साम्राज्याने, आज स्वतंत्र देश म्हणून असलेल्या ५३ देशांवर राज्य केले होते.