Jump to content

पाचगणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाचगणी, महाराष्ट्र, भारत

पाचगणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे.

जवळपास महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी. महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या १८-२० कि.मी. अंतरावर आहे. महाबळेश्वर इतकेच निसर्गसुंदर असलेले हे ठिकाण येथील पब्लिक स्कूल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. येथे राहण्याजेवणाच्या चांगल्या सोयी आहेत. पूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकाने ज्वाला रस बाहेर येऊन हे डोंगर तयार झाले असावे, असे मानले जाते. ५ डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने, त्यास "पाचगणी" असे म्हणतात.

उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लँड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत. येथील टेबल लँडवर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे.

  • ह्या ठिकाणी येण्यासाठी मुंबईहून ३ मार्ग आहेत.
  1. महाड-महाबळेश्वर मार्गे,
  2. पुणे वाई मार्गे व
  3. पुण्याहून उडतरे-कुडाळ मार्गे पाचगणी

हे रस्ता आहे.